ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

Submitted by harish_dangat on 23 March, 2011 - 00:19

भावड्या, ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय
आडंनिडं सारं जसा, माजराच्या गळ्यात कुत्र्याचा पाय

आधी म्हटली समदीकडं हाये रिसेशान
आता म्हणती भारी झालय इन्फ्लीशान
रेशनच्या रांगेत लोकं रडती धाय धाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

अर्थमंत्री तिकडं, आय-एम-फच्या घरी पाणी भरी
वर्ल्डबँक पाण्यातल्या म्हशीचा सौदा करी
तरी बजेट दरसाली बोंबलत तूटीत जाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

कम्युनीस्ट तिकडं बसलाय, लावून लाल गोंडा
आपल्याच पायवर हाणतोय, भलामोठा धोंडा
समाजसेवेसाठी फिरवतोय, भांडवलदाराची बाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

काय बी म्हण पर, पैसा म्हंजी कागदाचा तुकडा
हाये त्याला मिळती पोळी, नाही त्याला भुकडा
पैशापायी पोरं इसरती आपली बाप आणि माय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

-हरीश दांगट

गुलमोहर: