हा मी आलोच बघ....!!!!

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 March, 2011 - 08:31

थेट दारात येवून ठेपलास तू
मी दरवाजा बंद करायच्या आधीच...
हलकेच एक पाऊल आत टाकत...
पाठीवर थाप मारत मस्तीत म्हणालास,
"आलो रे मित्रा, सगळे प्रश्न संपवायला!"
आता सगळं माझ्यावर सोपव यार...
सोड नाद त्या अज्ञात प्रश्नांच्या उत्तरांचा,
खरेतर उत्तरे सापडणे महत्त्वाचे नाहीच आहे रे
महत्त्वाचं आहे ते त्यांचा शोध घेणं, ते तू केलंस..
आता पुढचं माझ्यावर सोपव, बिनधास्तपणे!

'खरंय मित्रा'
थोडंसं संकोचून म्हणालो मी...,
'अगदी खरंय तूझं!'
सगळे प्रश्न तूझ्यापाशी येवून संपतात शेवटी!
पण तूच म्हणालास ना? 'शोध महत्त्वाचा'.....
मग शोधच संपला की तूझा उपयोग तो काय?

बस्स, एवढ्या एकाच प्रश्नाचं....
अखेरच्या प्रश्नाचं.., उत्तर दे मला....
कीं हा मी आलोच बघ....!!!!

विशाल.....

गुलमोहर: 

Happy

तोडलंस आणि जिंकलंस मित्रा !
मोजक्या शब्दात मांडलंस ते जास्त भावलं. शिकण्यासारखं आहे.
पुढचा शब्द (विषय) :- लाघवी.
मुक्तछंदच हवा.