मराठी भाषा दिवस २०२२ - बालचित्रकारांसाठी उपक्रम - अक्षरचित्रे

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:35

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||

अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कल्पनेतलं श्रीगणेशाचं शब्दचित्र उभं केलं. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपल्या बालकलाकरांसाठी संधी आहे आपापल्या कल्पनेतलं चित्र साकार करण्याची. परंतु हे काव्यरुपी चित्र नसून प्रत्यक्ष अक्षरचित्र असणार आहे.

IMG-20220219-WA0016.jpg

काय आहे हा उपक्रम?
मराठी वर्णमालेतील कोणतेही एक किंवा त्याहून अधिक अक्षरे घ्या. त्या अक्षरांपासून तुम्हाला एक चित्र बनवायचे आहे. चित्रासाठी कोणताही विषय चालेल.

(१) वयोमर्यादा - वय वर्षे ५ ते १५.
(२) चित्र पाठवताना प्रवेशिकेवर शीर्षक 'मराठी भाषा दिवस २०२२ - अक्षरचित्रे उपक्रम - <चित्रकाराचे नाव>' अशा प्रकारे लिहावे.
(३) चित्रात किमान एक अक्षर ठळकपणे ओळखू आले पाहिजे.
(४) अ ते ज्ञ पैकी कोणतेही एक किंवा अधिक मुळाक्षरे चालतील, शब्दही चालतील.
(५) काना/मात्रा/वेलांटी/ अनुस्वार/उकारासहित अक्षरे चालतील, जोडाक्षरे चालतील.
(६) अक्षर देवनागरी अथवा मोडी लिपीतच हवे (मोडीत असल्यास कृपया चित्रासोबतच्या प्रवेशिकेत ते अक्षर कोणते आहे हे देवनागरीत लिहा, म्हणजे वाचकांना कळण्यास सोपे जाईल).
(७) चित्रासहित प्रवेशिका २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत स्वीकारल्या जातील.

चला तर मग, आपापले कुंचले सरसावून हे अक्षरचित्र रेखाटू या. सर्व बालकलाकारांना शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व उपक्रमांना भरभरून प्रतिसाद येत आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार.

हा बालचित्रकारांसाठीचा उपक्रमही लक्षात आहे ना? ह्यावर अजून धागे आलेले दिसत नाहीत. नक्की भाग घ्या. आपल्या बाल-मित्रमैत्रिणींची कला पाहण्याची आणि त्यांचं कौतुक करण्याची संधी आहे, तिचा अवश्य लाभ घ्या.

काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.