माकड नावाचा एक प्राणी असतो अन तो वाट्टेल तशा उड्या मारू शकतो अन काहीही पळवू शकतो ही अद्भुत माहिती दीपकरावांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. आपल्याकडे पाच वर्षाचे व्हायच्या आधीच मुले ’झू’ पाहून आलेली असतात. निदान चित्र तरी पाहतातच! महुरवाडीत माणसेच झू मधल्या प्राण्यांसारखी दिसायची. आणि ती माणसे जे प्राणी विकायला म्हणून पकडून आणायची त्यात काही पक्षी, बदक, ससा असे पशुपक्षी त्याने पाहिलेले होते. वाघ, सिंह व हत्ती ही नावे तो ऐकून होता. कधीतरी कुणीतरी कुणालातरी ’माकडा’ म्हणायचे तेव्हा त्याला ती एक दर्जेदार व वापरायला सोपी अशी शिवी वाटायची.
भन्नाटच प्रकार होता ढाबा म्हणजे! दिवसातून सहा हक्काच्या बसेस थांबणार. त्यात एक एम्.पी. अन बाकीच्या महाराष्ट्रातील! या बसेसमधून एकंदर सरासरी २२५ पब्लिक उतरणार! त्यातल्या स्त्रिया साधारण ७५ पैकी पंचवीस सोडल्या तरी बाकीचे दिडशे, पावणे दोनशे लोकांमधे निदान सात हजाराची विक्री होणार! कारण या गाड्या सहसा जेवायला म्हणूनच थांबायच्या. सहा कंडक्टर, सहा ड्रायव्हर आणि एम्.पी. चा एक एक्स्ट्रॉ ड्रायव्हर धरून अकरा जण रोज जेवणार! या गाड्या इतर ढाब्यांवर जाऊ नयेत म्हणून या अकरा जणांना बिसलरी पाणी अन एक सरप्राईज डिश हे मिळणार! मुद्दाम समोरच्या बाजूला एक पंक्चरचे दुकान उभे करायला अब्दुलला सांगीतलेले होते.
( एके दिवशी उत्तररात्री कसल्यातरी आवाजाने अचानक आप्पा जागा झाला. नेहमीप्रमाणे बाहेर ओसरीतच वडीलांबरोबर झोपला होता. शेजारी वडील दिसले नाहीत. आत दिवा मात्र दिसला. इतक्यात उजाडण्याची वेळ झालीसुद्धा? एवढ्यात आप्पाला घराच्या दिशेने काही लोक येताना दिसले. त्यात बायकाही होत्या इतकेच त्यांच्याकडील कंदिलाच्या उजेडात कळू शकले. )
हाफ़ राईस....... दाल मारके
असहाय्यता हे एकमेव भांडवल घेऊन जन्माला येणारी बालके जगात असतात याची कल्पना चार भिंतींच्या आड सुखेनैव जीवन व्यतीत करत असलेल्या कनिष्ठ, मध्यम, उच्च मध्यम व उच्च वर्गीयांना फ़क्त पेपर वाचल्यामुळे येते. ती कल्पना येते तेव्हा त्यांच्या हातात टोस्ट बटर असते व त्यांचा मुलगा टिपटॊप पोषाख घालून स्कूलव्हॆनमधून जाताना ’बाय’ म्हणत असतो. झोपडीत राहणारा मजूर असला तरी तोही त्यावेळेला मोफ़त वर्तमानतपत्र असलेल्या खांबापाशी तंबाखू चोळत इतरांशी त्या विषयावर गप्पा झोडून स्वत:तले संवेदनशील मन पुराव्यानिशी सिद्ध करत असतो.
सोलापूर सेक्स स्कँडल - ४८२ पानांची बारा भागांमधे विभागलेली ही कादंबरी २८ दिवसात लिहून झाली. पंचवीस दिवसांपुर्वी, म्हणजे २६ मार्च २०१०ला मी ती मायबोलीवर प्रकाशित करायला सुरुवात केली.
हा शेवटचा भाग आहे.
हेमू, वश्या, जग्या आणि टिकू पाटी बनवायला गेले शेजारच्याच लबेगावात. लबेगाव हे अगदी साधे गाव. राजकारणाच्या नकाशावर या गावाला तशी फारशी किंमत नव्हतीच. आपण बरे आणि आपले काम बरे अशी साधारण वृत्ती होती या गावातल्या लोकांची. तरीही काही टारगट लोक होतेच या गावात. शेतीचे सात-आठ महिने सोडले तर कट्ट्यावर बसून इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणे, येणार्या-जाणार्याला उगाचच प्रश्न विचारून हैराण करणे, कोणी नवीन दिसला तर त्याला काहितरी भाकडकथा सांगून हे लोक पिटाळूनही लावायचे. हे या लोकांचे रिकामपणाचे उद्योग. शेती मात्र प्रामाणिकपणे करायचे. अशा या लबेगावात चौघेही पोहोचले.
रस्त्यातून नाचत सुटावे की हत्ती मागवावा अन साखर वाटावी की सोलापुरातल्या सगळ्या बारमधल्या सगळ्यांची बिले आपण भरावीत हे काही भाऊसाहेबांना समजत नव्हते.
आपल्याला एड्स झालेला नाही हे ऐकून ते आनंदाने पिसाळलेले होते. सकाळच्या मीटिंगमधील अपमान कधीच विसरले होते. सिर सलामत तो पगडी पचास!
तारांकित हॊटेल रेव्हन्सला मध्यरात्री अडीच वाजता आमदार बंडाभाऊ चेक इन झाले तेव्हा त्यांना कधी एकदा पाठ टेकतोय असे झाले होते. उस्मानाबादहून तडक ध्यानीमनी नसताना सोलापूरला यावे लागले होते. तेही केवळ अडीच तीन दिवसात पुन्हा! मधे कुठल्यातरी हायवेवरील चांगल्याशा हॊटेलमधले जेवण सोडले तर बंडाभाऊ सतत गाडीतच बसून प्रवास करत होते. अंग अवघडले होते. त्यातच सचिव माने अन जिल्हाध्यक्ष हेही उद्या पहाटे पोचतायत कळल्यावर आमदारांना आणखीच काळजी पडली होती. आपण अगदी वाजत गाजत इथून परवा गेलो तेव्हा मीना आपल्या या निर्णयाचे सोने करेल असे वाटले होते.
अहिंसा क्रान्ती पक्षाच्या कार्यालयातील हरकाम्या संजय यास आज पहिल्यांदाच इतके अर्जंट काम मिळाले होते. तेही रात्रीचे! नवीन जिल्हा उपप्रमुखांनी चक्क साडे सात वाजता ती सूचना दिली अन साडे नऊ वाजता कामाचा पहिला टप्पा पारही पडला होता. संजयला ’मीना कातगडे’ या व्यक्तीमत्वाबद्दल नितांत आदर निर्माण झाला होता. याची एकापेक्षा जास्त कारणे होती. एक तर आधीच्या कार्यालय प्रमुखांपेक्षा मीना त्याला जास्त आदर किंवा खरे तर ’आदर’ देत होती. दुसरे म्हणजे, तिची तडफ़ अचाटच होती. आणि तिसरे म्हणजे संजय हा स्वत: चांगल्या स्वभावाचा व नीतीमूल्यांचा माणूस होता.