नाते तुझे नी माझे...

Submitted by सुधाकर.. on 15 June, 2012 - 01:48

आलीस घेऊनी येथे, तू काळजाच्या वेदनेला,
मागे खुळ्या बघ्यांचा, जथ्थाच एक आला.

फाटके नशिब होते, झिजण्यात जन्म गेला,
रक्ताचे पेरले थेंब, परी नाही वसंत फुलला

दु:खात ही हसावे, गिळुनी दु:ख हुंदक्याला,
शिकवलेस तू ही, गा तुझ्या जीवनाला.

निर्मळ जलाची धारा, नाते तुझे नी माझे,
पाठी खुळ्या जगाने, भलताच अर्थ केला.

आंदण मी दिले जे, माझे तुला आभाळ,
अफवेस आज त्यांना, अपवाद एक झाला.

तुझ्या नी माझ्या भोवती, नजरेची बंदीशाळा,
छेडण्यास मुक्त त्यांना, हा भलताच छंद झाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काही शब्द दुरुस्त्या...
जथ्या नसावे, जथ्था असा शब्द आहे मराठीत,
आंदन नाही, आंदण.
प्रयत्न चांगला.
शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यावे

थँक्स .. जगावेगळी

आणि धन्यवाद वैभवजी गझले बद्दल आम्हास काही जुजबी माहीती दिल्या बद्द्ल आपण हि आपल्या माझी विचारपुस मध्ये पहावे. तुमच्या जुजबी महीतीत मी थोडीशी भर घातली आहे.