कसे जागवू अन् बजावू स्वत:ला?

Submitted by सतीश देवपूरकर on 16 June, 2012 - 07:19

गझल

कसे जागवू अन् बजावू स्वत:ला?
किती मारल्या खूणगाठी मनाला!

मनाची तुला पाहिजे शांतताही;
नको व्हायला यातनाही जिवाला!

करू काय मी एवढ्या या विटांचे?
विटांची जरूरी तुझ्याही घराला!

कधी दैव सुद्धा अशी हाक देते.......
जशी गाय बोलावते वासराला!

मला ती, तिला मी, असे पाहतो की......
जसे पाहतो आरसा आरशाला!

उरी झेलल्या कैक उल्का धरेने;
कुणी पाहिले ना तिच्या काळजाला!

मुकाटे तुझे दु:ख मी सोसताना;
कशी सांग देवू जबानी जगाला?

दवंडी दिल्यासारखे मौन त्यांचे!
किती देखणा साधती बोलबाला!

कृपेचे तुझ्या थेंब काही पुरेसे;
मधाचाच वाटेल प्रत्येक प्याला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

एकदम झक्कास......खुप छान Happy

स्पेशली -
उरी झेलल्या कैक उल्का धरेने;
कुणी पाहिले ना तिच्या काळजाला!

मुकाटे तुझे दु:ख मी सोसताना;
कशी सांग देवू जबानी जगाला?.. ....व्वा !

प्रत्येक शेर मस्त चितारलात सर

हरेक शेर जिवापाड आवड्ला

मतला ,जीवाला, वासराला, जगाला,बोलबाला हे मला पर्सनली फार आवडले

तुमच्या नेहमीच्या स्टाईल पेक्षा खूप वेगळी गझलियत आहे हीत

खयाल सगळेच मस्त आहेत तुमच्या नेहमीच्या खयालांपेक्षा नाविन्यपूर्ण वाटले

एक सुंदर गझल दिल्याबद्दल धन्यवाद सर