येत जा देऊन थोडी कल्पना - तरही गझल

Submitted by कमलाबाई सोनटक्के on 14 June, 2012 - 05:52

सोसवेना हा अचानक सामना
येत जा देऊन थोडी कल्पना

पूजिला का वड उगा तू सांग ना
अंतरी केलीस माझी वंचना

मज सुखाने बनविले का आळशी
कष्ट करण्या दु:ख देई चालना

दगड धोंडे मंदिरातिल देव हे
मग बुभुक्षा त्यास करते याचना

ग्रीष्म सरता पावसाची धार ये
तप्त भूला तृप्त कर तू जीवना

लोंबलेली माणसे ती ट्रेनला
मुंबईची सर न तुजला लंडना Proud

गुलमोहर: 

लोंबलेली माणसे ती ट्रेनला
मुंबईची सर न तुजला लंडना Proud

हा शेर मुंबईच्या चरणी अर्पण

यमक वगैरे जुळवुन केलेला प्रयत्न बराच चांगला आहे, पण लिन्क लागत नाहीये. प्रत्येक द्विपदी पुर्णपणे वेगळी वाटत आहे. त्यातही काही द्विपदीचा स्वतंत्र अर्थ पण कळाला नाही. म्हणजे काय म्हणायचे आहे नक्की ते कळाले नाही.
कदाचित मी प्रत्येक कवितेमधे अथ पासुन इतिपर्यंत एक सलग प्रवाह शोधत असतो त्याचा परिणाम म्हणुन लिन्क नसलेल्या कविता / गझला दुर्बोध वाटतात.

Proud

छान