मी आज पुन्हा हे धाडस करण्याचे धाडस केले

Submitted by वैवकु on 1 July, 2012 - 03:58

मी आज पुन्हा हे धाडस करण्याचे धाडस केले
मी हसून माझ्यावरती रडण्याचे धाडस केले

काय काय केले सांगू गझलेच्या वेडापायी
लावणीगझल सुद्धा मी रचण्याचे धाडस केले

मी शिवी हसडली होती बेफिकीरजिंना तेंव्हा
मी देवसरांशी यंदा लढण्याचे धाडस केले

'पर्यायीगझल'गुरूंचा मग एकलव्य झालो मी
पर्यायी अर्जुन त्यांचा बनण्याचे धाडस केले

ग्रेसाळ नव्या शब्दांना शिकवली भटांची बोली
अन् मलाच माझ्यापुरता कळण्याचे धाडस केले

गझलेत इबादत नव्हती आणला आव भक्तीचा
"माझा विठ्ठल 'मी' आहे!!" म्हणण्याचे धाडस केले

ही गझलहि पावत नाही विठ्ठलही पावत नाही
मी म्हणून त्या दोघांवर रुसण्याचे धाडस केले

जो नव्हता माझ्यामध्ये तो अहंकार बाणवला
मी काय चीज आहे हे बघण्याचे धाडस केले

घेतले काफिये माझे जोडले तुझ्या रदिफेला
देवपूरकर दुसरा मी ठरण्याचे धाडस केले

मी असाच आहे बरका........... त्यामुळेच जगतो आहे ..........!!

......मी असाच आहे बरका त्यामुळेच जगतो आहे ;
नाहीतर मी नसते का मरण्याचे धाडस केले ?????

नाहीतर मी नसते का मरण्याचे धाडस केले .............!!!

________________________________________

माझे 'पर्यायीगझल' गुरू प्रा. सतीश देवपूरकर (माझे 'देव'सर) यांना,........ त्यांनी मागीतली म्हणून मी दिलेली ही "गुरुदक्षिणा" .............

फक्त आणि फक्त एक गंमत म्हणून................;)

गुलमोहर: 

ते ऑर्फि. बेफि. सारे लोटांगण घालुन गेले
तरी मोडलेल्या झाडावरती चढण्याचे धाडस केले
. ....... हा शेर रहीलाच की ओ . Lol

पर्यायी शेर कसे वाटतात बघा बरं.

धाड धाड सुटल्या जेव्हां, गझला बंदूकीतूनी
सभ्य होते श्रोते त्यांस, डिवचण्याचे धाडस केले

रोजचाच मारा येथे, गझलांचे धरण मोठे
शेर पावसाळी तरही, रचण्याचे धाडस केले

ऑर्फी भुंग्या ,किरण, धन्यवाद ........:G

अजून एक शेर अ‍ॅड करतो आहे .............................

ग्रेसाळ नव्या शब्दांना शिकवली भटांची बोली
अन् मलाच माझ्यापुरता कळण्याचे धाडस केले.....

विठ्ठलाचे दोन शेर वगळता बाकीची गझल 'लिहिलेली' वाटली, सुचलेली नाही.

स्पष्ट मताबद्दल गैरसमज नसावा.

पण ते दोन्ही शेर आमच्या मुंबईच्या भाषेत 'फाडू' वाटले भाई!! लै भारी!!

वैभवराव,
आपली गजल नेहमीच कहुरासारखी असते. माझ्यासारख्या चार भिंतीत दडलेल्या माणसाला काहूराचा बाज आवडला. संघर्षाचा चिमटे काढत काढत मस्त मागोवा घेतलाय. खूप मजा आली वाचताना. अभिनंदन आपलं.

निशिकांत काका :
तुमचं नुसतं नाव जरी कुठे मा.बो. वर वाचलं की हळवं व्हायला होतं त्यातून हा प्रतिसाद ..............

या हृद्य प्रतिसादासाठी आपले सहस्त्र आभार