स्वप्न माझे आसवांनी बुडवले...

Submitted by मंदार शिंदे on 19 June, 2012 - 00:44

स्वप्न माझे आसवांनी बुडवले
निष्ठेने माझ्याच एकटे पाडले

जीवनातली तहान नाही सरली
गीत प्रेमाचे न पूर्ण जाहले

वार त्याचा हा असेल अखेरचा
आशेवर या वार सारे सोसले

नष्ट केले मी जरी माझे मला
दोघांमधले अंतर नाही संपले

(हसन कमाल यांच्या 'दिल के अरमां' या प्रसिद्ध हिंदी गाण्याचं मराठी रूपांतर)

गुलमोहर: 

वार त्याचा हा असेल अखेरचा
आशेवर या वार सारे सोसले

नष्ट केले मी जरी माझे मला
दोघांमधले अंतर नाही संपले>>>

मूळ गीत नीट माहीत नाही, पण या दोन द्विपदी आवडल्या

धन्यवाद!

मूळ गीतः

"दिल के अरमां आँसुओं में बह गए
हम वफ़ा करके भी तनहा रह गए

ज़िंदगी एक प्यास बनकर रह गैइ
प्यार के क़िस्से अधूरे रह गए

शायद उनका आख़्हिरी हो यह सितम
हर सितम यह सोचकर हम सह गए

ख़ुद को भी हमने मिटा डाला मगर
फ़ास्ले जो दरमियाँ थे रह गए"