तोच मी

Submitted by उमेश वैद्य on 9 March, 2011 - 09:27

शब्द फुलांना बहर येता
मीच फुले वेचणारा
पश्चिमेकडे सांज भेटता
तिच्या वरती उधळणारा

या उघड्या माळावरती
मीच वारा पिसाटणारा
याच येथल्या मातीवरती
थेंब नभीचा टपटपणारा

रुधिरा संगे मीच 'त्याच्या'
धमनी मधुनी सळसळणारा
सर्द 'तिच्या' डोळ्यांमधुनी
गालावरती ओघळणारा

मीच आईच्या स्तनांमधुनी
दूध होऊनि पाझरणारा
अग्नी होऊनि तुझया चितेवर
मीच आहे वावरणारा......

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: