उपग्रह वाहिन्यांवरती अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या नवनवीन मालिकांचे पीक आले आहे. त्याच त्या 'साँस बहुच्या' विषयाला कंटाळेले प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी उपग्रह वाहिन्या भडक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या मालिका दाखवत आहेत. अश्या प्रकारांमधुन अंधश्रद्धेला बळच मिळत आहे.या मालिकांमधुन ज्योतिष ,करणी, भानामती यासारख्या अशास्त्रिय गोष्टींचा भडीमार सतत चालू असतो. कायद्याने अश्या प्रकारांना आळा घालता येणे शक्य आहे का?
याविषयी मटामध्ये आलेल्या लेखाची लिंक देत आहे maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-10279690,prtpage-1.cms
गर्भसंस्कार म्हणल की आपल्या समोर अनेक गोष्टी येतात. नेमके काय करायचे या बाबत अनेक होणार्या आई वडिलांच्या मनात संभ्रम असतो.संस्कार म्हणजे सातत्याने केलेला प्रयत्न.संस्काराची व्याख्या करताना " संस्कारोही गुणांतरधानम्"अशी केली जाते. संस्कार म्हणजे वाइट गुणांचे चांगल्या गुणांमधे रुपांतर करणे. होणार्या आई वडिलांना जेव्हा आम्ही विचारतो, की, संस्कार म्हणजे तुम्हाला काय अपेक्शीत आहे? तुमच्या बाळा मध्ये तुम्हाला कोणते गुण असावेत असवाटत? तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम दिसुन येतो. त्यांना अस वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवेकानंद यांच्यासारखे गुण असावेत.
स्त्री आणि पुरुष, दोघांपैकी श्रेष्ठ कोण हा वाद शतकानुशतके चालू आहे. दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद ऐकायला . मायबोलीकरांची यावर काय मते आहेत?, स्त्री पुरुष समानतेच्या युगात या विषयावर उघड आणि निकोप होऊ शकते.
टिप:-१) हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये.
२ )इथे शास्त्रीय, जैविक, सामाजिक कारणे द्यावीत योग्य ठिकाणी लिंक द्याव्यात.
मंडळी
इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने) ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.
तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
गेले काही दिवस बर्याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?
गुरुवार, ७ एप्रिल २०११ हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जात आहे.
काय आहे आपल्याकरता ’आरोग्याचा अर्थ’?
डॉ.आनंद नाडकर्णी यांनी अनेक दशकांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते, ज्याचे नाव होते 'वैद्यकसत्ता'.
आजच्या संपन्न जीवनात वैद्य म्हणजेच डॉक्टर अनभिषिक्त सत्ता गाजवू लागलेले दिसून येतात. तर आजच्या विपन्न जीवनात वैद्य म्हणजे डॉक्टर, औषधालाही सापडत नाही अशी अवस्था प्रत्यक्षात आहे.
गुरू बंकेईला एका विद्यार्थ्याने विचारलं, माझ्यातला क्रोध जाण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.
गुरू म्हणाला, दाखव बरं कुठे आहे तुझा तो क्रोध...
विद्यार्थी म्हणाला,,, आत्ता नाहीये तो माझ्याजवळ... मग कसा दाखवू?
गुरू- तो जेव्हा तुझ्यात येईल ना तेव्हा दाखव
विद्यार्थी- तेही नाही जमायचं.... कारण इथे येईपर्यंत तो अदृश्यच होईल...