हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2010 - 11:37

दहा दिवस नुसता धिंगाणा चालला होता. एका बाजूला गणपती होता. त्या बाजूची कस्टमरची टेबलं दहा दिवसांसाठी रद्द झाली होती. त्यातील काही अंगणात डावीकडे लावण्यात आली होती. गणपतीमधे चिकन अन मटन बंद करणे शक्य नव्हते. कारण ढाब्याचा सत्तर टक्के गल्ला मांसाहारी खाण्यामुळे भरायचा. पण गणपती असलेल्या भागात मांसाहारास व मांसाहारी लोकांना सक्त बंदी होती. मद्यपान बंद ठेवलेले होते. सायंकाळी आरती व्हायची. अबू गंमतीने म्हणायचा, गणपत गणपतीकी आरती कर रहा असे! अबू स्वत: रोजच्यारोज मांसाहारी पदार्थ बनवत असूनही भटारखान्यातच उभा राहूनच आरतीच्या वेळी जोरजोरात टाळ्या वाजवायचा. काही भाविक ग्राहक नमस्कार करून सुट्टी नाणी वगैरे ठेवून जायचे. दहा दिवसांनंतर विसर्जनाच्यावेळेस ढाब्याचा यच्चयावत स्टाफ़ नाचला. मागच्या ओढ्यात लहान मूर्ती विसर्जीत केली. झरीनाचाची अन तिचा मुलगाही नाचले. अब्दुल पंक्चरवाल्याने दहा दिवस सकाळचे मद्यपान बंद केले होते. मी फ़क्त रात्रीच पिणार असे म्हणत होता. पद्या लक्ष ठेवून होता. पण अब्दुलने खरच सकाळी घेतली नाही. गणपतचाचाला दिपूने पहिल्यांदाच नाचताना पाहिले. नाचतानाही तो हसत नव्हता. गंभीरपणे नाचत होता. आणि.... नाचताना सारखा अबूकडे लक्ष देऊन होता.

का ते माहीत नाही, पण विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून अबू गप्प होता. आणि विकी, बाळ्या, समीर आणि झिल्या या चौघांनीही दिपूला सांगीतले होते की दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी अबू गप्पच असतो. त्याला गणपतीचे विसर्जन केलेले आवडत नाही.

लोकमान्य टिळकांना समजायला पाहिजे होते. त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू निदान एका ठिकाणी तरी साध्य झाला होता.

अकराव्या दिवशी मात्र दाबून पार्टी झाली. अब्दुल सकाळपासून ढाब्याच्या मागच्या बाजूच्या खोल्यांसमोरच पडून होता. वाट्टेल तसे पीत होता. झरीनाचाची त्याच्याकडे बघून हसत होती. आज सायंकाळी पाचपासून ढाबा उद्या सकाळी नऊपर्यंत ढाबा बंद राहणार होता. झरीनाचाचीचा मुलगा तीन ससे घेऊन आला होता.

त्याच ओढ्यात बाळ्याने एक चांगला दोन किलोचा मासा पकडला. मग मासेमारीतच एक तास गेला. कुणाला फ़ारसे काही मिळाले नाही. पण सगळे खुष होते.

मग सात वाजता गणपतचाचाने त्याची आवडती ओल्ड मंकची फ़ुल्ल बाटली उघडली. एकीकडे झरीनाचाचीचा मुलगा चविष्ट पदार्थ बनवत होता. एकीकडे तो गाणी म्हणत होता. पद्या नुसताच त्या बाटलीकडे बघत होता. झरीनाचाची स्वत: असल्याने तिच्या मुलाला घेता आली नाही. पण झरीनाचाचीने मात्र थोडी ओल्ड मंक घ्यायची इच्छा दर्शवली. मग अब्दुलने आपल्याकडचा नवीन खंबा काढला.

अंधार केव्हाच झाला होता. आता सगळे गोल करून बसले होते. अबूही त्या गोलातच बसला होता. अब्दुलचा पिण्याचा वेग पाहूनच बाकीची पोरे हादरली होती. गणपत मात्र निवांत होता. अबूला त्यात काहीच विशेष वाटत नव्हते. एकेकाळी अब्दुलला लाज वाटेल अशी अबूने प्यायलेली होती असे सगळे ऐकून होते. फ़क्त गणपत एकटाच ’अनुभवून’ होता. मग अब्दुलने अबूचा विषय काढला.

अब्दुल - अबू?
अबू - अं?
अब्दुल - तुम...... चुप चुप क्युं?

यावर अबू बोलायच्या ऐवजी गणपतचाचाने उत्तर दिले.

चाचा - अब्दुल? तुम आरामसे पियो... अपना अपना पिनेका और मजा लेनेका... इधर उधर नही देखनेका...

पण अब्दुलला नशा झाली होतीच. त्याला काही अबूचे गप्प बसणे पाहवेना. दिपू सोडून सगळ्यांना अबू गणेश विसर्जनाच्या दिवशी गप्प असतो हे माहीत होते. अगदी अब्दुलला स्वत:लाही. पण कारण फ़क्त चाचालाच माहीत असावे. अब्दुल गप्प बसला नाही. त्याने पुन्हा विचारले.

अब्दुल - तुम... पैले लेते थे ना अबू?

या वाक्यावर अबूने उत्तर द्यायला तोंड उघडायच्या आधीच गणपत खाडकन म्हणाला:

चाचा - अब्दुल, यहॊंपे ज्यादा बडबड नय करनेका....

गणपतला असे चर्रकन बोलताना पद्याशिवाय फ़ारसे कुणी पाहिलेलेच नव्हते. सगळे एकदम गंभीर झाले. अब्दुलची बोलती बंद झाली. दिपूही घाबरला. अबूची गंभीर नजर मात्र अंधारलेल्या आकाशाकडे लागली होती. गणेश विसर्जनापासून तो कधी नव्हे इतका गंभीर झालेला होता.

गणपतचाचाला दारू चढल्यामुळे राग येऊन एकदम असा बोलला की काय? बाळ्या, विकी अन झिल्या विचार करत होते. आजवर त्यांनी दोन चार महिन्यातून एकदा त्याला पिताना बघितले होते. पण त्यावेळेस फ़क्त तो आणि अबू असायचे. पद्या मागे कुठेतरी जाऊन हळूच बीअर लावून यायचा. आणि गणपतचाचा असा कधीच बोलायचा नाही.

जेवणखाण सगळेच विसरलेले होते. जो तो गप्प होता. जवळपास पंधरा वीस मिनिटे फ़क्त अब्दुल, गणपतचाचा अन थोड्याफ़ार प्रमाणात झरीनाचाची पीत होते. अचानक विकीने घाबरत घाबरत विचारले.

विकी - गणपती..... डुबानेके टायमपे..... नाचते कायको... है??

या प्रश्नावर खरे तर सगळेच उदास झाले होते. कुणीच बोलेल अशी कुणालाही आशा नव्हती. अबूची गंभीर नजर अजूनही आकाशाकडेच होती. पण काहीही अपेक्षा नसताना अगदी अचानक अबू एकदम खर्जातल्या आवाजात म्हणाला....

अबू - वहीच तो मै भी पुछा करता था...

अबूच्या डोळ्यातील पाणीदारपणा नेहमीचा नसून नुकत्याच आलेल्या आसवांमुळे आहे हे गणपतचाचाला माहीत होते.

खाडकन गणपतचाचा उठला.

चाचा - अबू! चल सोनेको... तू थकगयेला है... चल...

सगळे बघतच बसले होते. अबूबकर थकला असणे शक्यच नव्हते. गणपतचाचाने पिणे थांबवावे असेही काही घडले नव्हते.

झरीनाचाची - बैठ ना गणपत... आज कई दिनोंके बाद बाते हो रहेली है...

झरीनाचाचीचा मुलगा खाली मान घालून बसला होता. आईसमोर दारू मागायची त्याची हिम्मत नव्हती. फ़क्त ती जास्त तर पीत नाही ना एवढे तो बघत होता.

चाचा - नही झरीना... आज नही... फ़िर कभी बैठेंगे...

मात्र, बाळ्याने चूक केली.

बाळ्या - अबू............. आप रो रहे हो???

हा प्रश्न ऐकल्यावर मात्र गणपतचाचा अक्षरश: कडाडला:

चाचा - नालायक, खानेपिनेको मिलताय ना ह्यांपर... फ़िर कायको उंगली करनेका.. अपना अपना रोटी खाके सो नय सकते क्या तुम लोगां??? ऒं? कबसे बोल रहा मै यहॊंपे ज्यादा बडबड नय चाहिये करके... ऒं?

गणपतचाच्याच्या डोळ्यातून आग बरसत होती. अबू मात्र अजूनही आकाशाकडेच नजर लावून होता. आणि बाकीचे सगळे संपूर्ण हादरले होते. दिपूनेच काय, स्वत: पद्यानेही गणपतचाचाचा हा अवतार आजवर पाहिलेला नव्हता. खाडकन पोरे उठली अन आपापल्या खोलीत गेली. अब्दुलची नशा एका क्षणात उतरली होती. झरीनाचाची सगळे आवरायला लागली. तिचा मुलगा आत जाऊन चुली विझवून पुन्हा परत बाहेर आला. गणपतचाचा सगळ्यांकडे पाठ करून उभ्याउभ्याच त्याचा पेग पीत होता. अबूबकर अजूनही होता तिथेच बसलेला होता. सगळी मुले आपापल्या खोल्यांमधे चुपचाप बसून बाहेर काय काय होते याचा कानोसा घेत होती. गुरखा रमण मात्र गावाला गेला होता घरच्या विसर्जनासाठी!

तब्बल दहा मिनिटे सन्नाटा होता. नंतर अचानक काय झाले कुणालाच समजले नाही. कर्कश आवाजात अबू ओरडण्याचा आवाज आला.

अबू - हरामी *****, साला काफ़िर... मार, मार मेरेको... मेरेको मार?? साला औरतपे हाथ उठाता है...

सगळे धावत बाहेर आले. अबूच्या एका हातात कुठलीतरी काठी होती अन तो अंधारात हवेशी बोलत असावा तशा आविर्भावात किंचाळून बोलत होता. गणपतचाचा धावत आला. त्याने अबूला मागून धरले व ढकलत ढकलत अबूच्या खोलीत नेले. पोरे अजून भेदरलेली होती. बराच वेळ गणपतचाचा ’नय अबू.. नय... ऐसा नय करनेका’ असे म्हणत असल्याचा आवाज येत होता. पण त्या खोलीपाशी जायचे धाडस एकात नव्हते. अब्दुल आपली बाटली घेऊन लडखडत्या पावलांनी जाऊ लागला. झरीनाचाचीला तिचा मुलगा घेऊन जाऊ लागला. आणि सगळी पोरे पद्याच्या खोलीत जमली.

समीर - क्या हुवा अबूको पद्या...
प़द्या - रो रहा है अबू
झिल्या - कायको लेकिन?
पद्या - नय मालूम
झिल्या - तेरकोबी नय मालूम..??
पद्या - अंहं!
बाळ्या - मै पयलेच देखा... अबू रो रहा था
पद्या - बोलनेका नय था तुमने.. चाचा कितना गुस्सा होगया
बाळ्या - मेरेको मालूमच नही था... लेकिन... गुस्सा क्युं हुवा चाचा...??

आता दादू मधे पडला.

दादू - कुछ झगडा रहेंगा दोनोका पुराना...
पद्या - किसका??
दादू - चाचा और अबूका...??
पद्या - दिमाग खराब है क्या? जान देदेंगे एक दुसरेके लिये... झगडा तो होहीच नय सकता इनमे...
दादू - फ़िर??
पद्या - गणपती विसर्जनके दिन ऐसाही बैठा रयता वो... बोलताही नही अबू....

तेवढ्यात पुन्हा आवाज आले.

अबू - आज छोड किट्टू... छोड... आज मै कसम तोडदेंगा...
चाचा - नय... ऐसा नय करनेका...
अबू - किसने कसम निभायी है.. छोड...

काहीतरी फ़ार मनापासून बोलायचे असले किंवा अबू फ़ार गंभीर झाला तर तो गणपतचाचाला किट्टू म्हणतो हे पद्याला माहीत होते. त्याने ते पोरांना सांगीतले तोवरच धावाधाव झाल्यासारखा आवाज आला. सगळे जोरात बाहेर आले तेव्हा अबू धावत अब्दुलला अडवत होता. गणपतचाचा पोचायच्या आधी अबूने अब्दुलकडची बाटली सरळ तोंडालाही लावली होती. अबू काय चीज आहे हे अब्दुल तोंड वासून पाहात होता. आणि कित्येक फ़ुटांवर अबूकडे निराशपणे पाहात असलेला गणपतचाचा मटकन खाली बसून आता स्वत: आसवे ढाळत होता. झरीनाचाची अन तिचा मुलगा परत आले होते. हे दृष्य त्यांनी कधीही पाहिले नव्हते. अर्धी बाटली अबूने रॊ लावली आणि खाली घेतली तेव्हा त्याच्या अश्रू ढाळत असलेल्या डोळ्यांमधे रक्त उतरले होते. अत्यंत राहात अब्दुलकडे पाहात तो म्हणाला:

अबू - तू पुछ रहा था ना मै कायको गुमसुम है? आ... इधर आ... सब बताता तेरेको मै...

भेदरलेली पोरे आजूबाजूला गोल करून, झरीनाचाची एका बाजूला चाचरत अबूकडे बघत उभी, तिचा मुलगा इतर पोरांमधे मिसळलेला, अब्दुल अबूसमोर बसलेला आणि अबू सरळ खाली बसला होता... आणि गणपतचाचा मगाशी होता तिथेच.. दहा फ़ुटांवर मान खाली घालून मांडी घालून बसला होता.

जणू बोलायला ताकद मिळावी अशा आविर्भावात अबू बाटली रिकामी करत होता. केवळ पाचच मिनिटात ती बाटली रिकामी झाली. अबू सरळ उठला. भटारखान्यातून त्याने जमा केलेल्या मोठ्या स्टॊकमधून त्याने एक नवीन इंग्लिश बाटली आणली अन पुन्हा अब्दुलसमोर बसला. अबूचा चेहरा पाहूनच पोरे घाबरत होती.

अबू बोलायला लागला.

भावना! आजहीकाच दिन था! बीस साल पयले... मालेगावमे गणेशका विसर्जन पक्का होगया था... हमारी बस्तीमेसें!

सुबहसे लोगां कयरयथे! आज बडा दंगा होएंगा करके... सब डरेले! तब ये पद्या चार पाच साल का होएंगा! अगले मुहल्लेमे घर था इसका...

मुहल्लेमे सुबहसे तैय्यारी करने लगे... तलवारी लाये... छुरी लाये.... बडे बडे हथियार लाये सब अपने अपने घरपे...

मै... मै लानेवाला नय था... लेकिन जमीर बोला... जमीर मेरा सौतेला भाई... मै पच्चीस साल का था.. वो होएंगा अठराह साल का...

वो बोला... कोई मारनेकेवास्ते आयेंगा तो?.. खुदको महफ़ुझ तो रखनेकाच है ना...???

करके दो तलवार लाया घरपे... मैने फ़ेकद्या भाईर...झगडा हुवा... अब्बाने जमीरको समझाया... मा उसकी सगी मा है...उसने नय समझाया.. बोली बच्चा शेर है... शेरजैसाही काम करेगा... तो तलवार छुपाके घरमे रखद्या...

गाय काटी थी... सुबहही... उसकी हड्डीया रख्खी थी एक बडे थैली मे लोगांने..

हड्डिया फ़ेकनेवाले थे... गणेशके उपर....

फ़िर मै मुहल्लेमे दो चारसे मिला... बुढ्ढे बुजुर्ग थे... मैने कहा... ये सब गलत है.. किसीका कोई भगवान किसीका कोई...

तो लोगोंको शक आया... मेरेको दो घंटे बंद करके रख्खा एकके घरपे... फ़िर बादमे किसीने छोडा... मै बाहर आया तो...

मुहल्लेमे कोई भाषण कररहेला था... हमारी बस्ती अल्लातालाकी अपनी बस्ती है... यहासे काफ़िर नय जायेगा करके...

लोग चिल्लारहलेले थे... मै घर गया तो...

किट्टू के अब्बा आये थे घरपे...

अब्दुलने मधेच विचारले : - किट्टू कोन?

पुन्हा अबू बोलू लागला...

किट्टू याने ये गणपत... इसके और मेरे घरवाले इसको किट्टू कहते थे... मै भी किट्टूही कहता है इसको.. मेरेसे एक साल छोटा है ये..

मै मदरसेमे सिखता... ये स्कूलमे... इसका घर मेन रोडपे था... हमारा मुहल्लेमे चार घर छोडके.. हम एकसाथ कभी खेलते नय थे...

लेकिन एक दिन अब्बा को दिलका दौरा पडगया... मै दस साल का था... सौतेली मा आके तीन साल हुवे थे... मै रातमे रोडपे अकेलाच जानेको घबराया... लेकिन मा भागके गयी तो मै बी गया उसके साथ... जमीर अब्बाके पास ठहरा... हमको टांगा चाहिये था... अब्बा को अस्पताल ले जानेके लिये..

हम दोनो बहुत भाग रहे थे... खिडकीसे किट्टूके अब्बा देखरहेले थे... उन्हो नीचे आये... उनके पास पुरानी स्कुटर थी... जिसको पाच पय्ये थे और बाजूमे एक सीट... वो अपाहिजोंकी होतीय ना?.. वोवाली... तो लेके आगये घरपे... अब्बाको वो सीटमे बिठाकर हम चारो अस्पताल गये...

दोही दिनमे अब्बा ठीक होके घरपे आगये...

दो घरमे प्यार बढगया... कभी कुछ मीठा बनाया तो अम्मा जाके देनेके लिये बोलती... किट्टूके घरपे मुझे बहुत प्यार मिलता था... किट्टूके घरपे मै उसके साथ खेलसकता था.. बाहर आके हम लोगां नय खेल सकते थे....किट्टूके घरसेबी कुछनाकुछ मीठा आता रहता... फ़िर त्योहारपे एक दुसरेको बधाईबी देते... लेकिन दोनोंके अब्बा और अम्मा एक दुसरेके घर कबी नय जाते... वो मंजूर नय था म्होल्लेमे...

किट्टू एक दिन हमारे घर आया तो अम्माने उसको बहुत प्यारसे खानेको दिया... हम लोग खेलने लग गये... लेकिन जमीर बोला की ये लडका यहा आताय वो उसके दोस्तोंको अच्छा नय लगता... जमीर छोटा था... हमने उसको डांटके भगादिया...

हमारे घरोंकॊ दोस्ती मुहल्लेमें मिसाल बनगयी... कबीकबी तो पोलिटिक्सके सभा, भाषण मुहल्लेमे होते तो हमारे दोनोंके अब्बा स्टेजपे बुलाये जाते... लोग तालिया बजाते... सब कुछ अच्छा था....

तेरा सालमे मालेगावमे दंगलीया कम नय हुवी... बहुत हुई... लेकिन हमारे मुहल्लेतक पहुंचती नय... दूरके दूरही निपटजाती... हमलोगां पेपरमे पढते... बाते करते... मुहल्लेमे तो बहुत लोगां बाते करते...

मै और किट्टू बडे होगये थे... किट्टू कॊलेज जाने लगगया... मै नय गया... मै बिर्याणी बनाके एक हॊटेल था उस्मान नामके आदमीका उसको बेचके आता था.. वो पैसेसे अब्बा और अम्मा खुष होते... मै और किट्टू अबी जादा मिल नही सकते क्युंकी मुहल्लेमे चर्चे जादा होगये थे....

फ़िर उन्ही दिनो मेरेको भावनासे प्यार होगया... मै दिखनेमे ऐसा थाही नय... मै अच्छा दिखता.. गोरा था मै... मेरेपर वो भी भागयी.. हमको एकदुसरेको पता चल गया... फ़िर नजरोंसे बाते होने लग गयी... मुहल्लेमे तो उसको लाही नय सकता था मै... उसके रास्तेसे हमेशा गुजरते रहेता... जब बी कोईबी घरका काम होता... मैहीच करनेको निकलता और उसके घरके सामनेसे होके आता.. उसको सब पता चलगयेला था... वो मुस्कुराती थी... कबी बाल बनाती.. कबी कपडा सुखाने डालते हुवे मेरेको दिखाई देती... लेकिन बात नय हुवी...

फ़िर सालभरके बाद अचानक रास्तेमे सामने आयी.. फ़िर दोनो रुक गये हम अचानक... मै इजहार करना चाहता था... लेकिन उसकी नजरसे तो पता चलगया के नजरोंसे इजहार कबीका होगया था... हम मार्केटमे थे... दो चार बाते होगयी... फ़िर कुछ ना कुछ तरकीबा निकालता मै बी...

फ़िर मार्केटमे दो चार मुलाकाते हुवी..ऐसेही रास्तेपेच..

शादी की बात करनेमे और एक साल लग गया... लेकिन शादी मुमकीन नय थी... दोनोंको पता था.. लेकिन बेताब थे दोनो...

मैने एक दिन किट्टूको सब बताया... किट्टूने तो उलटा अच्छाही बोला.. बोला ऐसी शादी करना मालेगावके लिये मिसाल है...

उसी दिन मैने अब्बाको बताया... घरमे हंगामा खडा किया अम्माने... बोली जमीरको कौन लडकी देगा... मुहल्लेवाले अकेल छोडदेंगे...
कौममे बदनामी होएंगी... अल्ला माफ़ नय करेगा... अब्बा बुढे हो रहे थे.. घरमे सब अम्माका चलने लग गया था...

मैने बोलदिया... मै घर छोडेगा.. लेकिन भावनासेही शादी बनायेगा... तो बहुत झगडा होएंगा ऐसा लग रहेला था.. लेकिन वो सुनके तो अम्मा खुषही होगयी... उसको लगा मै घर छोडेगा तो हिस्साबी नय मांगेंगा... वो मेरेको मंजूर था... दौलततो मैबी कमासकता था...

दो चार दिन और गये... मैने भावनाको बोलदिया... आज रात भागेंगे.. तो वो बोली ऐसा नय करसकती... वो बोली मैने पयले घर छोडनेका... नौकरी करनेका.. फ़िर उसके घर जाके उसके अब्बाको बोलनेका.. अब्बा तय्यार होजायेंगे... ऐसा भागनेका नय...

मेरको ये बी मंजूर था... मैने उस्मानके हॊटेलपेही नौकरी करली.. पहिली तनख्वाह हाथमे आयी तो उसकेलिये फ़ूल लिये थे... अचानक वो रोने लगगयी... बोली उसकी शादी पक्की कररहेले है... अब मेरेको तुरंत उसके अब्बासे मिलने जाना जरूरी था.. लेकिन शहरमे चर्चे थे... आज गणेशविसर्जन है.. आज दंगा है...

हम सब लोगां बहुत डरेले थे... ये गडबड निपटनेके बाद उसके अब्बाको मिलनेका तय हुवा....

लेकिन मै घर गया तो किट्टूके अब्बा हमारे घर आयेले थे... अब्बाको बोलरहे थे के आजके दिन उनको सलामत रहनेका है...

उन्हो अब्बाको बोले आपके घरमे परिवार रख्खो... अब्बाने तुरंत हां करदी... जमीर बाहर था... मां पयले नय बोली... फ़िर अब्बाने उसको याद दिलादी के कैसे उस रातमे इन्हो अपनी जान बचाये... फ़िर अम्मा मान गयी...

शामके पाच बजे मिरवणूक निकलेली ये पता चला.. छे बजेके आसपास हमारे मुहल्लेसे गुजरनेवाली थी.. किट्टूकी पुरी फ़ॆमिली हमारे घरपे छुपी थी... मै बाहर गया था... मेरेको भावना मार्केटमे मिली थी... उसको उसके घरवाले बेताबीसे ढुंढ रहे थे... उनसे छुपाकर आयेली थी मुझसे मिलनेकेवास्ते... हमने कल उसके अब्बासे बात करनेकी तय की और उसको छोडनेके लिये मै उसके घर तक आया...

मिरवणूक वहींपे थी... किसीने कुछ घोषणा देदी.. अचानक किसीने कुछ फ़ेंका.. पुलीस कुछबी नय कर पायी... पुलीस हमलोगांके साथ थी उस वक्त... बहुत मतबल बहुत ज्यादा बडा दंगा हुवा... चार आदमी तो वहींपे मारे गये... क्या हो रहा था किसीको समझमे नय आरहा था.. सब चिल्लारहे थे... इतनी भागाभागी हो रही थी... सब डरेले.. यकायक लोगांने तलवारी निकाल्या...

पत्थर बरसाये... गणेश गिरपडा था... लोग खूनपे उतर आये...

मै और भावना भागके एक कोनेमे खडे रहेके अपनेआपको बचानेकी कोशिशमे थे...

तबी किसीने हमको देखा.. एक लडका और एक हिंदू लडकी साथसाथ??? मै डाढी नय रखता... हिंदूजैसाही दिखता... भावना को वहीच पसंद था...

मुहल्लेके लोगोंने मेरेको पकडा... मेरेको पताही नय था भावनाका क्या कर रहे है...मेरेको स्टिकसे मारे... सरसे खून आया... फ़िर मेरेको किसीने पहचाना.. तब छोडा... इसमे आधा एक मिनीट गया था... मैने होश संभालकर पीछे देखा तो भावना थीही नय...

फ़िर मै इधर उधर बहुत भागा... आधे घंटेतक उसको तलाश करता रहा.. बादमे मिरवणूक बंद करके पुलीसने दुसरे मुहल्लेसे गणेश को निकाला... लोग घोषणा देरहेले थे... मुहल्ला धीरे धीरे शांत होगया...

अगले दिन पता चला...

भावनाको चार लोग एक थेटरके पीछे लेगये थे... वहा उसका सर काटडाला था... और वो सर कचरे मे फ़ेंके दिया था....

मै खतम होगया था.. हमने एक दुसरेके होनेकी कसमे खायी थी.. भावना छोडके गयी.. मेरे वास्ते... क्युंकी मैने उसे मार्केटमे बुलाया था... मेरे वजहसे मरी वो...

मैने खुदकुशी करने गया... बचगया... अब मुहल्ले मे रय नय सकता था... मै और किट्टूने आहिस्ता आहिस्ता मालेगाव छोडदिया... नाशिक आगये... बादमे ये पद्याको इधर लाया... उसके मांबाप उस दंगलमेच मारे गये... किट्टूके मां बाप बादमे नाशिकमेच मर गये... भावनाको मारनेवालोंका कुछ पता नय चला...

तबसे मै शराब पीने लगा... किट्टूने आखिर भावनाकीही कसम देदी और मेरी शराब बंद करवादी... वो मै आजतक नय पिया...

लेकिन मै अब नय सय सकता... मै या तो मरजायेगा या पियेंगा... आजसे कोई रोकेगा नय... मै शराब पियेगा तो भावनाकी मौत सय सकेगा...

एक प्रदीर्घ सन्नाटा पसरलेला होता. झरीनाचाची स्फ़ुंदत होती. अब्दुल गुडघ्यात मान घालून बसलेला होता. सगळी पोरे डोळे फ़ाडून अबूकडे बघत होती. पद्याला आपल्या आईवडिलांचा मृत्यू दंगलीत झाला हे माहीत होतं, पण इतकं सगळं माहीत नव्हतं! गणपतचाचा दूर कपाळाला हात लावून बसला होता.

खूप वेळाने झरीनाचाचीने डोळे पुसत विचारले...

झरीना - लेकिन वो............... लडकीके घरवाले कहां है अबी???

अबूने शुन्यात पाहिल्यासारखे तिच्याकडे पाहात एक हात कोणत्यातरी दिशेला उडवत म्हंटले...

अबू - इसीकी बहन थी भावना.... ये ........... किट्टूकी... !!!

गुलमोहर: