ती कधिच न्हवती

Submitted by कारागिर on 22 March, 2011 - 07:52

माझे मन तिला कधी कळले, कधी नाही कळले
पण ती नाही मिळाली, ती कधीही न्हवती.

मि तीला रस्त्यात गाठलं, कॉलेजात गाठलं
घरात, दारात, ईथे, तीथे
सगळिकडे पकडलं, पण ती नाही मिळाली
ती कधीही न्हवती.

मि तीला उन्हात, पावसात
दिवसा, रात्री,
याच्यात त्याच्यत, सगळ्यात पाहिलं
बघुन हासलो
स्पर्श केले,
तीनी कधि स्पर्श केले, कधि नाही केले
पण तरीही ती नाहीच मिळाली
ती कधीही न्हवती.

मि खुप प्रेम केलं तीच्यावर
हळुवार
कचाकच
शरिराच्या वळणा-वळणाला
खोबणि-खोबणिला हात घातला
पण ती नाहीच मिळाली
ती कधीही न्हवती.

मग मात्र मि भंजाळलो
तीला थोबाडलं, कांठाळलं
मनगट पिरगाळलं
म्हणालो बिच
म्हणालो होअर
ती ही म्हणाली बरच काही
पण ती कधीही न्हवती.
जीथे ती आहे असं मला वाटायचं
किंवा जीथे ती आहे असं ती म्हणायची.

तीचं फेसबुक हॅक केलं
मिच प्रकट होउ लागलो
तीच्या प्रोफाईल मधुन
तर ती तीथेही नाही मिळाली
तीच्या मेल बॉक्स मधे घुसुन
पत्रांचे ढिगारे उपसले
तीथेही नाही.

ती रुमवर आहे असं ऐकलं
तीथे हि न्हवती.
जुन्या घरी गेलीये म्हणे
तीथे हि नाही.
आई कडे गेलिये काहि दिवस
तीथे ही नसेलच.

ती उद्या अमेरीकेला जाईल
तीथे हि नसेल
तील नविन नाती फुट्तील
तीथे हि नसेल.

आशा प्रकारे ती कुठेही नसते
हे अता मला कळुन चुकलय
सो मि माझ्या घरातलं, आयुष्यातलं, भुतकाळतलं
तीचं अस्तित्व आता नाकारतोय
ती आहे आहे
ती होती होती
असं जे काहि मला वाटायचं
ते खोटं होतं
तीचं असणं नसणं
म्हणजे तीचं नसणं असतं

ती नाहीये
ती न्हवती
ती कधिच नसते
आता मोकळ वाट्तयं.

गुलमोहर: