Submitted by कारागिर on 10 March, 2011 - 05:33
घट्ट मिठितील गंध तुझा
भान माझे हरपुन जातो
मि पण मग पोरका होउन
त्या गंधाला बिलगुन घेतो.
आठवणितला स्पर्श तुझा
शब्द माझे पळवुन नेतो
मि पण मग कावरा होउन
पुढचा घोट हाळूच घेतो.
जरी आज नाही सहवास तुझा
दिल्या क्षणास्तव ऋणि राहतो
मि पण मग अरशासमोर
स्वता: मध्ये तुला पाहतो.
गुलमोहर:
शेअर करा
व्वा! मस्तच! आशय खूप आवडला
व्वा!
मस्तच!
आशय खूप आवडला कारागिरराव!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!