पुरुष आणि डुक्कर..!!

Submitted by धुंद रवी on 13 June, 2012 - 02:53

माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते.

परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की
....................................पलिकडच्या चिखालातल एक डुक्कर लाजलं
आणि एका बाईकड़े बघून लाजला म्हणुन
....................................त्याच्या बाइकोशी त्याचं वाजलं

ती डुकरीण डुकराला म्हणाली
अरे लाज वाटते का तुला...? काल तर म्हणालास की माझ्या सोबत खुष आहेस
पण तू काही सुधारणार नाहीस
डुक्कर कसला.... .......................पुरुष आहेस !

तिनी त्याला पुरुष म्हणू दे किंवा हीनी मला डुक्कर
ही तर प्रेमाची हाक आहे.
पण माणुस व्हा नाहीतर डुक्कर
शेवटी बायको म्हणजे धाक आहे...

धुंद रवी

डिस्क्लेमर :
कुठल्या जिवंत अथवा लग्न करुन मृत झालेल्या डुकराशी काहीही संबंध नाही. असल्यास तो योगायोग समजावा. Proud

डुकरिणी मोर्चा काढायच्या हे वाचून , हल्ली काही सांगता येत नाही

काकाकचा संदेश छान आहे

सार्‍या जगात जर का काही विशेष आहे
माझी मिसेस आहे माझी मिसेस आहे

हा म भा चव्हाणांचा शेर आठवला

Proud

@ बागुलबुवा.

तुला बरोबर आठवतय. खुप जुनी कविता आहे माझी. (लग्नाआधीची) Proud
मध्ये ही कविता मेलवर फिरत होती. कुणीतरी त्यावर चित्रही टाकली होती.
Happy

फारच डुकराळ कविता आहे. Proud
समस्त पुरुषजात आणि डुक्कर यांच्यात साधर्म्य असल्याचा आरोप करणार्‍या या कविचा जाहीर निषेध. यांना चिखलात लोळवून यांची त्याच्याच बायकोकडून धुलाई करविण्यात यावी असा फतवा काढण्यात येत आहे. Proud

<<<यांना चिखलात लोळवून यांची त्याच्याच बायकोकडून धुलाई करविण्यात यावी असा फतवा काढण्यात येत आहे. >>
उलट्या क्रमाने केलं तरी चालेल...

पुरुषांची सहिष्णुता Biggrin
जरा वेगळं लिहायचं ठरवलं असतं तर कवीच्या नावामागे स्व. ही उपाधी लागली असती Proud

परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की
>> खुप जुनी कविता आहे माझी. (लग्नाआधीची)

म्हणजे परिक्षा (लग्न) देण्याआधी बराच अभ्यास केला दिसतोय Proud

आधी वाचलीये कुठेतरी.
>>> +१

ही रवीची आहे हे आताच कळले Happy

कविता तर कविता आणि त्यावरचे प्रतिसाद Rofl

डुकराळ >>> कौतुक Lol

चित्रात लोटांगण घातलेल्या माणसाच्या बाजुला "भाऊ" का लिहिलेय Proud Light 1

एकंदर काय...... कोणीच डुक्कर आय मिन पुरुष यातून सुटलेला नाही तर Wink

रवि Lol भन्नाट लिहिली आहे कविता. Proud ते बाळ डुक्कुचं चित्रं पण गोडच.

भाऊकाकांनी काढलेलं चित्र नेहमीप्रमाणेच मस्त. फस्सकन हसु येतं बघितलं की. यापुढे यांची व्यंचित्रं एकत्रित करणार आहे त्यांनाच भेट देण्यासाठी.

कौतुक, डुकराळ हे नविनच विशेषण मराठी भाषेला देण्यासाठी आभार. Proud मला फारच आवडला हा नविन शब्द.

Pages