येत जा देऊन थोडी कल्पना - तरही गझल
Submitted by कमलाबाई सोनटक्के on 14 June, 2012 - 05:52
सोसवेना हा अचानक सामना
येत जा देऊन थोडी कल्पना
पूजिला का वड उगा तू सांग ना
अंतरी केलीस माझी वंचना
मज सुखाने बनविले का आळशी
कष्ट करण्या दु:ख देई चालना
दगड धोंडे मंदिरातिल देव हे
मग बुभुक्षा त्यास करते याचना
ग्रीष्म सरता पावसाची धार ये
तप्त भूला तृप्त कर तू जीवना
लोंबलेली माणसे ती ट्रेनला
मुंबईची सर न तुजला लंडना 
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा