ओ जोनाकी

ओ जोनाकी... अनुवाद

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 October, 2015 - 11:39

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या एका काव्याचा मराठीत अनुवाद करण्याचा हा प्रयत्न.

ओ जोनाकी-

सांग काजव्या कसल्या आनंदाने इवले पंख पसरिशी?
सांजेला अंधारवनांतुन उल्हासाने कसा विहरिसी?

तू न दिवाकर वा रजनीकर
आनंद तुझा कमी न कणभर
स्वतः उजळुनी जीवन अपुले पूर्णत्वा नेसी |

तुझ्याजवळि जे, तुझेच ते धन
नसे शिरी तव कोणाचे ऋण
राहतोस अंतरातल्या शक्तीच्या आदेशी |

तमोघटाची शकले करिसी
वामन तू परि 'वामन' ठरसी
अपुल्याशा केल्यास जगातिल तेजाच्या राशी |

Subscribe to RSS - ओ जोनाकी