Submitted by harish_dangat on 24 March, 2011 - 02:19
(ज्या बायकांचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आहे त्यांनी हे स्तोत्राचे पठण करावे)
हे प्रभूजी दयाधना
येउदे तुझीया मना
सून बरी मिळूदे
हीच एक प्रार्थना
पुत्रास असावी जोड
सून अशी असावी गोड
परी नसूदे तिला जराही
तिच्या माहेराची ओढ
नवर्यास नसावा धाक
उभी असावी मारता हाक
अशी एक सून देवा
माझ्या पदरात टाक
सून असो दिसाया छान
कर्तुत्व आणि गुणवाण
एवढे सारे असूनही
माझा राखावा मान
नोकरी असावी न्यारी
पगार असावा भारी
महीन्याच्या शेवटाला
रक्कम हाती द्यावी सारी
शेजार्यांकडे नको जाणे
बाहेरचे न चरबट खाणे
भिशीची मिटींग असता
गावे एक मंजुळ गाणे
वागण्यात हवा धरबंध
टी.व्ही चा नको छंद
बाहेर फॅशन काय आहे
हिला मुळी नसावा गंध
असावी दुभती गाय
परी न झाडावा पाय
चपळ अशी असावी
मोलकरणीवरी उपाय
एवढेच मागते देवा
येताना आणावा ठेवा
मैत्रीणींना माझ्या सार्या
वाटावा माझा हेवा
-हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
अशी सून येता घरी नवर्याला
अशी सून येता घरी
नवर्याला मुठीत धरी
स्त्री विरुद्ध स्त्री लढ्यात
सासू त्वरीत जाई वरी..
टी.व्ही चा नको छंद >> हल्ली
टी.व्ही चा नको छंद
>> हल्ली हे महत्त्वाचे वाटते.
वा.वा..वा... क्या बात
वा.वा..वा... क्या बात है--
झकास जमलीय
बहुगुणी, आखुडशिंगी, भरपूर दुध
बहुगुणी, आखुडशिंगी, भरपूर दुध देणारी आणि स्वस्तातली म्हैस सगळ्यांनाच हवी असते