एका "पहिल्याची" दुसरी गोष्ट !!!

Submitted by भुंगा on 14 June, 2012 - 06:16

पहिला जॉब....... पहिला दिवस...
ऑफिसात पहिलं पाऊल...... पहिला प्रोजेक्ट...

पहिली कलिग..... पहिली नजरानजर.....
पहिलं हस्तांदोलन...... पहिलं स्माईल.....

पहिलं डेटा शेअरिंग....... पहिला फोन कॉल...
पहिला एसेमेस..... पहिलं चॅटिंग...

पहिली कॉफी..... पहिलं कटिंग....
पहिली साय आणि पहिलीच फुंकर.....

पहिली टूर...... पहिलं लाँग ड्राईव्ह....
पहिला चंद्र..... पहिल्या चांदण्यातल्या गप्पा...

पहिला किनारा.... पहिली वाळूतली जोडपावलं...
पहिला किल्ला आणि पहिलीच लाट.....

पहिला सूर्यास्त...... पहिलाच स्पर्श.....
पहिलं प्रपोजल.... पहिला होकार......

पहिली मिठी..... पहिलं चुंबन.....
पहिलं ग्रिटिंग आणि पहिले पैंजण...

पहिलं लग्न...... पहिलं हनिमून.....
पहिलं घर आणि पहिलीच चाहूल.....

पहिला रुसवा..... पहिला राग.....
पहिली माघार आणि पहिलाच पुढाकार.....

सारं हे पहिलं पहिलं...... आता सरावाने रोजचंच झालय......... !!!

पुन्हा नव्याने हे सारं "पहिलं" शोधायला आता "दुसरी गोष्ट" लिहायला हवी Proud

_________________________________________________________________

तळटीपः वरील कवितेचा किंवा त्यातील उल्लेखांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत विवाहित स्त्री किंवा पुरुषाच्या भावनांशी संबंध नाही. तसे असल्यास तो निव्वळ योगायोग मानावा. कवी अथवा मायबोली यांना याकरीता जवाबदार धरू नये.
अविवाहितांनी याकडे धोक्याची सूचना म्हणून पाहिल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही Wink

अरे असे लिहायचे होते............ह्या कवितेचा ए ल दु गो शी काही संबंध नाही Proud
चांगली जमली की कविता Happy

काकाक छान आहे

अवांतर :हल्ली कविता वाचायचा उत्साह नसतो पण मीच तुला लिंक पाठवलेली असल्याने वाचली. धन्यवाद माझेच Happy

Lol

पहिला वाचक ......... पहिला प्रतिसाद

असं लिहायचं होतं. त्याआधी सहज रिफ्रेश केलं तर मी पहिली दुसरी काय, चांगली ५ वी प्रतिसादक आहे. Happy

स्मितू, ____________________________/\_____________________________. Rofl

मला तरी ही एका "पहिलटकर्‍याची" दुसरी गोष्ट वाटतीय. Lol

Pages