२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2010 - 05:20

साहू... रेश्मा... थापा...

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २

आयुष्यात पहिल्यांदा साहू चौकीवर गेला होता. कुणी कुणी काय काय पाहिले याचा तपास चाललेला होता. ९५% भाजल्यामुळे संगीता अर्ध्या तासात गेलेली होती.

ललिता डिस्कोची प्रमुख झाल्यापासून संगीताच्या मनात नुसता जळफळाट चाललेला होता. ज्या मुलीचा 'सेपरेट कमरा' आपण आपल्या सौंदर्याच्या बळावर घेतला तिला आता हिशोब द्यायला लागतो त्यामुळे संगीता द्वेष करू लागली होती. पण प्रकार असा झाला की महिन्याभरातच ललिताचे न्याय्य वागणे अन प्रेमळ बोलणे यामुळे संगीताचा कायापालट झाला होता. मात्र.. त्यानंतर शालनने साहूचे घेतलेले बौद्धिक! त्यात ती म्हणाली की आत्महत्या करण्याची तिची हिम्मत होत नाही. हे ऐकून संगीताने ठरवले. आपण ती हिम्मत करून दाखवायची. आणि तिने ते केले! त्यामागे फार गंभीर कारण होते. तिने ते केले नसते तर काहीच महिन्यात ती हाल हाल होऊन मेली असती. एका असाध्य व्याधीने!

संगीता! रोज समोर असणारी, ललिताच्या प्रेमळ वागणुकीमुळे डिस्कोतील सर्वांशी हसून खेळून वागणारी, बोलणारी संगीता... आता भूतकाळ झाली होती...

संगीताचा भाजलेला देह पाहताना साहूला मळमळले होते. पण त्यापेक्षा त्याला जास्त काय झाले असेल तर.. आणखीन एक वेष्टन नकळत चढले होते त्याच्यातील स्फोटकावर!

संगीताने केवळ रोगाला घाबरून आत्महत्या केली आणि तिला रोगी बनवण्यात आजवर आलेल्या प्रत्येक ग्राहकाचा हात आहे ही गोष्ट साहूच्या मनात ठसली.

साहूला एक आगळा वेगळा छंद होता. तो म्हणजे गोपी जेव्हा ग्राहकाबरोबर असेल तेव्हा त्या दुकानाच्या पायरीपाशी बसून त्या नाण्याकडे पाहात बसणे आणि जमतात तेवढ्या आठवणी काढत बसणे!

"वो छटेली लेके क्या करेगा यार? गंगाबाईके साथ सोयेगा क्या??? "

हेच नाणे काढायाचा प्रयत्न करताना गोपीने केलेली टिंगल ही बुधवार पेठेची प्रातिनिधिक टिंगल म्हणायला हरकत नव्हती. पैसा असणे या गोष्टीचा अर्थ बुधवार पेठेतील एखादे शरीर उपलब्ध असणे इतकाच असतो असे गोपीचे मत असावे.

"आईये सेठ.. बैठेंगे क्या??"

झिरमीने हाफपँटमधे हात घालून विचारलेला प्रश्नही प्रातिनिधिकच! पुरुष म्हणजे ग्राहक किंवा दलाल! दुसरे काहीही नाही.

"ये दोजख है बहन.. दोजखमे आगयी है तू"

कबीरचे वाक्य खरे ठरले होते. कबीर स्वतःच या जागेचे दोजख बनवायला तितकाच जबाबदार होता. साहूला संगीतासंदर्भातील चौकशी संपवून आल्यानंतर भर दुपारी त्या नाण्याकडे पाहताना सगळे आठवतही होते आणि उमगतही होते.

"दो दिनसे भूखी हूं रे बेटा.. तुने तो खाना खाया है ना??.... जो करना है वो कर.. लेकिन... कुछ ना कुछ खानेके लिये... ला रे..."

आपली आई! इतकी अगतिकता का असावी आपल्या नशिबात? आपल्या आईने सगळ्यांचे म्हणणे मान्य करून धंदा केल्यानंतरही का उपाशी ठेवतात? का??? का??

या 'का' चे कारण किंवा उत्तर एकच होते! माणूस हा जगातील सर्वात क्रूर जनावर आहे. प्राणी पोट भरलेले असले तर शिकारही करत नाहीत. माणूस.. माणूस तसे नाही करत!

राऊरकेलाच्या आठवणी फारच अंधुक होत्या. भानूचाचाने दिलेली चॉकलेट्स.. एक मामा होता त्याने एकदा रसमलाई विकत घेतली होती वगैरे! काय प्रॉब्लेम होता आईला तिथे? कशाला आली भानूचाचाबरोबर इथे??

उत्तर नव्हते. कशाचेही उत्तर नव्हते. बाईचा विश्वास बसल्यानंतर त्या विश्वासाचे काय करायचे हा त्या त्या माणसाचा प्रश्न असतो. आपापल्या संस्कारांप्रमाणे, स्वभावाप्रमाणे जो तो माणूस वागतो. पण हे कळण्याइतका साहू मोठा नव्हताच. साहूच्या मनात एक गोष्ट फार फार... म्हणजे फारच गंभीरपणे ठसत होती.. ती म्हणजे..

हे आयुष्य आपल्यावर उगीचच लादलेले आहे समाजाने.. काहीही चूक नसताना आपली..

डिस्कोवर जाण्यात काही अर्थच नव्हता. प्रत्येक मुलीच्या अन बाईच्या डोळ्यात पाणी! संगीता गेली म्हणून! गिर्‍हाईकांबरोबर कोण जाणार? बंद होते डिस्को काही दिवस! पोलीस येत होते.. जात होते.. तपास करत होते..

'जगण्याचा अतीव कंटाळा आल्यामुळे आत्महत्या केली'... व्वा! काय निदान केले होते संगीताच्या मरण्याचे!

का आला हो कंटाळा तिला जगण्याचा? का आला? आला होतात कधी बघायला की अशा आणखीन किती जणी आहेत बुधवारात ज्यांना जगायचा कंटाळा आलेला आहे? आला असतात अन अशा मुली वेगळ्या काढल्या असत्यात तर.... सुनसान झाली असती बुधवार पेठ... सुनसान!

म्हणे जगण्याचा अतीव कंटाळा! सडलेली जननेंद्रिये, प्राणांतक वेदना, भविष्यात कोणतीही आशा बाळगण्यासारखी गोष्ट नसणे.. याला.. अतीव कंटाळा म्हणतात?? की अगतिकता??

मजबूरी.... हा हिंदी शब्द साहूच्या मनावर फार फार मोठ्या प्रमाणावर व्यापत होता.

संगीताचा मृत्यू आणि आयुष्यात रेखाचा प्रवेश या एकाचवेळी घडत असलेल्या किंवा घडलेल्या अत्यंत वाईट व अत्यंत चांगल्या गोष्टी होत्या.

रेखा! गोरी गोरी पान रेखा! काय बघते! डोळे असे मिसळते डोळ्यात की.. काढवतही नाही नजर आणि.. धड बघताही येत नाही तिच्याकडे! अगदी उघडपणे त्या बघण्याचा अर्थ असतो की तू काय माझ्यासमोर टिकशील?? किती वेळ???

आणि.. ते.. त्या दिवशी.. संगीतादीदी मेली त्या दिवशी.. आपल्या ओठांवर तिने ओठ फिरवले तेव्हा.. झिरमीनेही एकदा तेच केले होते.. पण.. तेव्हा असे वाटले नव्हते.. रेखाचे ओठ.. मुलायम.. नाजूक.. पात्तळ.. ओलसर.. आहा.. पण...

हा पण फारच बिचकवणारा होता. 'पण ती तसे पुन्हा करेल का' या मनातील प्रश्नाला काही उत्तरच नव्हते. आणि.. त्याचवेळेस राहून राहून त्या मुलीचा आक्रोश करणारा चेहरा डोळ्यांसमोर येत होता.. मुझे बाहर निकालो भैय्या.. बाहर निकालो मुझे..

आपली.... आपली आई पण अशीच ओरडली असेल??

काय माहीत! असेलही.. आपल्याला काही कळतच नव्हते. इथे तर इथे! तिथे तर तिथे..!

साहू... रेश्मा.... थापा...

कोणतीही चूक नसताना हे आयुष्य लादला गेलेला साहू स्वभावाने शांत आणि गरीब होता. आईवर त्याचे नितांत प्रेम होते. मात्र असह्य झाले की उद्रेक व्हायचा. आणि.. असह्य तर.. जवळपास रोजच होत होते. पण त्याची सोसण्याची क्षमता अचाट असावी.

त्या आक्रोश करणार्‍या मुलीला पाहण्याऐवजी आता रेखाकडेच पाहायचा छंद जडला. आजवर तो त्या वाड्यावरून कितीकदा गेला असेल. तेव्हा रेखा तिथे उभीही असेल. नजरानजरही झालेली असेल. पण काल परवा ती आपल्याशी बोलली तेव्हा जसे वाटले तसे मात्र आजवर वाटले नाही.

साहू आता त्या वाड्याच्या प्रवेशदारावरून जायला संकोचू लागला. न जाणो तिला वाटायचे की तिच्याचसाठी चाललेला आहे. आणि खरे तर ते खरेही होते. तिच्याचसाठी तिथून जावेसे वाटत होते मनात.

हिय्या करून दोन दिवसांनी साहू रेखाला दारात बघून मुद्दाम तिच्या समोरून जायला लागला. अगदी नाकासमोर चालणारा सरळमार्गी माणूस असावा तसा.

रेखा मुरलेली मुलगी होती. गोपी नेमका कस्टमरबरोबर होता. रेखाने तिच्या मैत्रिणींशी नेत्रपल्लवी करून पुन्हा साहूला धरायला सांगीतले.

आजवर वाटली नसेल इतकी लाज वाटली साहूला त्या पाऊण तासात!

पाऊण तास! त्या पाऊण तासात बुधवार पेठ ही काय चीज आहे हे साहूला अतिशय व्यवस्थित समजले.

खिदळत खिदळत साहूला आत नेलेल्या मुलींनी एका रिकाम्या खोलीतील मोठ्या पलंगावर त्याला आडवे केले. मुलींसमोर रडणे शोभणार नाही असे वाटल्याने तो रडला नाही एवढेच! अन्यथा साहू रडलाही असता.

पायल नावाच्या मुलीने सरळ साहूची मनसोक्त टिंगल करायला सुरुवात केली. झिरमी बरी अशा भाषेत ती बोलत होती. बाकीच्या खिदळत होत्या.

रेखा साहूच्या एका बाजूला शेजारी लवंडली होती. पायल दुसर्‍या बाजूला बसली होती. साहू उठू लागला की बाकीच्या दोघी त्याला पुन्हा झोपवत होत्या.

पायल - क्या सेठजी.. इतनीसी उमरमे इस गली मे?? आं? *** मालूम है? मै चाहिये? या ये मुन्नी?? मुन्नी कबसे आपके लिये तरस रही है .. या ना सेठ.. सारखे पळून का जाताय?? गोपीसे प्यार करते हो आप? कैसे करते हो? दिखाओ ना.. दिखाओ.. अभ्भी दिखाओ.. मेरे साथ करके.. ए मुन्नी.. जरा ये खोल ना.. सेठ दीदार करेंगे.. कितने सालसे आते है आप सेठ यहांपर?? मै तो नयी हूं.. पैसा है?? या खाली जेब है?? देखना है मुझे?? ये देखिये..

रेखा हसत नव्हती. ती नुसतीच साहूच्या कपाळावरून हात फिरवत त्याचे किस घेत होती. साहूचा गाल पूर्ण भिजून गेला होता. आणि त्यापेक्षा तो 'छोडो छोडो' म्हणत अत्यंत शरमलेला होता. मुन्नीने साहूची पँट खाली ओढली. दोन्ही हात पटकन पोटाखाली घेत उठण्याच्या प्रयत्नात असलेल्या साहूला रेखाने बळेच दाबून धरले. अत्यंत लज्जित झालेला साहू घाबरून बघत होता. ओरडायचा बेत करत होता. तेवढ्यात पायलचा कस्टमर आला. ती निघून गेली. ती गेल्यावर मुन्नीचा साहूमधला इंटरेस्ट कमी झाला. मग मुन्नी आणि नीता या दोघी रेखाला जाउया म्हणाल्या. रेखाने त्यांना पिटाळले आणि साहूच्या शेजारी स्वतः झोपून राहिली. त्या मुली निघून गेल्यावर साहू उठायची धडपड करू लागला. त्यावेळेस रेखाने घेतलेले बौद्धिक हे शालन आणि गोपीपेक्षा भयंकर होते. नुसते ऐकूनच साहूच्या मनात ठिणग्या पडू लागल्या.

रेखा - घाबरला?? घाबरला ना? काही नाही करत तुला.. जाऊ नको.. ऐक.. ऐकायचंय?? का असं केलं ते??
साहू - क्या बोलरही हो? मै नही समझता.. छोडो.. तुम लोग गंदे हो..

रेखा अजूनही मिश्कील नजरेने त्याला दाबून त्याच्याकडे बघत होती.

रेखा - मराठी नही आता? जबतक मै हां नही कहुंगी तू यहांसे बाहर नही जा सकेगा ... पता है??
साहू - छोडो..
रेखा - नही छोडरही..

आता मात्र साहूच्या डोळ्यात पाणी आले.

रेखा - छोटा बच्चा रो रहा है??

रेखाचे ते खिदळणे पाहून साहूला भयानक राग आलेला होता. अत्यंत अपमानीत साहू जायची धडपड करत होता.

साहू - गोपीको बतानेवाला हूं मै.. और गजूको भेजके तुम लोगोंको ...
रेखा - अबे चूप.. गजू का बाप अंदर पैर नही रख सकेगा.. कहा आया है जानता है?? रात का राजा है ये..
साहू - छोड ***...

रेखाने झोपल्याझोपल्याच साहूच्या तोंडात भडकावली.

रेखा - गाली बकता है?? रेखाको? गाली बकता है..??

आता साहू सरळ रडायलाच लागला.

साहू - किसलिये पकडा है..?? छोडिये ना..

रेखा - अब आया लाईनपर.. अभीतक पूछ नही सकता था? किसलिये पकडा है?? नेहा को देखना चाहता था ना??

नेहा! लालनबाईच्या रात का राजामधील भयाण अंधारातील कोणत्यातरी अदृष्य कोपर्‍यात असणार होती! नेहा! बाहर निकालो भैय्या.. निकालो ना बाहर..

रडणारा साहू क्षणात गंभीर झाला. नेहाचे काय झाले हे बघायची त्याला अत्यंत उत्सुकता होती खरी! पण आत्तापर्यंत या मुलींनी केलेल्या थट्टेमुळे सगळा थाट गेलेला होता. आता लवकरात लवकर इथून जायचे होते फक्त!

साहू - नही देखना है.. छोडिये..
रेखा - नही देखना है?? सोचले! अगर देखना है तो आजही देखसकता है... लालनबाई बॉम्बे गयी है सुबह! कल सुबहा आयेगी.. फिर अंदर नही आपायेगा तू कभीभी..
साहू - नही.. रहने दो.. छोडो..
रेखा - तो जा.. इतना ध्यानमे रख.. आजके बाद वो तुझे नही दिखेगी फिर..
साहू - क्युं??
रेखा - रातमे उसका अ‍ॅक्सीडेंट होनेवाला है.. लक्ष्मी रोडपे.. अण्णाके गाडीके नीचे.. और कोई पुलीस केस नही..

भर दुपारी भूत दिसावा तसा चेहरा झाला होता साहूचा! रेखाच्या डोळ्यातील मिश्कीलता गेलेली असली तरीही ती अतिशय शांतपणे ते वाक्य बोलली होती. जणू आज रात्री मित्राबरोबर पिक्चर पाहायला जाणार आहे असे एखादा मुलगा घरी सांगतो तसे!

साहू - ... क्क्या?? .. कैसे?? .. क्युं लेकिन??

रेखा - हां! कैसेभी.. और युंही..

रेखा विषण्ण हसली. तिच्या चेहर्‍यावरील सगळा मेक अप आत्ता बीभत्स वाटत होता. कालवर तो नुसताच चीप वाटायचा. मात्र आता अभद्र वाटू लागला होता. त्या मेक अपच्या आड एक चेहरा होता जो बाहेर येऊ लागला होता.

साहू - उसे...
रेखा - अंहं.. उसे कैसे मालूम होगा?
साहू - खून करनेवाले है??
रेखा - खून नही.. अ‍ॅक्सीडेन्ट..
साहू - खूनही हुवा वो तो...??
रेखा - दिलमे सब जानेंगे.. खून है ये.. मुंहपर कहेंगे.. अपघातात गेली..
साहू - किसलिये लेकिन?? क्या किया उसने??
रेखा - क्या किया.. वही.. जो मैभी करना चाहती थी.. लेकिन मै कर नही सकी क्युंकी वैसा टाईम नही मिल सका मुझे..
साहू - क्या .. क्या किया?
रेखा - रामन उसे माररहा था..
साहू - कौन रामन?
रेखा - रामन.. जैसे तुम्हारा गजू है.. रात का राजापे वो काम रामन करता है.. लेकिन वो बाहर नही आता..
साहू - तो? फिर क्या हुवा?
रेखा - नेहा भाग निकली रामन के हाथ से.. लालनबाई देख रही थी तमाशा.. उसने नेहाको पकडनेकी कोशिश की.. नेहाने इस उमरमे पिक्चरमे दिखाते है वैसे एक बोतल फोडके लालनबाईके थोबडेपे मारा... लालनबाईके गालसे बहोतही खून बहने लगा.. अभीभी उस कमरेमे खून दिखता है.. साफ कररहे है सब मिलके.. लालनबाईने और रामनने प्लॅन बनाया.. ये लडकी डेंजर है.. कुछभी करेगी.. इसको छोड देंगे तो पुलीस का मामला करदेगी.. इसलिये उसको हफ्तेभरके लिये बंद करके रख्खेंगे.. नेहा को बंद करने गये तो उसने रामनका हाथ काटा.. रामनके हाथसेभी बहोत खून बहने लगा.. उसके बाद तू आके गया था.. अंदर क्या हुवा था.. क्या क्या होता है.. किसीको पता नही चलता... नेहा बंद थी.. बादमे रामनने उसकी इज्जत लूटली.. हम लोगोंके सामनेही.. हमारी सुरते देखनेलायक होगयी थी.. लेकिन कुछ बोल नही सकते.. ऐसा कहना पडता है के रामन जो कररहा है वही सही है.. नेहाको ऐसाही मारना चाहिये.. नेहा चिल्लारही थी.. हमसे मदद मांग रही थी.. जानबुझकर उसे हमारे सामने नंगा करदिया गया.. जानबुझकर हमारे सामने इज्जत लूटलीगयी उसकी.. ताकी वो कभीभी आवाज ना निकाले दोबारा... लेकिन नेहा.. नेहा बहोतही डेंजर है.. इतना चिल्लाने लगी की पीछेके मंदीरमे आवाज गयी.. वहांसे लोग दीवारपे चढके देखनेकी कोशिश करने लगे.. फिर रामन नेहा को उठाकर अंदर ले आया.. नेहा हमारे अंदाजेके बाहरकी लडकी निकली.. वो नंगीही उठके बाहरके दरवाजेके तरफ भागी.. अण्णा आगया उतनेमे..

साहू - कौन अण्णा??

रेखा - अण्णा हमारे पुलीस वुलीसके मामले देखता है.. परमिट निकालके देता है धंधेका.. परमिट पुराना होगया तो नया बनाकर देता है.. और.. यहांका सबसे पुराना ग्राहक भी है.. कई बार तो फोकटमे ***के जाता है लडकी... लालनबाईके लिये अझीझ है वो... अण्णाने नंगी नेहाको देखकर उसको जखडा.. अण्णाके हाथसे छुटना मुमकिनही नही है.. लेकिन नेहाने अण्णाका भी हाथ काटा.. लेकिन अण्णाका खून नही बहा.. अण्णाने उसे उठाके अंदर लाया और लालनबाईके कमरेमे.. तू आया था ना उस दिन.. उस कमरेमे जाकर नेहाका फिर रेप किया.. रामन नेहाको मार रहा था.. अण्णा उसपर **रहा था.. और लालनबाईने उसी बोतलसे नेहाके चेहरेपर वार किया.. नेहाके होश चले गये..

साहू - ये सब.. इतना सब.. और..
रेखा - अंहं! गोपीभी नही जानता ये सब... बाहर किसीको पता नही चलता.. सिर्फ एकही है जिसको मालूम है के ये हुवा है....
साहू - कौन??
रेखा - उरवणे... वो *** पुलीसवाला..
साहू - कैसे??
रेखा - अण्णाका दोस्त है.. उरवणे लडकीके साथ इन्सानियतसे पेश नही आता.. उसे तो उलटा ये सब अच्छा लगता है..
साहू - तो?? फिर?? फिर क्या हुवा?
रेखा - फिर दारू के नशेमे लालनबाई, रामन और अण्णा बाते करने लगे.. लालनबाईने कहां की वो कल बॉम्बे जायेगी.. रामन जायेगा इंदापुर.. और दो लडकिया नेहाको बोलेंगी के उसको भगा रही है.. ऐसा बताके लक्ष्मी रोडपे खडी करेंगी... दूर अण्णाकी गाडी को इशारा मिलजायेगा... एक सेकंदमे नेहाको खतम करके गाडी आगे अल्पना टॉकीजकी तरफसे कॅम्पमे चली जायेगी... उरवणे रातमे ड्युटीपर होगा.. पंचनामा वही करेगा.. अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू...
साहू - क्या??
रेखा - मतलब.. अन्जान गाडीसे टकराके मौत...
साहू - क्युं लेकिन?? इतना बुरा क्युं करेंगे?
रेखा - नेहा खुशकिस्मत है जो छुटरही है इस नरकसे...
साहू - क्या बाते करती हो??
रेखा - क्या बाते करती हूं?? सुनना चाहता है और आगे??
साहू - क्या??
रेखा - नेहाको लक्ष्मी रोडपे लेजानेका काम.. लालनबाई और रामनने..... मुझपे सौंपा है..

बुधवार पेठ! जन्माला येणे हे चूक आहे हे शिकवणारी शाळा..

स्वभावाने शांत असलेल्या साहूच्या आवरणांवर आज आजवरचे सगळ्यात मोठे आणखीन एक वेष्टन बसले होते... आपली आई यातूनच गेलेली आहे आणि तरी आपल्यावर प्रेम करत आहे हे आठवल्यामुळे साहूला नेहाबद्दल पराकोटीची कीव वाटू लागली. आणि त्या कीव वाटण्यातून उरवणे, अण्णा, रामन आणि लालनबाईबद्दल पराकोटीचा संताप!

बसल्या जागी हादरलेला साहू भूत बघावे तसा शुन्यात बघत होता. रेखाचा चेहरा अत्यंत भकास झालेला होता.

साहू - .. ये.. मुझे...
रेखा - तुझे इसलिये बता रही हूं... के..
साहू - .....????
रेखा - मै.. किसीको मारना नही चाहती हूं.. और.. किसी औरको बताऊंगी तो नेहासे पहले मुझे मारने का प्लॅन बनादेंगे ये.. क्युंकी लालनबाईके कोठेकी बातमी हर किसीको चाहिये होती है.. पुरे बुधवारमे फैलाने के लिये.. क्युंकी लालनबाई सबसे नफरत करती है.. उसकी किसीके साथ नही बनती..
साहू - तुम.. बीमार हो ये भी तो बोलसकती हो??

रेखाने निश्वास सोडला.

रेखा - ये तीन लडकियोंमेसे सबसे पहले जो गयी ना? ग्राहक आया करके?? उसका नाम है पायल! अगर उसको पता चलजायेगा की तू अभीतक यहां बैठा है तो ग्राहक को छोडके यहा आजायेगी.. यहा किसी लडकीका किसी दुसरे लडकीपर विश्वास नही है.. पायल शिकायत करेगी.. लालनबाई और रामन मुझे मारेंगे.. और अगर पायलने कुछ किया.. तो शायद मै भी शिकायत कर सकती हूं.. यहा खुदको बचानेके लिये दूसरेको बुरा साबीत करना जरूरी है.. रात का राजा है ये.. डिस्को नही..
साहू - मुझे.. बताकर क्या.. फा
रेखा - तुझे इसलिये बताया की ये चीज अपनी मां को जाके बोल.. हमारी हिम्मत नही है रात के राजाके दरवाजेसे पाच फूट इधर उधर जानेकी.. हां.. यहांकीस अबसे पुरानी औरत मंदाकी नजरमे ग्राहक ढुंढनेके लिये लक्ष्मी रोडपे जरूर जा सकते है.. लेकिन मंदाकी नजरमे.. मंदा खुद अच्छी है.. लेकिन डरके मारे वो भी चुगली करतीही है.. हम बाहर नही जा सकते.. लेकिन किसीको जबरन अंदर जरूर ला सकते है.. नेहा को देखेगा???

नेहा को देखेगा??

काय प्रश्न होता हा! साहूला हो म्हणावे की नाही हे समजत नव्हते. रेखाने त्याला उठवले अन हळूच त्याचा हात धरून खोलीतून बाहेर डोकावली. कुणाचीच चाहुल नाही हे पाहून अत्यंत अंधार्‍या बोळकांड्यांमधून पंधरा वीस सेकंद चालल्यावर एका खोलीच्या दाराची बाहेरून लावलेली कडी तिने काढली. साहू हादरून रेखाच्या मागे उभा होता. खोलीत अतिशय मद प्रकाश असावा. गहिरा, रहस्यमय आणि.. अभद्र प्रकाश!

रेखाने खूण केल्यावर रेखा दारातच उभी राहिली आणि साहू दारातून एक पाऊल आत आला..

आतमधले दृष्य पाहून साहू जागच्याजागी शहारून तडफडला..

आजवरचे बुधवार पेठेतील सगळ्यात अभद्र दृष्य होते ते.. जमीनीवर अर्धवट शुद्धीत पहुडलेली नेहा..

अंगावर एक चिंधी नाही.. एक डोळा सुजून काळानिळा पडलेला.. गालावर मोठी जखम.. अंगावर ओरखडे.. तोंडातून एक रक्ताचा ओघळ येऊन जमीनीवर वाहिलेला.. हिला कशी उभी करंणार लक्ष्मी रोडवर रात्री?? करतील.. तेही करून दाखवतील.. नेहा पडल्या पडल्याच कण्हत होती. काहीतरी अर्थहीन उच्चार करत होती. वय किती? वय चवदा.. चवदा वर्षे! सगळे देहधर्म जागेवरच झालेले..

मळमळून ओकायची इच्छा होत होती साहूला तिथे..

काढता पाय घेतला तरी डोळ्यांसमोरून ते दृष्य जाईना साहूच्या..

परत आले मगाचच्या खोलीत...

रेखा - बतायेगा मां को?? मै डिस्कोमे आना चाहती हूं साहू... यहांकी हर लडकी आना चाहती है.. बतायेगा मां को?? हम लोग वहां इतने सुंदर तो है नही.. लेकिन फिर भी.. सस्तेमे रहेंगे.. कामभी करेंगे डिस्कोपर.. बतायेगा मां को??

वेष्टन! दारूच्या अदृष्य साठ्यावर बसलेले आणखीन एक वेष्टन!

रेखा - और.. अगर नही बतायेगा तो.. एक बात मानले मेरी..

मगाशी वाट्टेल ते करणारी रेखा चक्क साहूच्या पायावर डोके टेकत होती.. साहू हादरून दोन पावले मागे झाला..

रेखा - अगर नहीभी बतायेगा तो भी.. कमसे कम इतना मत बता की मैने तेरेसे ये सब बाते की.. नही तो.. मै मरजायेगी साहू.. मरजायेगी मै...

शालन आणि गोपीने तत्वज्ञान सांगीतले होते खरे.. पण इथे डोळ्यासमोर तत्वज्ञान होते.. जिवंत तत्वज्ञान!

साहू - मां को बतानेकी जरूरत नही है.. मै देखता हूं ... नेहा नही मरेगी.. तुम लेके जरूर जाओ उसे लक्ष्मी रोडपर... लेकिन.. वो मरेगी नही..
रेखा - पागल मत बन.. नेहा को बचाने जायेगा तो कबीरसे पहिले रामनही तेरी जान लेलेगा..

कबीर आणि अमजद यांच्याशी आपलं असलेलं वितुष्ट या मुलीलाही माहीत आहे हे पाहून साहूला धक्काच बसला.

रेखा - सिर्फ मां को बता.. बोलना रेखाको डिस्कोपे ले आ.. कुछभी सौदा कर.. मै आके धंधा करके पैसे फेडदुंगी.. बोलेगा?? उसके बदलेमे .. तू जो चाहेगा वो मै करुंगी.. बोलेगा??

निश्चल साहूने अलगद होकारार्थी मान हलवली.

रेखाने अत्यानंदाने साहूला जवळ ओढले. रेखाच्या स्पर्शात गेली पंधरा मिनीटे जे जाणवले नव्हते ते साहूला आता जाणवले. आग! नुसती आग! तिच्या त्या मुलायम मिठीमुळे साहू भांबावला होता. रेखाने आपले तप्त ओठ साहूच्या ओठांवर टेकवले.

शालनदीदी! झिरमी.. संगीतादीदी... सलोनी.. प्रार्थना.. चारू.. श्रीदेवी...

आजवर ज्या ज्या स्त्रियांच्या अंगोपांगाकडे केवळ चोरून कुतुहलाने बघितल्यामुळे साहूतील पुरुष बनत आला होता त्या पुरुषाला या क्षणी त्या सगळ्या स्त्रियांच्या आठवणि एकदम मनात आल्या...

रेखाला कसलीही कल्पना किंवा अपेक्षा नसताना साहूने रेखावर झेप घेतली..

आजवर एकाही स्त्रीशी संबंध न आलेल्या साहूला आज पहिल्यांदा कळले... ते सुख काय असते.. कसे असते.. ते मुळात.. सुख का असते...

आणि... गेली चार वर्षे आजवर दिवसाला नवीन पाचजणांशी संबंध आलेल्या रेखाचे आजचे समर्पण वेश्येसारखे नव्हते.. ते होते प्रियेसारखे... रेखा या मुलीच्या चेहर्‍यावर आयुष्यात पहिल्यांदाच साहूने लज्जा पाहिली होती.. डोळे मिटलेले पाहिलेले होते.. तिच्यातील गणिका निदान मनाने संपवायला साहू जबाबदार ठरला होता.. साहू.. रेश्मा... थापा...

साहू - ये.. ये क्या हुवा तुझे??

तुम वरून तू वर आलेल्या साहूला रेखाच्या उघड्या छातीवर उजव्या बाजूला असलेला मोठा व्रण दिसला.. बहुधा भाजल्याची खूण असावी..

रेखा - लालनबाईने जलाया था.. पहिले दिन.. मै भी नेहाकी तरहा चिल्ला रही थी.. लेकिन.. लालनबाईने जलाया.. उसी कमरेमे मुझे फेक दिया.. होश गये थे मेरे.. दो दिनके बाद पानी दिया पीने को.. बादमे... रामनने अपने पास बुलाया.. मै पंधरा बरसकी थी.. रामनने अपनी मर्जी चलायी.. किसको सुनाऊ ये कहानी.. तुझे पता है?? तेरी मां बहोत खुशकिस्मत औरत है.. उसे इस्माईलने कभी कुछ किया नही.. कभी शालनसे पूछ.. इस्माईल कैसा आदमी था.. रामन.. इस्माईलसेभी हरामी है.. हैवान है रामन..

साहूने अलगद आपली बोटे तिच्या त्या व्रणावरून फिरवली.

साहू - मै.. तुझे कभी.. छोडुंगा नही रेखा..

खदाखदा हसेल रेखा ते वाक्य ऐकून असा साहूचा अंदाज होता. आत्तापर्यंत अशाच रेखाला त्याने पाहिले होते..

रेखा - छोडुंगा नही? पायेगा कब मुझे? कलसे यहां अंदर पैर भी नही रख सकेगा तू! परसोही लालनबाई बोलरही थी! रेश्माका बच्चा नेहाकी पुछताछ कर रहा था.. उसे अंदर मत लेना कोई.. लेकिन.. ये बात वो सिर्फ मेरे सामनेही बोली.. नही तो.. आज भी अपनी मुलाकात नही होती..

आपण पुरुष आहोत याचा कोण अभिमान बाळगत जेव्हा साहू रात का राजा च्या बाहेर पडला तेव्हा.. गोपी समोरच्या भिंतीला रेलून त्याची वाट पाहात असलेला दिसला.

गोपी - अंदर कैसे गया? मां को मत बोल.. कैसे गया अंदर लेकिन??

साहूचे वाक्य ऐकून मात्र गोपी मुळासकट हादरला.

साहू - अण्णा को जानते हो????

किमान दहा सेकंद गोपी एकटक साहूकडे पाहात होता. रेखाबरोबर संबंध आले हे सोडून साहूने बाकीचा सगळा प्रकार सांगीतल्यावर गोपी म्हणाला..

गोपी - रेखा डिस्कोपे नही आ सकती...
साहू - क्युं???

ब्लाऊजमधून एक सिगारेटचे थोटूक काढून ते पेटवत बेदरकारपणे गोपी म्हणाला..

गोपी - कहा रखती है रेश्माबाई एड्सवालोंको डिस्कोपे???

गुलमोहर: 

नेहमि सारखेच......fantastic....great writing....

पु. ले. शु.

शेवतची ओळ म्हणजे एक धक्काच असतो भूषणराव.....
अप्रतिम पकड.....

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

डो.कैलास

हे कसल अभद्र आहे जिवन.
एकदम भक्कास आहे हे सगळ.
शेवटचा पन्च नाही, एक अतिशय विदारक सत्य आहे ते...................................................