कसे शक्य नाही नभाला झुकवणे?

कसे शक्य नाही नभाला झुकवणे?

Submitted by कु. कमला सोनटक्के on 2 July, 2012 - 13:20

कसे शक्य नाही नभाला झुकवणे?
नशीबास निधड्या मनाने झुलवणे

लपू मी कुठे अन कसा मी कधी रे?
मला शक्य नाही स्वतःला लपवणे

उसासे गिळुन काढली जिंदगी मी
अता शक्य नाही सुखाला पचवणे

सुरेला रिचवले किती मी मदाने
सुरेचे मला तेच होते रिचवणे

जगा निर्मुनी तो कुठे गप्प झाला
खुदाई म्हणवते तयाचे फसवणे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कसे शक्य नाही नभाला झुकवणे?