तिच्या कविता

Submitted by क्षास on 24 March, 2018 - 09:17

या कविता माझ्या नाहीत,
या कविता तिच्या आहेत
जी मी लिहायला बसल्यावर
माझ्या हातातलं पेन नकळत ओढून घेते,
समोरचा कागद शब्दांनी भरभर व्यापते,
तिच्या कवितांना यमक नसतं, ताल नसतो, लय नसते,
फक्त शब्दांच्या फटीमध्ये लपलेलं भय दिसते,

या कविता माझ्या नाहीत, तिच्या आहेत
जिला काहीही आठवलं, सुचलं तरी लिहायचं असतं,
काही काळ बुडण्याची चिंता सोडून अलगद वाहायचं असतं,
विचारांना शब्द आपोआप येऊन बिलगतात आणि ती फक्त मांडत राहते,
अनुभवांची बरणी नकळत कलंडते आणि वेदना कागदावर सांडत जाते,

या कविता माझ्या नाहीत, तिच्या आहेत
जिला कदाचित वास्तवाचं भान नसेल,
तिच्या डायरीत एकही हसरे पान नसेल,
तुम्ही विचाराल की ती सतत भूतकाळात डोकावून का बघते?
नाही,ती मागे वळून का बघेल,ती तर भूतकाळातच असते,

या कविता माझ्या नाहीत, भूतकाळातल्या 'तिच्या' आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही काळ बुडण्याची चिंता सोडून अलगद वाहायचं असतं,
विचारांना शब्द आपोआप येऊन बिलगतात आणि ती फक्त मांडत राहते,
अनुभवांची बरणी नकळत कलंडते आणि वेदना कागदावर सांडत जाते,

सुंदर !