प्राणायाम करा सुखे
योगसाधनाः पतंजलि मुनींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा अंगांनी युक्त असा अष्टांगयोग (चित्तवृत्तीनिरोध) सांगितलेला आहे. महर्षी पतंजलि प्रणित अष्टांग योग, हा जीवन जगण्याचा असा मार्ग आहे, ज्यावरून जगातील प्रत्येक माणूस निर्भय होऊन, पूर्ण स्वातंत्र्याने चालू शकेल. जीवनात पूर्ण सुख, शांती व आनंद प्राप्त करू शकेल आणि इतर सर्वही लोक जरी तसेच करू लागले तरीही, परस्परांत कुठलेही अंतर्द्वंद्व उद्भवणार नाही.