क्षास

शून्य

Submitted by क्षास on 10 July, 2019 - 05:53

ती
काळ्या-कुट्ट अंधारात धडपडत,
कोरड्या, शुष्क पडलेल्या जाणीवा,
संवेदना पायांखाली तुडवत....
सुजलेल्या खोल डोळ्यांत डोकावून बघत
एकामागून एक अर्थहीन प्रश्नांचे दगड भिरकावून
उठवते तरंग डोळ्यांच्या कडांपर्यंत.....
तिच्या आजूबाजूला गर्दी जमली की
धूसर होतात एकाकीपणाची भयाण चित्रं
आणि विरून जातो
नीरस, पोकळ गप्पांमध्ये आतला
छळणारा आवाज.....
काहीवेळाने
आसपासची माणसं हा हा म्हणता पसरून जातात...
मृगजळाची नशा ओसरून जाते...
ती पुन्हा काळ्या-कुट्ट अंधारात हरवून जाते...
बघता बघता नाहीशी होते..

शब्दखुणा: 

पुस्तक आणि साडी

Submitted by क्षास on 5 July, 2018 - 06:54

कित्येक दिवसांनी शेवटी आज मॅजेस्टिकला जायचा योग आलाच. पुस्तक-खरेदी इतकी दुसरी कोणतीही गोष्ट मला प्रिय नाही. पण पुस्तकखरेदीसाठी माझ्या घरून हल्ली तुटपुंजे पैसे मिळतात. आणलेलं पुस्तक दोन दिवसांत वाचून संपलं की ते इतर पुस्तकांच्या पंगतीत बसायला मोकळं होतं! आईला नेमका यावरच आक्षेप आहे. घरात पडलेल्या पुस्तकांना पुन्हा कोणी हातही लावत नाही या कारणामुळे आई नवीन पुस्तकांना पैसे देताना काही ना काही ऐकवतेच. तिचा लायब्ररी लावण्याचा सल्ला मला पटला पण त्यासोबतच घरात हक्काची, मालकीची पुस्तकं असावीत असा माझा नेहमी हट्ट असतो. आजही मी काय घ्यायचं हे ठरवून निघाले. आईने चारशे रुपये दिले. फक्त चारशे!

शब्दखुणा: 

रस्ता

Submitted by क्षास on 24 June, 2018 - 11:56

रस्ता कधीच संपत नाही,
संपेल असं वाटतं आणि
सुरू होतो दुसरा रस्ता तिथून,
हे रस्ते कुठे घेऊन जात आहेत याची पर्वा नसते,
कारण अद्याप ठरलेलं नसतं कुठे जायचंय
कदाचित कुठे जायचंच नसतं
रस्त्यांमागून रस्ते,विचारांमागून विचार तुडवायचे असतात.
कधीतरी फक्त चालत राहायचं असतं कुठेही न पोहोचण्यासाठी
फक्त बोलत राहायचं असतं कोणालाही न ऐकवण्यासाठी
माणसाचे पाय शेवटी
कधीतरी चालून दमणारच.
शहरातले रस्ते हे
कुठेतरी जाऊन संपणारच.
त्या शेवटच्या टोकावरून मागे वळायचं,
स्वतःच्या विचारांचे विखुरलेले तुकडे गोळा करायचे

शब्दखुणा: 

ड्रायव्हिंग: एक अनुभव

Submitted by क्षास on 19 June, 2018 - 23:43

भारतातल्या रस्त्यांवर गाडी चालवणे हे जर काही वर्षांनी साहसी कृत्यांमध्ये समाविष्ट झालं तर मला तरी आश्च़र्य वाटणार नाही. स्मार्ट झालेल्या शहरांमध्ये गाड्या चालवणारी माणसं स्मार्ट व्हायला अजून अवकाश आहे हे ध्यानात ठेवलं तर सगळं प्रकरण सोपं वाटेल असं काहीसं मत होतं माझं. गाडी चालवायला शिकायचंच असं ठरवून मी नजिकच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल झाले. वीस दिवसात मी चारचाकी गाडी चालवू शकेन या विचाराने मी अगदी उत्साहात होते. पहिल्या दिवशी मी ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी पोहोचले. ड्रायव्हिंग स्कूलचं नाव शक्यतितक्या जागांवर छापलेली स्विफ्ट गाडी तिथे उभी होती.

शिंदे

Submitted by क्षास on 15 June, 2018 - 13:48

नुकतंच वपु काळे यांचं आणखी एक पुस्तक वाचून संपलं, वपुंचं पुस्तक वाचून संपल्यावर एक वेगळाच हँगओव्हर येतो....विचारांचा हँगओव्हर !! विचारांची साखळी मनाला कुठल्या कुठे घेऊन जाते...सहज मनात विचार डोकावला..नक्की कुठून सुरवात झाली वपुंचं साहित्य वाचण्याची? नक्की कधी भाळले मी त्यांच्या लेखनशैलीवर? ...विचारांची गाडी रिव्हर्स घेत घेत भूतकाळात जाऊन पोहचली. मी वपुंची फॅन बनले ते माझ्या एका मित्रामुळे..शिंदेमुळे ! डोळ्यासमोर त्याचा चेहरा चमकून गेला ...

विषय: 
शब्दखुणा: 

कागद

Submitted by क्षास on 5 May, 2018 - 00:18

माझ्या समोरचा कागद कोराच राहतो,

भावनांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा विचारांचा गुंता वाढतो,
विचारांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा शब्दांचा गुंता वाढतो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.

विचारांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा अनोळखीच भासतो,
किंबहुना आपल्या विचारांशी आपलाच गहिरा संबंध असतो,
कधीकधी मनातून कागदावर उतरता उतरता
तो विचार पुन्हा गर्दीत हरवून जातो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.

डाग

Submitted by क्षास on 2 April, 2018 - 10:15

रोज कितीतरी वेळा
मी आरशात स्वतःला पाहते.
माझा चेहरा वेगवेगळ्या कोनांतून न्याहाळते.
प्रत्येक डाग ,मुरूम मी बारकाईने बघते.
पुन्हा तीच ती नाराजी, पुन्हा तीच ती हळहळ
पुन्हा तेच ते प्रयोग, पुन्हा क्रीम्स,फेसपॅक,क्लीनअप्स
किती काय थापतो आपण चेहऱ्यावर
किती काय फासतो आपण चेहऱ्यावरच्या डागांवर
एके दिवशी वाटलं,
मनावरच्या चिवट आठवणींचे डाग निरखून बघण्यासाठी
कोणता आरसा असता तर...?
ते ही डाग घालवायला कोणते मलम असते तर...?
दहा दिवसांत लख्ख उजळपणा देणारी क्रीम
मनाचं सावळेपण घेऊन गेली असती.

शब्दखुणा: 

तू माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीस

Submitted by क्षास on 27 March, 2018 - 09:41

तू माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीस,
तुला माझ्यातली 'मी' कधीच सापडणार नाही,
तू जिथे शोधशील तिथे मी गवसणार नाही,
जिथे जाशील तिथे गैरसमजाच्या धुक्यात हरवशील,

तुला माझ्यातल्या "मी "चा पत्ता सापडेल कधी ना कधी,
तू त्या दिशेने चालायला लागशील,
वाटेत तुला तो गाठेल - माझा भूतकाळ,
त्याचे किस्से ऐकून तू अर्ध्या रस्त्यातून परतशील,

इकडचे तिकडचे कितीतरी वारे तुझे कान भरतील,
खोट्या, ऐकीव गोष्टी गोंगाट करतील,
तुला 'माझा' आवाज ऐकू येईनासा होईल,
सत्य कुठेतरी कोपऱ्यात दडी मारून बसेल,

तिच्या कविता

Submitted by क्षास on 24 March, 2018 - 09:17

या कविता माझ्या नाहीत,
या कविता तिच्या आहेत
जी मी लिहायला बसल्यावर
माझ्या हातातलं पेन नकळत ओढून घेते,
समोरचा कागद शब्दांनी भरभर व्यापते,
तिच्या कवितांना यमक नसतं, ताल नसतो, लय नसते,
फक्त शब्दांच्या फटीमध्ये लपलेलं भय दिसते,

या कविता माझ्या नाहीत, तिच्या आहेत
जिला काहीही आठवलं, सुचलं तरी लिहायचं असतं,
काही काळ बुडण्याची चिंता सोडून अलगद वाहायचं असतं,
विचारांना शब्द आपोआप येऊन बिलगतात आणि ती फक्त मांडत राहते,
अनुभवांची बरणी नकळत कलंडते आणि वेदना कागदावर सांडत जाते,

Subscribe to RSS - क्षास