रस्ता

Submitted by क्षास on 24 June, 2018 - 11:56

रस्ता कधीच संपत नाही,
संपेल असं वाटतं आणि
सुरू होतो दुसरा रस्ता तिथून,
हे रस्ते कुठे घेऊन जात आहेत याची पर्वा नसते,
कारण अद्याप ठरलेलं नसतं कुठे जायचंय
कदाचित कुठे जायचंच नसतं
रस्त्यांमागून रस्ते,विचारांमागून विचार तुडवायचे असतात.
कधीतरी फक्त चालत राहायचं असतं कुठेही न पोहोचण्यासाठी
फक्त बोलत राहायचं असतं कोणालाही न ऐकवण्यासाठी
माणसाचे पाय शेवटी
कधीतरी चालून दमणारच.
शहरातले रस्ते हे
कुठेतरी जाऊन संपणारच.
त्या शेवटच्या टोकावरून मागे वळायचं,
स्वतःच्या विचारांचे विखुरलेले तुकडे गोळा करायचे
आणि पुन्हा चालायला लागायचं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users