कविता

कविता अन् दाद

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2011 - 06:19

कविता अन् दाद

माझ्या प्रत्येक कवितेची पहिली वाचक
तूच........
तू कविता वाचत असतेस....
अन मी तुझा चेहरा......
तिथेच उमटतो तुझा अभिप्राय,
रुक्ष समीक्षकाचा वा उथळ रसिकतेचा आव न आणता सहज उदगारलं जाणारं... एखादं
वा....
छान...
हं...
फारंच मस्त जमलीये......
मोजकेच शब्द, पण माझ्यासाठी....जमली का नाही हे नेमके सूचित करणारे....

कधी तुला त्रस्त करते एखादी शारीरिक व्याधी
पण त्या व्याधीपेक्षा तू जास्त खिन्न होतेस माझी व मुलींची आबाळ होताना पाहून
अन्
आपसूकच होतो मी आई...
तू मुलगी....
किती कमी काळाकरता हे नातं निर्माण होतं.....

गुलमोहर: 

आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

Submitted by मी मुक्ता.. on 5 March, 2011 - 04:46

"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

गुलमोहर: 

सोनेरी पानं

Submitted by निनाव on 5 March, 2011 - 01:06

सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ?
हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी
अखेर गळतात एक दिवस ते ही
स्वागत पडुन नव्याचे करतात

तरुणाई चे जल्लोषात आगमन मग
करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले
वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस
अटळ सत्यच ते सांगुन जातात

सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना
अवमानात नाही कुठलीच प्रेरणा
उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक
न बोलता बरेच काही सांगुन जातात
ती सोनेरी पानं.

गुलमोहर: 

बघ तुला जमत का ??????

Submitted by sarvya tare on 5 March, 2011 - 00:58

प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?

माझ्या घड्याळाला १००% टाईमावर alaram वाजवायला आठवत
बघ तुला काही त्यातून घेता आल तर............१

प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?
बघ जरा तुला balance संपवायला जमत का......?

कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,
बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल तर.............२

प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?

फुलपाखरा सुद्धा मध असलेलच फुल बरोबर निवडतात,
बघ तुला त्यांच्या सारखा काही करता आल तर...........३.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उत्तर दे ??????????????

Submitted by sarvya tare on 5 March, 2011 - 00:51

माझ्याशी बोलू नकोस
अस म्हणतेस?
मग गपचुप माझ्या मोबाइल
वर misscall का देतेस?

छोट्या छोट्या करणं बरुन
भानडतेस ,
मग स्वताच थोड्या वेळाने
sorry का म्हणतेस?

फिरायला जाऊ असा
म्हणतेस,
मग decide करताना
इतकी का डगमलातेस ?

रस्त्यावर हात पकडू नकोस
अस म्हणतेस,
पण इकती असल्यावर गपचुप
hug कशी करतेस?

माझ नाव तुझ्या सोबत जोडाव
अस म्हणतेस,
मग कॉलेज मधे पोरानी चिडवल्यावर
इतकी का भड़कतेस ?

दुसर्या couple ला पाहून romantice
होतेस,
मग स्वत रोमांस करायला इताकि
का लाजतेस?

माझ्यावर प्रेम करतेस
अस म्हणतेस,
मग तुझ्या आईला का घाबरतेस?

कविता कॉपी च्या आहेत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वप्नजा..

Submitted by के अंजली on 4 March, 2011 - 11:46

चंद्रप्रकाशाने वेडावलेली दुधाळ रात्र..
अंग चोरते लाजून..

मग दुधाळच हासत चंद्र उधळतो
लक्ष चांदण्या तिच्या वाटेत...

सुखावून तिही मोहरते..
फ़ुलते..

धरतीच्या कुशीत शिरते..
रातराणीच्या रुपात अंगागी बहरते..
म्हणून तर रातराणी रात्रीच फ़ुलते..
लक्ष लक्ष सुगंधी चांदण्या लेऊन..

डोळ्यात चंद्राचे स्वप्न घेऊन
जागीच रहाते.....!

गुलमोहर: 

किनारा

Submitted by capgaja on 4 March, 2011 - 06:05

किनारा
भरुन आले आसमंत
किनारा नाही आता दिसत
मखमली वाळूत आज
लाटा पसरती रेशमी प्पयघड्या
जरा लवकर वल्हव नाव आज गड्या

कवेत हेत सारा किनारा
कुरवाळीत सारा समुंदर
वाजवित शीळ येतो वारा
आहे खरा बिलंदर

लाटेवर लाट
प्रत्येकीचा नवा थाट
कधी म्रुदुंग कधी डफाची थाप
कधी उडवी थरकाप
किनारा नाही आता दिसत

आल्या आल्या ढ्गांच्या आगीनगाड्या
परतले पाखरांचे थवे
चंदेरी सोनेरी कापसांचे पुंजके
कही काळे मोजके
कधी बांधती ऊंच मनोरे
कधी ऊछ्आदती नभ सारे
त्यातुन डोकाविते वीज एखादी
सुरु करिते कथ्थक
बाकी येती हात धरुनी
करीती थैयाथक् थक

येतो मग सोसाट्याच वारा
सांडत सांडत बरफाच्या गारा

गुलमोहर: 

मधाळ

Submitted by जया एम on 4 March, 2011 - 05:58

तलम उन्हाचे वस्त्र रेशमी
कुठे सावली नक्षीदार
निळे-जांभळे मोर उमटले
सुवर्णपंखी तालेवार

सुबक कळ्यांचे ओठ मधाचे
ठिबकत काही नवलकथा
झेलून घेई मुकी पाकळी
थेंब सुखाचे टपटपता

कळी पाकळी देठ फुलाचा
खेळ चालतो गोडीचा
मोराच्या डोळ्यात उमटतो
धागा रेशीमओढीचा

ऊन गोड की मऊ सावली
वीण असावी मोरपिशी
मधाळ काठावरी झुकावी
भरात फांदी नाजुकशी...

गुलमोहर: 

कसे जगायचे ?

Submitted by UlhasBhide on 4 March, 2011 - 04:07

कसे जगायचे ?

असेच का कसेबसे आयुष्य हे रेटायचे ?
की सुखाचे क्षण प्रयत्ने त्यातुनी वेचायचे ?

अडथळे आले म्हणूनी का तिथे थबकायचे ?
की तयांना लंघण्याचे मार्ग चोखाळायचे ?

विपुल असते दु:ख म्हणुनी त्यात का डुंबायचे ?
मंथुनी भवसागरा सुखरत्न की मिळवायचे ?

करुण कविता प्रसवुनीया दु:ख का पोसायचे ?
नवरसांनी शिंपुनी की काव्य जोपासायचे ?

लागला कणसूर तरि का मैफिली त्यागायचे ?
घेउनी आलाप ताना की समेवर यायचे ?

भंगल्या स्वप्नासवे का भंगुनीया जायचे ?
छिन्न त्या स्वप्नावशेषां की पुन्हा जोडायचे ?

समजुनीया भार हे आयुष्य का कंठायचे ?

गुलमोहर: 

पाऊस

Submitted by फुले नेत्रा on 3 March, 2011 - 13:21

पाऊस...
किती सांगू याच्याबद्दल,
कविताही कितीतरी झाल्या या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

किती सांगितलं त्याला
बाबा रे निघून जा, निघून जा आणि येऊ नकोस परत
आणि कोण तू..? मी का करू कविता तुझ्यावर..?
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

शेवटी मलाच राहवेना,
घेतला पेन बसले लिहायला
तर शब्दच सुचेना
मग उठले,
म्हटलं किती वेळ वाया घालवू कविता करण्यात या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

पेन बंद करुन मी चटकन उठले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता