२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 2 June, 2010 - 01:48

हा मुंगुस नावाचा साधारण तीस एक वर्षाचा माणूस पार तिकडूनच्या तिकडून येऊन आपले का लाड करतो हे साहूला समजेना!

गंगाबाईने 'साहू सात ते एक गल्लीत बसला पाहिजे' हा फतवा काढल्याला केवळ आठ दिवस झाले होते आणि त्या आठ दिवसात मुंगुसने साहूला तीनवेळा भजी अन एकदा चहा प्यायला दिला होता. आणखीन एक फायदा झाला होता. मुंगूसकडूनच हेही समजले होते की आपल्या आईला दोन नावे आहेत. ललिता.. आणि रेश्मा!

मैने भजी दिया ये रेश्माको बताया के नही?
क्या बोली रेश्मा कल? बोला उसको मै मिला था करके??

मुंगुसच्या प्रश्नांवर साहू भजी खात खात मान डोलवायचा. साहू धड उत्तरे देत नाही म्हणून क्षणभरच मुंगूसच्या डोळ्यात हिंस्त्र भाव यायचे. नंतर तो हसू लागायचा.

मुलांवर प्रेम केले की आई रसरसून येते अन पटते हा मुंगूसचा अनुभव होता गेल्या दहा वर्षांचा! त्याला रेश्मा वेलकमला ट्रान्स्फर व्हायला हवी होती. वेलकमच्या डिंपल अन सुनंदा आता 'गया गुजर्‍या' होऊ लागल्या होत्या. इतक्यात कुठला नवा माल येण्याची शक्यता नव्हती. पण गंगाबाईशी डायरेक्ट बोलण्याची मुंगूसची हिम्मत नव्हती. त्यामुळे तो साहूला पटवण्याच्या मागे लागला होता.

मुंगुस! पलीकडच्या गल्लीतील एक अनुभवी दलाल! दहा वर्षांपुर्वी स्वतःच्या बहिणीचा शोध घेत येथे पोचलेला होता. ती सापडली नाहीच! पण याला नाद लागला बायकांचा. आणि जवळचे पैसे संपेपर्यंत या एरियाला तो पूर्ण सरावला. पैसे संपल्यानंतर मात्र पायाखालची वाळू सरकली. त्याच बायका आता अपमान करू लागल्या. शिव्या देऊ लागल्या. कुठे तक्रार करणेही शक्य नव्हते.

भावनांना शुन्य किंमत असलेला विभाग होता हा! मग त्या बायकांवर सूड म्हणून त्यांच्याकडे येणार्‍या गब्बर गिर्‍हाईकांना बसल्या बसल्या त्या बायकांपेक्षा इतर एरियातील बायका कशा सुंदर आहेत हे सांगायला लागला. काही गिर्‍हाईके इतर बायकांकडे वळल्यावर हातात पुन्हा पैसे आले.

मग हाच धंदा सुरू झाला. सुरुवातीला ओशाळायचा! जे काम आजवर आपण स्वतः पैसे फेकून करायचो, जे सुख आजवर आपण स्वतःच बादशाही थाटात मिळवायचो, ते इतरांना ऑफर केल्याचे पैसे आता मिळवावे लागत आहेत.

पण नंतर त्यात एक वेगळाच फायदा असल्याचे जाणवले. जराशा वयाची सीमा पार केलेल्या पोरी आता मुंगुसच्या तरुण शरीराकडे अन त्याच्या व्यवसायाकडे बघून त्याला 'तू चांगला कस्टमर आणलास तर मीही पैसे देईन' वगैरे म्हणू लागल्या. अन बसल्या बसल्या मुंगुसला पैसे अन अधेमधे त्याच पोरींचे शरीरही मिळायला लागले.

आणि बघता बघता मुंगुस हा उतरणीला लागलेल्या पोरींचा स्पेशालिस्ट दलाल म्हणून नावारुपास आला.

दवे आडनाव होते त्याचे! एकदा एक साप मारला तेव्हापासून त्याला मुंगुस म्हणायला लागले.

एकेक नग होते सगळे! इस्माईल! इस्माईल हा एक सहा फुटी आडदांड पन्नाशीचा माणूस होता. त्याचे काम वेगळेच होते. पळवून आणलेल्या मुलीला जरब बसावी असे वागणे! बाकी काही नाही.

त्यामुळे त्याला पळवून आणलेली मुलगी उपभोगायची संधी मिळायची. पण एकदाच! त्यानंतर ती मुलगी अत्याचाराला घाबरून धंदा करायला तयार व्हायची! आणि इस्माईल दात कोरत बसायचा. आणि अशा किती मुली येणार बुधवारात पळवलेल्या? सहा महिन्यातून एक दोन!त्यामुळे हपापलेला इस्माईल पन्नाशीच्या बाईकडेही अभिलाषेने बघायचा. पण इस्माईलने पैसे दिले तरी त्याला कुणी स्वीकारायचे नाही. इस्माईल हा फक्त मुलींना जरब बसवण्यासाठी पाळलेला पहिलवान होता. त्याचा इतिहास फारच रंजक होता. चोपन्न वर्षाच्या गंगाबाईला जेव्हा तिच्याच नवर्‍याने कर्नाटकातून मुंबईला पळवून नेलेले होते तेव्हा गंगाबाईला जरब बसवण्यासाठी तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या इस्माईलची नेमणूक करण्यात आली होती.

इस्माईलच्या अघोरी कामवासनेपुढे शरण जाऊन गंगाबाईने कामाठीपुर्‍यात उरलेले आयुष्य घालवायचे मान्य केलेले होते. आणि नंतर परिस्थितीने अशी वळणे घेतली की गंगाबाई तिथली राणी झाली अन इस्माईल तिचा पित्त्या!

शेवटी उतरणीला लागलेल्या गंगाबाईने बुधवारात स्थलातर केले तेव्हा इतर कुठल्याही कामास नालायक असलेल्या इस्माईलने स्वतःची वर्णी डिस्कोत लावून घेतली.

आता गंगाबाई होती मालकीन आणि इस्माईल नोकर!

ललिता उपभोगायलाच मिळाली नव्हती इस्माईलला! दोन दिवसांचा उपास अन शिवीगाळ याने घाबरूनच तिने परिस्थिती मान्य केली होती. तिने जरा जरी शोर्य दाखवले असते तर इस्माईलला बरेच दिवसांनी मनासारखी मुलगी मिळाली असती. पण ती वेळच आली नाही. त्यामुळे मुंगुसच्या खालोखाल इस्माईलला ललिता हवी होती.

आजही मुंगुस भजी चारून निघून गेल्यानंतर साहू पुन्हा गल्लीत फिरू लागला. हा कोणत्यातरी वेश्येचा मुलगा असणार हे गल्लीत फिरणार्‍या सर्व संभाव्य नैमित्तिक पतींना सहज समजत होते. तसेच, दाटीवाटीने उभ्या राहून आपापल्या संभाव्य पतींना खाणाखुणा करणार्‍या मुली अन एक दोन दलालांना हे माहीत होते की गेले काही महिने डिस्को गाजवलेल्या रेश्माचा मुलगा आहे हा!

दोन तीस बत्तीशीच्या माणसांनी पानाच्या ठेल्यावर पान खाऊन थुंकताना समोर बघितले तर साहू उभा! त्या दोघांच्यात आंखमिचौली झाली.

एक - क्या बे.. क्या होना?

साहूने शरमून मान खाली घातली व नकारार्थी मान हलवत निघून जाऊ लागला. तो माणूस पुन्हा बोलला.

एक - ए.. इधर आ.. पान खायेगा?

साहूने पुन्हा मानेनेच नाही म्हंटले.

एक - अबे इधर तो आ.. हां! बीस रुपया चाहिये??

खाडकन साहूने अपेक्षेने वर बघितले.

दुसरा - जा.. वो रिक्षेमे बैठ..

साहूला रिक्षेत बसण्याचा वीस रुपयांशी काय संबंध आहे हे नक्कीच समजले नव्हते. त्यामुळे तो रिक्षेत जायला फारसा इच्छूक नव्हता. त्या माणसांचा हिशोब फार साधा होता. वर जाऊन एखाद्या लूज पडलेल्या बाईला वीस मिनिटांचे दिडशे देण्यापेक्षा तेच सुख वीस रुपयात अन पुन्हा सगळं कसं टाईट!

साहूला जवळपास ढकलतच त्यांनी रिक्षेत कोंबले. तशी मात्र साहूने बोंब ठोकली. त्याला वाटले नेणार पळवून!

आणि त्याचा आवाज ऐकून गोपी धावत आला. पिवळी धमक चमचम करणारी साडी, उगाचच छाती पुढे दिसावी म्हणून ब्लाऊजमधे रुमाल कोंबलेले, केसात गजरा, ओठांवर लिपस्टिक आणि नजरेत मात्र उघड कळणारे पुरुषी रागीट भाव!

गोपी - ए *****, छोड इसको***** तेरी मां.*****

त्या माणसांचे अन गोपीचे भांडण झाले. माणसे जमा झाली. एक दोन दादाही आले. प्रकार कळल्यावर खरे तर साहूबद्दल कोणतीही कणव वगैरे नसतानाही केवळ हात धुवून घेता येत आहेत या कारणासाठी त्या दोन माणसांना तुडवण्यात आले. त्यांच्याकडचे पैसे अगदी चिल्लरसकट गेले. अंगभर मार खाऊन ती माणसे शिव्या देत पळून गेली.

त्या प्रसंगापासून साहूला गोपीबद्दल आत्मीयता वाटू लागली.

रात्री एक वाजता कंटाळलेला अन पेंगुळलेला साहू २०३ डिस्कोमधे परत गेला तेव्हा अजबच प्रकार दिसला त्याला.

एक मोठे टोळके आले होते! सात, आठ जणांचे! आणि म्होरक्या गंगाबाईशी चर्चा करत होता.

तो - सोला लोग है हम! सिंहगडके पायथेके पास रातमे पार्टी है.. बीस लडकीया लगेंगी.
गंगाबाई - बाहर नही भेजते है हम लोग लडकीको
तो - पॉलिटिशियन का मामला है.. तुम्हारा परमिट कॅन्सल हो सकता है.. जादा बात नही करनेका
गंगाबाई - डिपॉझिट लेगी मै..
तो - हां! ऐसे लाईनपे आके बात कर! कितना डिपॉझिट?
गंगाबाई - एक लडकीका हजार...
तो - पाचसो देंगे..
गंगाबाई - नही परवडता सर.. आप तो देखरहे हैही.. दोन चार लडकीया भाग गयी तो..
तो - एक लडकी नही भागेंगी! हमारा जिम्मा!
गंगाबाई - फिर भी.. डिपॉझिट तो उतना हैही.. आप कहींभी पुछो सर..
तो - और नाईटका कितना बोली तू?
गंगाबाई - एक लडकी है संगीता.. उसका ढाई हजार, एक रेश्मा करके है.. वो पावणे दो.. रेखा का बारासो और बाकी लडकीया हजार हजार!
तो - तो बाईस तेईस हजार हो गया..
गंगाबाई - जी सर..
तो - कॅश उधरही देंगे..
गंगाबाई - सर पैसा मिलेबगैर तो लडकी यहांसे बाहर निकालतेही नही है हम्..बुरा मत मानना!
तो - अभी दस हजार है.. अ‍ॅडव्हान्स!
गंगाबाई - ठीक है.. अभी दस दीजिये.. और कल रात को आयेंगे तो बाकीका तेहेतीस देकर लडकीया लेजाईये..
तो - काहे का तेहेतीस?
गंगाबाई - डिपॉझिट?
तो - अब दस अ‍ॅडव्हान्स दे रहे है ना?
गंगाबाई - सर वो अ‍ॅडव्हान्स है सर.. डिपॉझिटकी तो बात होगयी हैही ना?
तो - एक काम कर...
गंगाबाई - जी..
तो - डिपॉझिट टोटल दस हजार कर..
गंगाबाई - नही सर.. हमे डर रहेता है..
तो - कोई भागेगा नही.. मै हूं ना..
गंगाबाई - पंधरा करो सर..
तो - बारा कर..
गंगाबाई - सर डिपॉझिट तो वापस लेनेकाही है आपको..
तो - बारा हजार... फायनल..
गंगाबाई - जैसा आप कहे.. घर आये मेहमान को खुष तो रखनाही पडेगा..
तो - और.. अभी हमको डिस्काऊंटमे एक एक लडकी चाहिये.. घंटेभर..
गंगाबाई - सर.. लडकीया एंगेज्ड है अभी..
तो - ये सब कौन है बैठी हुई??
गंगाबाई - सर.. इनके ग्राहक अभी आयेंगे..
तो - हां! तो आयेंगे तो देखेंगे.. चलो रे... अपना अपना माल उठालो..

आयुष्यात पहिल्यांदा एकदम तेवीस हजार देणारे गिर्‍हाईक आले होते त्यामुळे गंगाबाई अवाक झाली होती. त्यात दहा हजाराच्या करकरीत नोटा हातात होत्याच! तिने मुलींना फक्त नजरेनेच खूण केली. मुली अजिबात नाराजी न दाखवता स्वतःहून एकेका मुलाला घेऊन एकेका कंपार्टमेंटमधे गेल्या.

कंपार्टमेंट! एक अत्यंत किळसवाणा प्रकार असतो हा! सहा बाय तीनची अंधारी खोली! खोली म्हणजे? सिमेंटची भिंत वगैरे नाही! सगळ्या लाकडी भिंती! एक लालभडक रंगाचा झिरोचा बल्ब! तो बल्ब लागला आहे इतकेच समजते त्याच्या प्रकाशात! या कंपार्टमेंटची उंची असते सहा फूट! लागूनच पलीकडे दुसरे कंपार्टमेंट! तिकडच्या बाजूला टाकलेले उसासे सुद्धा इकडे ऐकू येतात. एक अत्यंत घाणेरडी चादर व उशी असलेला पलंग! फॅन वर आढ्याला असतो. चार कंपार्टमेंट्सना मिळून एक!

सरावलेल्या वेश्या पैसे मिळाल्यानंतर गिर्‍हाईकाचे लाड न करत बसता इकडून तिकडे सरळ गप्पाही मारतात. त्या गप्पा ऐकूनच गिर्‍हाईक हादरते. त्याचा त्या बाईतला सगळा रसच जातो. घाईघाईत कसेतरी उरकून ते आपले बाहेर पडते.

या कंपार्टमेंटवरून एकमेकांना कॉन्डोम्सची देवाणघेवाणही होते.

शरीर! फक्त शरीरे असतात या कंपार्टमेंट्समधे! मने नसतात. आपण कुणाशेजारी झोपलो आहोत, एरवी ही बाई कशी दिसते.. काहीही लक्षात येत नसते ग्राहकाच्या!

संपूर्ण रात्र बुकिंग करणारे तिथेच पडून एक आवेग उरकला की आणाभाका घेऊ लागतात दारूच्या नशेत त्या बाईबरोबर! मी तुला कधीच सोडणार नाही. तू म्हातारी झालीस तरीही! मी म्हातारा झालो तरीही! मला माझी बायको अजिबात आवडत नाही. घरी फार प्रॉब्लेम्स आहेत. आणि घरी सगळे ठीक असते तर मी इथे कशाला आलो असतो? तुझ्यावर माझे खरेखुरे प्रेम आहे. फक्त आत्ता तेवढे पैसे नाहीयेत. माझी बायको दुसर्‍याबरोबर जाते हे मला माहीत आहे. मग मी माझा मार्ग स्वीकारायला काय हरकत आहे? नोकरीचे टेन्शन फार असते. म्हणून मी रात्री इथे येतो. नाहीतर अशा विभागात मी आलोच नसतो. तुझ्यासाठी येतो. तुला भेटले की आपले जगात कुणीतरी आहे असे वाटते. पुढच्या जन्मी माझी होशील ना? वगैरे वगैरे!

पुढच्या रात्रीच या माणसाला आपली नेहमीची मुलगी दुसर्‍याबरोबर आहे असे समजले किंवा तिच्या उपस्थितीतच एखादी दुसरी भावली तर हा त्या दुसरीबरोबर जातो त्या कंपार्टमेंटमधे!

फक्त शरीरे! मने वगैरे नाहीत!

हिंदी फिल्म इंडस्ट्रीसुद्धा अशीच आहे असे ऐकून आहे. फक्त, तिथे सगळे फाईव्ह स्टार असावे.

ते टोळके जवळपास दोन तासांनी बाहेर आले. गंगाबाईचे ब्लड प्रेशर भयानक वाढलेले होते. मोठे गिर्‍हाईक म्हणून आज एवढे कन्सेशन थोडीच घ्यायचे असते? पण तिला वाटेल तसे बोलून चालणार नव्हते.

सगळे बाहेर आल्यावर तिला हसरा चेहरा करावा लागला. एक एक करून सगळे पुन्हा जागच्याजागी आल्यावर मग मागून त्या मुलीही येऊ लागल्या. मग म्होरक्या म्हणाला..

म्होरक्या - ठीक है.. अभी कल आते..

तेवढ्यात दुसरा एक जण म्हणाला..

दुसरा - भाई.. एक बात है.. माल.. कुछ खास नही है..
म्होरक्या - म्हंजे??
दुसरा - आता .. ही बघा ना... नुसती पडली होती पाय फाकून.. रिस्पॉन्स नको का थोडा तरी??

आता तिसरा बोलला..

तिसरा - वो तो ठीक है.. ये तो कपडा सिर्फ सरकारही थी.. फिर क्या मजा आयेगा?

गंगाबाईच्या देखत तिच्याकडच्या विकाऊ मालाच्या गुणवत्तेबाबत जाहीर चर्चा सुरू झाली. गंगाबाईने बराच प्रयत्न केला मन वळवायचा! उद्या तिकडे गेलात की पोरी नीट वागतील, आज बुजल्या असतील, मी सांगून ठेवते वगैरे! पण म्होरक्या भडकलेला होता.

म्होरक्या - हे बघ गंगाबाई.. आम्हाला वेलकमच्या पोरी पंधरा हजारात मिळत होत्या.. तुझे नाव ऐकून इथे आलो..

गंगाबाई - आता सर नाव आहेच ना डिस्कोचे.. अशा पोरीच नाही आहेत कुठे..
म्होरक्या - पण पोरांना पसंत नाहीत त्याचं काय? दुसरा माल आहे का?

गंगाबाईच्या हातात दहा हजार अन इस्माईल ही दोन शस्त्रे होती. त्यामुळे ती निर्धास्त होती.

गंगाबाई - आहे त्या सगळ्या पोरी दाखवल्या.. या पोरींसाठी जीव टाकतात कस्टमर..
म्होरक्या - ते राहूदे.. दुसरा माल नसेल तर अ‍ॅडव्हान्स परत दे..
गंगाबाई - आमच्या कोठ्यावर पैसा आत येतो मालक.. बाहेर नाही जात
म्होरक्या - काढून दाखवू का बाहेर?

वाद वाढला तसा इस्माईल डोकावला अन येन उभा राहिला. पण सात जण असल्यामुळे म्होरक्याला त्याची भीती नव्हती. त्याने बिनदिक्कत गंगाबाईच्या कंबरेपासल्या बटव्याला हात घालताक्षणी इस्माईल मधे पडला. चार जणांनी इस्माईलला धरले अन दम दिला. म्होरक्याने दहा हजार परत घेतले. गंगाबाई हळू आवाजात म्हणाली की आत्ता आत गेला होतात त्याचे पैसे द्या..

त्यावर 'आम्हाला मारायला हा माणूस आणलास तू.. आता पैसे विसर' असे म्हणून म्होरक्या निघणार तेवढ्यात कपडे वगैरे घालून तयार झालेली संगीता तिथे आली अन म्हणाली..

संगीता - इसका तो खुदकाच **ता नही.. कितना ट्राय किया मैने.. इससे क्या पैसा लेनेका..

हास्याचा स्फोट झाला तसा अत्यंत अपमानीत झालेला म्होरक्या पोरांना घेऊन खाली निघाला आणि वरून खिडकीतून प्रार्थना नावाच्या मुलीने गल्लीत ओरडून म्होरक्याचे गुपीत सांगीतल्यामुळे अख्खी आळी त्या ग्रूपला जाताना जेव्हा हसत होती.....

.....तेव्हा आत्तापर्यंत जागाच असलेला साहू आपल्या आईला विचारत होता..

साहू - मां.. **ता नही मतलब??

आणि तो प्रश्न ललिताशिवाय फक्त शालन नावाच्या मुलीने ऐकला होता. ललिताने प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते. आणि शालन एक अक्षर त्यावर बोलली नाही. फक्त तिने तिने ते लक्षात ठेवले होते.

===================================

दुसर्‍या दिवशी दुपारी एक ग्रूप आला व आळीत त्यांनी सभा घेतली. त्यातील बाई, जिचे नाव स्मिता माने होते, ती बोलत होती.

स्मिता - भगिनींनो, पुणे शहरातील हा तुमचा विभाग एक काळा विभाग म्हणून ओळखला जातो. कुणालाही या विभागाच्या जवळून जायछी इच्छा होत नाही. मात्र आमची राज्यव्यापी संघटना 'मुक्ती' आपल्या या विभागात आज पहिल्यांदाच आलेली आहे. आमच्या संघटनेतील सर्व स्त्री व पुरुष तुम्हाला आपली बहीण मानतात. तुमच्यामुळे समाजातील कृष्णकृत्ये करणारे पांढरपेशा वस्तीत ती कृत्ये न करता येथे येऊन करतात हा तुमचा फार मोठा उपकार पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या संस्कृतिक राजधानीला लाभलेला आहे हे आमची संघटना जाणते.

त्याचवेळी.. आमची तुमच्याबाबत काय जबाबदारी आहे याचेही आम्हाला भान आहेच.

आपल्याच भगिनींची मुले शिक्षणाविना भटकत बसतात अन नंतर जबाबदार नागरीक म्हणून स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत हे चित्र आम्हाला बदलायचे आहे.

आमच्या संघटनेतर्फे तपकीर गल्लीतील दगडी वाड्यासमोरच्या एका मोकळ्या जागेत रोज सकाळी दहा ते दुपारी तीन अशी पहिली ते सातवीपर्यंतची शाळा भरवण्याचा आमचा मानस आहे. ही शाळा विनामूल्य आहे. आपल्या मुलाबाळांना आम्ही स्वतःहून येथून घेऊन जाऊन तेथे नेऊन शिकवून पुन्हा आणून सोडणार आहोत. यासाठी आमच्या संघटनेत आम्ही काही शिक्षक भरती केलेले आहेत. तेही विनामूल्यच काम करून आमच्या मुक्ती संघटनेचा लौकीक वाढवत आहेत.

हे झाले आमचे एक कर्तव्य!

दुसरे म्हणजे समाजातील विभिन्न स्तरातील माणसांना सामोरे गेल्यामुळे आमच्या भगिनींच्या आरोग्यावर अती गंभीर परिणाम होतात हे आपण सगळे जाणतोच! आज आमच्याबरोबर दोन वैद्य आले आहेत. ते सर्व भगिनींची मोफत तपासणी करणार आहेत अन त्यांनी जर काही औषधे वगैरे सुचवली तर जवळच्या केमिस्टने ती अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावीत याचा आम्ही आग्रह धरणार आहोत. तसेच, जवळपासच्या इस्पितळांमधेही आपल्याला एक तर मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा सुविधा मिळाव्यात या आमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे.

तर या भगिनींनो! मुक्ती संघटनेतील या वैद्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा. तपासणीची सुरुवात या इमारतीपासून होत आहे. एक वैद्य या डिस्को नावाच्या इमारतीत जातील व दुसरे त्या रंगमहाल नावाच्या! सर्वांनी आपापली तपासणी करून घ्यावी. हे मोफत आहे.

ब्लड प्रेशर, उंची, वजन, काही त्रास होतो आहे का असल्या स्वरुपाच्या प्राथमिक प्रश्नांना उत्तरे देता देता एक एक मुली पाच पाच मिनिटात वैद्यांना पुढच्या मुलीकडे धाडत होत्या.

डिस्कोमधे चांदणी या वेश्येला काहीतरी नक्कीच झालेले आहे हा एक निष्कर्ष सोडला तर डिस्कोबाबत वैद्याने ग्रीन सिग्नल दाखवला.

मात्र रंगमहालमधे गेलेला दाणि हा वैद्य ...

पोर्णिमाकडे बघून बहकला होता... आणि पोर्णिमा.. एका कंपार्टमेंटमधे 'माझी तपासणी करा' म्हणून त्याला घेऊन गेली होती आणि म्हणत होती की तिच्या छातीत डाव्या बाजूला दुखते.. गाठ आहे किंवा काय हे तपासा..

दाणि फुटभर अंतरावर मोकळे झालेले पोर्णिमाचे यौवन बघून तपासणी विसरून गेला होता अन त्याच्या डोळ्यातील क्षणात बदललेले भाव न समजायला पोर्णिमा ही काही पांढरपेशा समाजातील स्त्री नव्हती..

पंधरा मिनिटाने खिशातील सगळे पैसे गमावून दाणिने जेव्हा शर्टची बटणे लावायला सुरुवात केली तेव्हा पोर्णिमा त्याला 'आया करो हां साहब.. जबभी मन करे' म्हणाली अन गाठ बिठ तर नाहीयेना विचारले.

हिरमुसलेला दाणि नकारार्थी मान डोलावत बाहेर पडला तेव्हा स्मिता माने रंगमहालच्याच प्रवेश द्वारावरील खोलीत बसलेली पाहून हादरला.

स्मिता - काय झालं?
दाणि - नाही.. गाठ आहे का नाही बघत होतो..
स्मिता - मग?
दाणि - नाही वाटत..

रंगमहालची प्रमुख लालीमौसी मधेच बोलली..

लाली - आपके बाल क्यों बिखरगये साब लेकिन??

किमान पाच मुली जोरात हासल्यावर दाणि मान खाली घालून झटपट बाहेर पडला.

स्मिता मानेच्या 'मुक्ती' संघटनेला पहिल्याच दिवसापासून मुक्ती मिळायला सुरुवात झाली होती.

आणि इकडे ललिता साहूला 'भूक लागली असेल ना' विचारत असताना साहू म्हणाला..

साहू - नही.. भजी खायी..
ललिता - भजी? किसने दी? गंगामौसीने?
साहू - मुंगुस..
ललिता - मुंगुस?????

स्वप्नाळू डोळ्यांनी ललिता शुन्यात पाहात होती.

'मला वेलकम जाता येईल का? मुंगुस मला पैसेही देईल अन शरीफाबी खास रूमही देईल! डिंपलची जादू संपलेलीच आहे. आपल्याला अन साहूला चांगले दिवस येतील पुन्हा! त्याचवेळेस साहू विचारत होता..

साहू - मां.. मै स्कूल जायेगा???

आणि ललिता त्याच्याकडे प्रेमाने बघत असतानाच बुधवारपेठेतील पंचेचाळिशीचा गाजलेला ग्राहक नाना साठे मागून येऊन ललिताच्या पाठीवरून हात फिरवत तिला आपल्याकडे खेचत होता.

गुलमोहर: 

एकदम भिषण सत्य!!!! बापरे!! तुम्हीच ते असं नीट मांडु शकता बेफिकीरजी..येऊदे पुढचा भाग!

मी एका NGO मध्ये अगदी थोड्या काळासाठी काम केलेले आहे. त्याच्याच कामाचा एक भाग म्हणून वेश्यावस्तीत जाऊन वेश्यांच्या मुलांना शिक्षण देणे, त्या बायकांना जर काही प्रश्न असतील तर समजून घेणे आणि त्यावर उपाययोजनेचा विचार करणे असे कामाचे स्वरुप होते.

आम्ही स्वयंसेवक मुली, मुले आणि जबाबदार अशी मोठी माणसे सोबत जात असू. पण वस्तीच्या आत मात्र प्रवेश मुलींनाच असे... मुले आत आली तर सामाजिकसेवे ऐवजी भलतीच सेवा करत बसतील, ही संस्थेला काळजी होती ना... Happy

आम्ही मुली वस्तीत जाऊन त्या बायकांच्या मुलांना शिकवण्यासाठी म्हणून बाहेर घेऊन येत असू. मनात कायम धाकधूक असायची की आपल्याला काही वाईट अनुभव तर येणार नाही ना? पण सुदैवाने तसं काही घडलं नाही. त्या बायकासुद्धा आमच्याशी अतिशय आदराने बोलायच्या. त्यांच्या मुलांना शिकवण्याचं पुण्याचं काम आम्ही करतोय असं म्हणायच्या...

तिथे कामाला असलेल्या अर्ध्याच्यावर बायकांना एडस होता...हे समजलं. अंगावर अक्षरशः शहारा आला...एडससारख्या दुर्धर रोगाने पिडलेल्या लोकांना आपण जवळून पहातो आहोत, नव्हे त्यांच्याशी बोलतो आहोत, त्यांच्या मुलांना हाताला धरुन शिकवत आहोत, ह्याच्या जाणीवेनेच थरकाप उडायचा... त्यातल्या बर्‍याचशा स्त्रिया कशा काय ह्या क्षेत्रात आल्या, ह्याच्या दारुण कथाही ह्यानिमित्ताने समजल्या... शिवाय त्यांची ती गोड, निरागस मुलं पाहून आतडं तुटायचं. काहीच दोष नसतांना ते हे असलं आयुष्य जगत आहेत ह्यांच फार वाईट वाटायचं.

मी जो काही थोडासा काळ काम केलं, त्या काळात गरिब वस्तीतील लोकांचे प्रश्न, रस्त्यावरच्या अनाथ मुलांचे प्रश्न, तुरुंगामधले कैदी, वैश्याव्यवसाय अशाप्रकारच्या अनेक अत्यंत भयानक प्रश्नांची मला जवळून ओळख झाली आणि सत्य हे कल्पनेहून वाईट कसे ह्याचा पदोपदी अनुभव आला.

आपल्या देशातले असे अनेक प्रश्न पाहून आपल्याला वाईट वाटतं, चीड येते, हे सगळं बदलावं असंही वाटतं...पण प्रत्यक्ष त्याप्रकारचं काम करणं फार फार अवघड आहे, त्याल खुप मोठं धाडस आणि जिगर लागतं... पांढरपेशा समाजातून आलेल्या, गरिबी न पाहिलेल्या माझ्यासारख्या मुलीला हे काम झेपलंच नाही...अक्षरशः मी पळ काढला त्यातून... अशाप्रकारच्या NGOs मध्ये वर्षानुवर्ष अतिशय अल्पपगारावर, तर कधी कधी मोफत नोकरी करणार्‍या कार्यकर्त्यांना माझा सलाम! हे काम ते पैशाची गरज म्हणून स्वीकारत आहेत की स्वेच्छेने, हे महत्वाचं नाही. अशा कामात टिकून राहणे, ह्यातच सर्व काही आलं.

तुमची कादंबरी वाचतांना NGO मधल्या माझ्या कामाच्या काळातले अनुभव आठवतायत... नकोसे वाटणारे म्हणून मनाच्या एका कोपर्‍यात ढकलून दिलेले... आता पुन्हा वर आले आहेत. म्हणूनच काल म्हणाले ना, 'विदारक सत्य'... त्याचा पुन्हा सामना करायची वेळ आलीये आता... Sad
तुमचं लेखन वाचायची चटक लागलीये ना? मग काय करणार? जे लिहाल ते निमुटपणे वाचायचं.... Sad

हे काय???
२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १ ला २० प्रतिसाद, भाग ३ ला २४ प्रतिसाद,
....आणि भाग २ ला ९ प्रतिसाद! फक्त च???

मी लांबलचक प्रतिसाद वजा मनोगत लिहून तुमचे उरलेले सगळे प्रतिसाद खाल्ले वाटतं... Sad
माझ्या प्रतिसादानंतर फक्त ३ Sad तेही माझ्या प्रतिसादासाठी की कथेसाठी, तेही कळायला मार्ग नाही... Sad
माझं चुकलंच..तुमच्या कथेचा प्लॅटफॉर्म वापरला माझे अनुभवकथन करायला... ह्यापुढे असं होणार नाही, याची काळजी घेईन... Sad

सानी,

आपण त्या वेळेस पार पाडलेल्या जबाबदारीने मी अचंबीत झालो आहे. माझा आपल्याला सलाम!

कृपया प्रतिसाद असेच देत राहावेत! त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते हा माझा स्वार्थ आहे.

आत्ता कुठे जीवात जीव आला माझ्या!
कोणाचीच काहीच प्रतिक्रिया नाही म्हटल्यावर मी उघडपणे एवढं विस्ताराने लिहिलंय ते बरोबर की चूक हेच समजत नव्हतं मला. एकदम अस्वस्थ झाले होते...
बरं झालं तुम्ही तातडीने प्रतिसाद दिलात. खुप आभारी आहे. Happy
मला झेपलं नाही म्हणून मी ते काम सोडलं. तुम्ही मात्र ह्या कुरुप जगातलं जळजळीत वास्तव धाडसाने आमच्यासमोर मांडत आहत...तेही कुठलाही आडपडदा न ठेवता! तुम्हाला तर किती सलाम केले पाहिजेत!!!!
लिहिणे सोडू नका. बेफिकीरांना संवेदनक्षम करण्याचे प्रयत्न असेच चालू ठेवा Happy पु.ले.शु.

तुम्ही मात्र ह्या कुरुप जगातलं जळजळीत वास्तव धाडसाने आमच्यासमोर मांडत आहत...तेही कुठलाही आडपडदा न ठेवता! >>> अगदी अगदी

शबाना आझमी व नसरूद्दिन शहाचा एक चित्रपट पाहिला होता... नंतर चांदनीबार (त्यातील मुलगी पैसे आणून देते तेव्हा तब्बूने फोडलेला हंबरडा काटा आणतो अंगावर... एक वर्तूळ पूर्ण झालेले असते...)

समाजातील उपेक्षित घटकांबद्दल कुतुहल वाटायच आणि त्या जगण्याची कीवही यायची... दहीसर चेक नाक्याला साडेनऊ नंतर फिरणारे चमकदार पोशाखातील गुलाबी चेहरे पाहून देवाचे खुपवेळा आभार मानले की कितीही संकटे येवोत पण एक सन्मान्पूर्वक आयुष्य जगण्याची संधी दिली...

बेफिकीर तुम्ही उपेक्षितांबद्दल समाजभावना जागृत करण्यासाठी लिहीत नाही... पण तरीही तुमच्या लेखांतील विदारक सत्य आणि या उपेक्षितांचे अश्रू सानी सारख्या संवेदनाक्षम मनांपर्यंत पोहोचवले तरी अशा कित्येक सानी थोड्या काळासाठी का होईना उपेक्षितांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्या मदत करू शकतील...

तुम्हाला तर किती सलाम केले पाहिजेत!!!!>> सलाम तुम्हा दोघांनाही बेफिकीर, सानी आणि त्या सर्व समाजसेवकांना जे उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असतात...