Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 03:47
एकांतात तुझे गाणें स्फुराया लागले
तुझ्याविना स्वप्नातच मन मुराया लागले.
अबोल्या या मनाची जणु ओळखुन भाषा
झाड-झाड माझ्यासवे बोलाया लागले.
लपविले किती जरी मी डोळ्यातले पाणी
फूल-फूल नजर माझी निरखाया लागले.
आसवांत चमकली शुभ्र तारकांची माळ
चांदणें ही माझ्यासवे हसाया लागले.
एकटाच आलो मी आता एकटेच जाणे
खोल खोल आत हे आता रुजाया लागले.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भट साहेबान्ची मूळ गझल नीट
भट साहेबान्ची मूळ गझल नीट वाचा
म्हणजे या गझलेत काय कमी आहे हे समजेल तुमचं तुम्हालाच