रान हिरवे
Submitted by उमेश वैद्य on 9 March, 2011 - 10:38
रान हिरवे
रान हिरवे दोन्हि बाजू
मधे तांबडी रुळ्ली वाट
तुझेच स्मरले केस मोकळे
भांग मधोमध ते घनदाट
सळसळती वार्याने जेंव्हा
फांद्या पाने मुक्त लकेरी
सखे कपाळि तुझ्या हलते
चुकार अवखळ बट सोनेरी
आणि पाहिला पश्चिमेकडे
अस्त रविचा रंगीत गोळा
भालप्रदेशी भिवयांमधुनी
रोज लाविसी कुम्कुम टिळा
उतारावर पहा वाहती
जीवन शिंपित अवखळ पाट
भूल पाडिती नसते विभ्रम
थरथरणारे तुझेच ओठ
दूर चमकती घुमट कशाचे
तिरिप उन्हाची वर सोनेरी
याद कशाची मजला येई
उरोजांची तुझ्या उभारी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा