काल पाहिली मी तिला...........

Submitted by अमोल परब on 21 March, 2011 - 10:27

काल पाहिली मी तिला
पावसात चिंब भिजलेली
माळुन अगणित मोती
इंद्रधनुत सजलेली..............

काल पाहिली मी तिला
पहाटेच्या धुक्यात वेढलेली
ओझरत्या स्पर्शाने तिच्या
ही हवा गुलाबी झालेली........

काल पाहिली मी तिला
चांदण्यात निजलेली
तिच्या स्वप्नांच्या दुनियेत
सारी रात्र रमलेली..............

काल पाहिली मी तिला
क्षितिजावर विसावलेली
सांज उतरुन गेल्यावरही
संधिप्रकाशात उरलेली............

गुलमोहर: