मलाही कधीतरी वाटायचे,
कोणितरी आपल्याकडे पहावे,
गालातल्या गालात हसावे,
प्रेमाचे धडे गिरवावे
दिवस हि तो आला सत्वरी,
माझ्याही आयुष्यात आली एक परी,
कोण कुठली ठाउक नव्हती ती सुंदरी,
हृदयाला घायाळ करून गेली तरी
करीत होता लपंडाव नजरे-मनाचा खेळ,
मैत्रीचे नाते गुंफन्यास लागला नाही वेळ,
तीच्या-माझ्या हृदयाचा चांगलाच जमला मेळ,
दर्शन न होता एकमेका, मनाची होई घालमेळ
तीच्या बोलण्यातले शब्द मला होते काही सांगत,
पण त्या शब्दाचे कोडे मला नव्हते उमगत,
प्रेमाची भाषा तिची नजर होती बोलत,
पण या "अद्न्याला" नजरेचा अर्थच नव्हता कळत
प्रेमाचा अथांग सागर तिच्या हृदयातून होता वाहत,
म्हणून चार चौघाची नजर चुकवून ती मला होती पाहत,
मलाही कळून चुकली तिच्या मनातली चाहत,
समोर आल्यावर मात्र मुखातला शब्द मुखातच होता राहत
मैत्रीचे १०० sms करताना अर्थ मात्र वेगळाच होता,
एकमेकांना समझवताना मात्र तो मैत्रीचा एक भाग होता,
आमची प्रत्येक अदा, नखरा आम्हालाच लाजवत होता,
प्रेम व्यक्त करण्याची समीप आली घटका हेच खुणावत होता
पाहुनी अमुच रुबाब, तोरा अन् सौजन्याची ऐट,
मित्रानीच घडवून आनली अमुची "मणिकांचन" भेट,
सावरून मनाची कालवाकालव, ठरवले आज विचारेन थेट,
या प्रेमयुद्धाचा करून टाकीन एकदाचा चेकमेट
बांधून मनाशी चंग म्हणालो प्रश्न विचारू का एक खडतर,
उमटली झळाली चेहरयावरती, लाजून म्हणे नको आता जरतर,
तिच्या-माझ्यात होते, फक्त एका शब्दाचेच अंतर,
पण वदनातून शब्द निघाले, आता नाही सांगेन कधी नंतर
नंतर नंतर करता करता वर्ष एकदाचे सरले,
गोड-गुलाबी आठवणीवर विस्मृतीचे धुके विखुरले,
येत आठवण त्या क्षणाची आसवांनी डोळे भरले,
अव्यक्त प्रेमाची गुंज कधीच वारयामध्ये फिरले
मला बोचते एकच खंत, ज्याने डोळ्यात येई पाणी,
हसरया मनाची अशी का झाली स्थीती केविलवाणी,
का घडली माझ्यासम हि " एक अधुरी कहाणी ",
जीवन माझे करून गेली जी उदास विराणी........
---------------------------------------- हसमुख..........
आवडली ख़रच माझं
आवडली
ख़रच
माझं
ही
असचं
झाले
होते.
तिला
ख़ूप ख़ूप (miss karto)
@ पवनघुटुकडे खरेय !!! मी
@ पवनघुटुकडे
खरेय !!! मी सुद्धा ......... म्हणूनच हि कविता मनात अलगद तरळून गेली..........
सही
सही