साखर

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 June, 2012 - 06:14

साखर

साखर म्हणाली चहाला,
मारू नको फुकाच्या
तल्लफेच्या गप्पा.
जो पर्यंत माझे ,
तुझ्यात नाही समर्पण,
लज्जतेत,तुझ्या येत नाही रंगत.
शीतपेयांना सुद्धा,
हवी असते गोडी माझीच.
एवढेच काय ? तिखट नमकीन,
पदार्थांना सुद्धा,
चव वाढविण्यास,
चिमुटभर मीच हवी .
साखर पुडा समारंभ,
संबोधतात माझ्याच नावान.
लग्न सोहळा वा दिन मंगल,
सर्वत्र असते माझीच वर्दळ .
खडी साखर असो वा पिठी,
गुळी असो व शुगर फ्री,
सर्व रुपात वसते मीच.
मधुरता, हा गुणधर्म माझा,
मी कधीच नाही सोडीत
म्हणून सांगते तुम्हा,
जिभेवर मला पेरा
अन वाणीने जग जिंका .
लहांना पासून थोरांना
आवड असते माझीच
उगाच का! सकाळच्या झोपेला
देतात उपमा साखरेची
साखर म्हणजे काय ?
आनंद लुटण्याचे एक माप
कळता बातमी आनंदाची
हातावर मला ठेवण्या
अन तोंड गोड करण्या
धावपळ करविते मी सर्वांची
ऊस गोड लागला,
म्हणून मुळापासून खाऊ नये.
गोडी माझी कितीही अवीट,
अतिरेकी सेवन करू नये .
जायची इच्छा शक्ति जोरदार
तयांना साध्य सर्व होणार
म्हणून तुम्ही म्हणतात
साखरेचे खाणार त्याला देव देणार