Submitted by मयुरेश साने on 1 July, 2012 - 12:54
चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते
एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते
खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते
काळजाचा एक गहिवर अश्रु बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते
मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला प्रत्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने
गुलमोहर:
शेअर करा
छान.......... काळजाचा एक
छान..........
काळजाचा एक गहिवर अश्रु बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते
मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला प्रत्येक जन्मी माळले होते...
हे मस्तच्..........आवडले..........
चांदणे इतक्याचसाठी टाळले
चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णिमेने एकदा मन जाळले होते... व्वाह ..क्या बात है!!
लाजवाब मतला जियो !!!
लाजवाब मतला
जियो !!!
खूप काही बोलल्यावर एव्हढे
खूप काही बोलल्यावर एव्हढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते
अप्रतिम शेर !! _____/\_____
काळजाचा एक गहिवर अश्रु बनला अन्
पापणीने दु:खही कवटाळले होते
मतला छान!
मतला छान!
तिसरा शेर छान आहे
तिसरा शेर छान आहे
छान आहे
छान आहे
खूप काही बोलल्यावर एवढे
खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते..
अप्रतिम.....