कादंबरी

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 11 May, 2010 - 01:06

दोन दिवसांनी शुद्धीवर आलेल्या समीरने पुटपुटत सांगीतले. रस्त्यापलीकडे तो काही टेबलांवरचे उरलेले अन्न टाकायला गेला होता. पण तो खोटे बोलत आहे हे चाचा, अबू अन पद्या या तिघांनाही समजले होते. एकतर मधेच जाऊन अन्न तिथे टाकायची गरज नव्हती. त्यात पुन्हा ते काम सहसा झरीनाचाची करत असे. त्यात पुन्हा अपघात झाला त्यावेळी समीरच्या हातात कोणतेही घमेले वगैरे नव्हते ज्यातून त्याने भांडी किंवा उरलेले अन्न नेलेले असावे.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2010 - 03:01

भुलोबाचा उरूस म्हणजे नुसती धमाल असते हे काजलला समजले. उगाच बकरे कापणे वगैरे प्रकारच तिच्या मनात होते. पण तिथे नुसता धिंगाणा चालला होता. झरीनाचाची जातीने दोघांना सांभाळत वेगवेगळ्या गोष्टी दाखवत होती. छोटा पाळणा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध विक्रेते, सर्वत्र उत्साही आवाज, नंतर होणारी खोटी भांडणे!

आणि... हे सगळे करताना दीपक बरोबर चालायचे! व्वा!

दिपू तर हवेतच तरंगत होता. आपण किती चालतोय, काय करतोय, त्याच्या डोक्यात काहीही नव्हते.

फक्त, काजल... काजल... काजल!

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 6 May, 2010 - 06:34

आज सकाळचा नाश्ता खाणे कमी अन हसणे जास्त असा झाला. अबू म्हणजे एनर्जाईझ करूनच पाठवायचा सगळ्यांना कामावर! पहिल्यांदा रमणने सकाळी सहा वाजताची बातमी दिली.

रमण - सुबह गधा आया था अंदर.. छे बजे.
अबू - भोत दिनो बाद मिले होंगे तुम भाय भाय

चाचा हसला नाही. पद्याने ऑम्लेट्स करताना वळून नीट पाहिले. पण ओठही हालले नाहीत चाचाचे!

रमण - दो चार रट्टे मारकर भगादिया...
अबू - सौतेला था क्या??

गाढव घुसलं होतं याच्याकडे कुणाच लक्षंच जात नव्हतं! अबू काय बोलतो हेच ऐकत बसले होते सगळे! पण बाकी कोणीही वाट्टेल त्याची थट्टा करायचे नाही. असे बोलणे हा अधिकार फक्त अबूचा आहे हे सगळ्यांना माहीत होतं!

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 5 May, 2010 - 15:11

स्स्स्स्स्स्स्स्स्साला! असं असतं होय प्रेम???

आं??

प्रेम असं असतं??

हे एक नवीनच च्यायला! काय तर म्हणे प्रेम! बर झालं! आजवर माहितीच नव्हतं! नायतर लय हालत ब्येक्कार झाली असती आपली!

एक सालं कळत नाय! तोच माणूस, तेच जीवन, सगळं तेच! मग मुलीच का अशा वाटतात???

हा विकी इथे बसलाय, हा अबूबकर.. नाय.. म्हाताराय.. पण आहे.. इथे बसलाय.. तो समीर फिरतोय... झिल्या वाट्टेल ती ऑर्डर देऊन जातोय... काय नाय... ** यांच्याबद्दल काय वाटत नय

मुलीच का अशा असतात???

गोड... गुलाबी.. नुसतं आपलं बघतच राहावं अशा.. सगळी कामं सोडून.. काय असतं काय त्यांच्यात???

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 4 May, 2010 - 05:56

ढाब्याच्या इतिहासात प्रथमच एका ढाब्याशी संबंधितही नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर ढाबा अर्धा दिवस बंद ठेवण्यात आला होता. अर्धा दिवस म्हणजे सकाळी चालू ठेवून दुपारी चारला बंद केला तो एकदम दुसर्‍याच दिवशी उघडणार होता.

सकाळी नऊ वाजता अब्दुलचे दफन करण्यात आले. झरीनाचाचीच्या वस्तीवर तो राहायला आल्यापासून सगळ्यांना एक बेवडा म्हणूनच माहीत होता. पण चाचीच्या मुलाला मात्र अंधुकपणे अब्दुलची कथा त्याच्या लडखडत्या बोलण्यातून समजली होती. मेहरुन्निसा हे नाव अब्दुलच्या बोलण्यात आलेले त्याने ऐकले होते.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 3 May, 2010 - 06:55

दिप्याला न्यायला अचानक त्याची आली होती या घटनेचा परिणाम सगळ्यांच्या मनावर खोलवर झाला होता. ढाबा चालू असूनही जो तो आपापल्या मनात अंतर्मुख होऊन विचार करत होता. दिपूला न्यायला आज त्याची आई आली. तिनेच त्याला हाकलले होते. ती त्याची सावत्र आई होती. त्याला जायचे नव्हतेच. पण आई निघाली तसा तो किती रडला.

वय कितीही असले तरी आई नसण्याचे दु:ख तितकेच तीव्र असते. दिपू तर पंधरा वर्षांचा होता. त्याला आई होतीही! पण दिपू गेला नव्हता.

प्रत्येक जण भटारखान्यात वारंवार जाऊन दिपूकडे बघून येत होता. तो रडत तर नाही ना? काम करतोय की उदासवाणा बसलाय...

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2010 - 06:38

आरसा नावाची वस्तू आयुष्यात अत्यंत महत्वाची असते हा सिद्धांत दीपक अण्णू वाठारे यांनी केवळ सव्वा तासात अंगिकारला होता.

पद्या आल्यानंतर त्याची कहाणी समजून घेण्यात, आश्चर्य व्यक्त करण्यात आणि त्यावर चर्चेचा गदारोळ उठवून त्याचा कंटाळा आल्यावर ढाब्याच्या कामाला लागण्यात जो काही एक तास गेला तो एक तास संपता संपता अचानक घडलेल्या एका घटनेने ढाबा हा ढाबा नसून नंदनवन आहे व त्यात एकच अप्सरा आहे ही अनुभुती अबू, गणपतचाचा, अब्दुल अन पद्या सोडून इतर सगळ्यांनी घेतली.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2010 - 23:12

ऑक्टोबर महिन्याचा सूर्य सकाळी साडे सात पासून जमीनीचा कण कण जाळत होता. सहा महिन्यांमधे काशीनाथ का गेला असावा ही चर्चा तर राहोच, काशीनाथ निघून गेला हा विषयही निघणे बंद झाले होते. कारण नवीनच धक्का बसला होता अबूला अन चाचाला. सगळ्यांनाच!

चवदा वर्षांचं पोरगं हातात पुरेसा जोर नसल्यामुळे पातेली उचलणे वगैरे कामे एकट्याने करू शकत नसले तरीही ... एक पदार्थ नव्हता जो दिपूने करायचा ठेवला होता अन एक पदार्थ नव्हता ज्याला दिपूने आणलेली चव आजवर अबू आणू शकला होता. त्याने फक्त सर्व भाज्यांमधे किंचितच साखर व चिंच घालायला सुरुवात केली होती. अगदी मांसाहारीमधेही!

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2010 - 07:10

अबूच्या प्रसंगाने निर्माण झालेले दु:खाचे सावट जायला काहीही वेळ लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी एक विचित्र पात्र ढाब्यावर प्रकट झाले. गणपतचाचाशी ते पात्र बोलत असताना सगळे हळूहळू तिथे जमू लागले. पोरे एकमेकांकडे बघून खाणाखुणा करून, डोळे मिचकावून हसू दाबत होती. त्या पात्राचे म्हणणे असे होते की नाशिकमधील द्वारका विभागातील एका हॉटेलवर तो आचार्‍याचे काम करतो आणि शाकाहारी डिशेस ही त्याची खासियत आहे. पणं ते हॉटेल आता बंद होणार असल्याने त्याला नोकरी हवी आहे व नाशिकमधील घराचे भाडे परवडणार नसल्याने कुटुंबासकट आडगावीच जाऊन राहण्याची त्याची इच्छा आहे.

गुलमोहर: 

हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2010 - 11:37

दहा दिवस नुसता धिंगाणा चालला होता. एका बाजूला गणपती होता. त्या बाजूची कस्टमरची टेबलं दहा दिवसांसाठी रद्द झाली होती. त्यातील काही अंगणात डावीकडे लावण्यात आली होती. गणपतीमधे चिकन अन मटन बंद करणे शक्य नव्हते. कारण ढाब्याचा सत्तर टक्के गल्ला मांसाहारी खाण्यामुळे भरायचा. पण गणपती असलेल्या भागात मांसाहारास व मांसाहारी लोकांना सक्त बंदी होती. मद्यपान बंद ठेवलेले होते. सायंकाळी आरती व्हायची. अबू गंमतीने म्हणायचा, गणपत गणपतीकी आरती कर रहा असे! अबू स्वत: रोजच्यारोज मांसाहारी पदार्थ बनवत असूनही भटारखान्यातच उभा राहूनच आरतीच्या वेळी जोरजोरात टाळ्या वाजवायचा.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी