परि...... तुझाच गंध आहे
झुळूक वार्याची , रास फुलांची परि तुझाच गंध आहे
तुझेच गाणे , तुझे तराणे मनी जडला हा छंद आहे ||
नभात सजले चांद्ण रातीला नक्षत्रांचे सडे
चंद्राची चांदणी घालते मोहिणी अशी तु धुंद आहे ||
काही ना कळेना , काही ना सुचेना माझेच मी पण हरलो
श्वासाची लय तुझी अन भैरवी जशी एकसंध आहे ||
तुझेच विचार भारले मनी तुझ्याच आठवणी
व्याकुळ माझ्या मनाची कवाडे अजुन बंद आहे ||
ध्यास लागे माझिया मनाला तुझ्याच आर्ततेचा
मनातले हे भाव बिल्लोरी नयनी बंद आहे ||
काय टाकलं त्यानं झोळीत असं?
बिनबापाचं पोर..
अन नशिबाला घोर... !
कसं बसं अंग चोरून जगायचं ठरवलं ,
तर तान्ह्या लेकरासाठी पान्हाही फुटत नाही..
उजेडात मस्तवाल होऊल लोळतो दीस
पण आयुष्याचा तिढा काही सुटता सुटत नाही...
आता,ठरवलं कि काळ्या रातीशीच,
सलगी करायची.. अन भागवायची भुक..
देहाची लावायची बोली बिन्धास्त..
अन बदलायचं जगण्याचं स्वरूप..
सारं काही सुरळीत चालू लागलं,
माझं काय? पण लेकराचं तर भागलं..
दिवसा झग्याची अन झोपडीची ठिगळं
निवांत शिवत बसायचं..
रातच्याला मात्र देहाला रोज
जागोजागी उसवलेलं पहायचं..
आता तुम्हीच सांगा,
माझी दयामरणाची याचिका,
कोण दाखल करणार?
किलबिलते उडते गाणे
सळसळती हिरवी राने
डुलत्या वृक्षांची गाणी
त्या ओळी लिहील्या कोणी ?
गळुनी उडते बेभान
झेलत वारा ये पान
वार्याने शीळ भरलेल्या
त्या ओळी लिहील्या कोणी ?
या दूर दूरच्या लाटा
भीजवीती ओल्या काठा
पदचिन्हे मिरवत पुसत्या
त्या ओळी लिहील्या कोणी ?
पानापानावरच्या अन
ललाटांच्या रेषातून
अदृष्य तरी गुणगुणत्या
त्या ओळी लिहील्या कोणी ?
कळलं का तूला?
त्यांनी म्हणे परवानगी दिलीय...
महिला दिनाची भेटच समज...
आता तू जायला मोकळी...,
............. खुश? 
जायचं तर आहेच गं तूला..
पण इतक्या लवकर नाही हो...
म्हणजे बघ...
हळू हळू तुझी औषधे बंद होणार..
मग अन्न पुरवठा मंदावणार...,
मग त्यांच्यासाठी तूझे अस्तित्व...
फक्त रुम नंबर पुरते मर्यादीत होणार...
मग कदाचित तू जाशीलही..., सुखाने (?)
....
.....
.......
पण काय गं?
तूझ्या जगण्यासाठी...
तुझ्या श्वासासाठी....
तूझ्या असण्यासाठी, धडपडणार्या त्या सख्यांचं काय?
तुझ्या वेदनेला...
मृत्यु हाच अखेरचा पर्याय असेल गं..
पण त्यांच्या प्रेमाला,
तुझ्यावरल्या मायेला...
सगळ्या रसिक वाचकान्ना महिला दिनाच्या शुभेछा !!
मायबोलीच्या माध्यमातुन
बोलते व्यथित माय !
मराठी मायबोलीवर जमली
ईन्ग्लिशची साय !
साय शब्द समजेल का?
समजेल का मलई ?
कारण मराठीला पितळ समजुन
इन्ग्लिश ने केली कल्हई!
मराठी नाही पितळ
ते आहे असली सोन
डोलर , पोउन्ड च्या गदारोळात
हरवल मराठी नाण!
विसरु नका त्याला
घेतला जरी इन्ग्लिश चा आधार
सु-सन्स्क्रुत करा मुल
हेच सान्गणे त्रिवार!
महिला नाही अबला
त्या तर सबला,
ह्याच साठी दिला तुम्हाला इन्ग्लिशचा दाखला!
पुरुष प्रधान सन्स्क्रुतित ,
पुरुष राहिले प्रधानच
स्त्रीया ठरल्या राणी
हेच सान्गतो ईतिहास
आपल्या माय बहीणी
खरी खरी साथ दे (Valentine day special)
(सर्व मित्रांना प्रेमळ विनंती)
आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे
हा महिलादिन भक्तीचा
एक सलाम .. सक्तीचा..
उदो उदो ... स्त्रीमुक्तीचा
अवघ्या नारी शक्तीचा
आज तूच ग गौरी
शब्दांनी सजवलेली
आजपुरतीच तुला,
मखरात बसवलेली
तुझी ममता तुझी माया
तुझे वात्सल्य तुझी छाया
आजपुरतेच सा-यांना कळले
रोज जाते जे व्यर्थ-वाया
तुझी कर्तव्य, तुझे त्याग
आज काय हवे ते माग
आजपुरतेच चंदन लेप
रोज मात्र पलित्याचे डाग
हे सारे शब्दांचेच खेळ
गोड गोड बोलणारे ओठ
उद्या प्यायचेत ग पुन्हा
मुकाट ते विषारी घोट
'महिलादिन' आज होऊदे साजरा
उद्यापासून आहे रोजचेच रडे..
पाठव पाठव, तुही ते एसेमेस...
"शंभर अपराधी सुटले तरी चालेल,
पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये"
माणसांचा हा साधा नियम त्या नियंत्याला पाळता आला नाही.
....
......
पुराण, संतसाहीत्य, अध्यात्माच्या कथा...
पाप-पुण्याचा घडा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक असल्या अचाट कल्पना...
कशाकशावर पोसलेल्या आमच्या या संस्काराना, संस्कृतीला आणि जाणिवाना,
या सगळ्यांसोबत तू त्या नियंत्यालाच आव्हान दिलयस,
याची कल्पना आहे का तुला ?
...
....
तुझ्या येणार्या प्रत्येक दिवसाचा प्रदिर्घ प्रवास...
तू न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा...
हा तुझा नाही ग... त्याचाच नाईलाज आहे.
(सर्व मायबोलीकर महिलांना वंदन आणि शुभेच्छा !!
)
वत्सले सदा तू धारित्रीच गुणाची
सृजनाची गाथा
माता भगिनी भार्या युगपुरुषाची
"नमितो मी तुज तुजपुढती चरणांवरती ठेवित माथा,
ऋण बांधुन गाठी स्मरतो आपुली ज्ञाती"
ओढाळ स्वरांनी गातो गीत विधाता...
..................................अज्ञात