मायकेल बेवन हे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायम आदराने घेतले जाते. 8 मार्च 1970 रोजी जन्मलेला हा डावखुरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्या संयमशील खेळासाठी आणि कठीण परिस्थितीत सामन्याचा निकाल बदलण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होता. वनडे क्रिकेटमध्ये “फिनिशर” या शब्दाचा अर्थ जर कुणी प्रकट केला असेल, तर तो बेवनच. त्याने आपल्या अचूक फलंदाजीने आणि डावपेचांनी ऑस्ट्रेलियाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले.
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, मित्रप्रेमी आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. चालू ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

‘जुलै’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या शिस्तबद्ध व सुनियंत्रित असल्याचे मानले जाते. चालू ‘जुलै’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
आठवणीतले क्रिकेट विश्वचषक - १९९६
मी दहावी १९९६ बॅचचा. जे क्रिकेटप्रेमी माझ्याच बॅचचे असतील त्यांना आठवत असेल की आपण दहावी बोर्डाची परीक्षा क्रिकेट वर्ल्डकप सोबत दिली होती. आणि तो वर्ल्डकप क्रिकेटची पंढरी असलेल्या भारतातच असल्याने आपल्या दहावीची देखील काशी झाली होती. प्रीलीम नंतर अभ्यासाला जी सुट्टी मिळते ती वाया गेलीच होती. पण फायनल १७ मार्च १९९६, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, आपला सामना नसूनही दहावीच्या पेपरचा अभ्यास सोडून, आपण बॉल टू बॉल पाहिली होती. कारण ऑस्ट्रेलिया हरावी आणि श्रीलंका जिंकावी असे मनोमन वाटत होते, आणि तसेच होत होते.
किती अन् काय काय बोलावं या सामन्यात बद्दल. पूर्ण टूर्नामेंट मध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराट कोहलीने अगदी योग्य वेळ साधून केलेले पुनरागमन. त्याची नियोजनपूर्वक, शानदार खेळी. दुसरीकडून मधल्या फळीची मिळालेली भक्कम साथ. ही झाली फलंदाजीची गोष्ट.
सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
"क्रिक कथा" - क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक लवकरच येतो आहे. लक्ष असू द्या.
क्रिककथा - दिवाळी अंक २०२३
(Available on 15 Oct 2023)
सचिन सचिन… (Sachin @ 50)
– नितीन तेंडुलकर
– प्रा. रत्नाकर शेट्टी
– द्वारकानाथ संझगिरी
– विघ्नेश शहाणे
– अतुल तोडणकर
- ऑस्टिन कुटिन्हो
( पूर्वप्रसिद्धी :- 'Cricकथा' दिवाळी अंक २०२२ [लेखाची संक्षिप्त व संपादित आवृत्ती] )