Submitted by poojas on 9 March, 2011 - 09:09
थकते मन का कधी कुणाच्या आठवणीने व्याकुळ होऊन..
का गजबजते अन्तर्यामी जुन्या स्मृतीन्चे गोकुळ होऊन..?
शिकते मन का नात्यामधल्या हिशोबातली गफलत पाहून ..
घाव सुखाचे सत्यामधले.. सहज उरावर अलगद साहून..?
निघते मन का .. अडखळल्यावर पुनःप्रवासी अलिप्त राहून...
का गदगदते अश्रूसन्गे कोपर्यात एकाकी राहून..?
कळते मन का कधी कुणाचा नितळ निरागस चेहरा पाहून..
अनुभव घेतो निर्णय सारे... आयुष्याच्या समिधा वाहून...!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वेळ-कम बॅक ! तुमची कविता
वेळ-कम बॅक !
तुमची कविता आवडली..
अनुभव घेतो निर्णय सारे... आयुष्याच्या समिधा वाहून...!!! >> चाबूक