स्त्री व पुरुष.... श्रेष्ठ कोण ???

Submitted by नथिंगनेस on 30 January, 2012 - 10:20

स्त्री आणि पुरुष, दोघांपैकी श्रेष्ठ कोण हा वाद शतकानुशतके चालू आहे. दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद ऐकायला . मायबोलीकरांची यावर काय मते आहेत?, स्त्री पुरुष समानतेच्या युगात या विषयावर उघड आणि निकोप होऊ शकते.
टिप:-१) हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये.
२ )इथे शास्त्रीय, जैविक, सामाजिक कारणे द्यावीत योग्य ठिकाणी लिंक द्याव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे.. काय केलत हे.. आता स्त्रीमुक्तीवाले तुम्हाला वाळीत टाकतील.

सायो, अनुमोदन.
थोडीशी दुरुस्ती.
रिकामा केशकर्तनकार, भिंतीला तुंबड्या लावी.

शास्त्रीय, जैविक, सामाजिक कारणे हवीत... बीबी तत्वज्ञान विभागात का उघडला?

अभिजन केशकर्तनात कसे पडतात, पडल्यावर (अभिजन असून) रिकामे कसे राहतात आणि मग रिकामे राहिल्यावर काय काय करतात याची समाजशास्त्रीय मीमांसा करा बरं कोणीतरी.

देवा...

स्त्रीयांच्या विरोधात व पुरुषांच्या बाजूने ही पोस्ट टाकलेली नाही .ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी प्रतिसाद देऊ नये.

१) हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये. <<<
अय्या मग काय गर्बा खेळण्यासाठी काढलाय का?

स्त्री व पुरुष.... श्रेष्ठ कोण ??? तिथेच वाद निर्माण झाला की राव..

कशाला उगाच लिहिताय खाली की हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये. कै च्या कै...

ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी प्रतिसाद देऊ नये.<<<
१. आधी इंटरेस्ट म्हणजे काय ते सांगा.
२. कुणाला इंटरेस्ट आहे की नाही ते पुरूष ठरवतात की स्त्री या प्रश्नाचं चिंतन करा.
३. प्रतिसाद द्यावा की देऊ नये हे सांगायचा अधिकार स्वतःच्या खिशातून दमडा खर्च करून ही साइट उभी ज्यांनी केली त्यांनाच आहे. तेव्हा हुर्रर्रर्र!!

एकही प्रतिसाद देणार नव्हतो........पण एकच प्रतिसाद द्यायला आलो........ बादवे हेमाशेपो.
सायो
Lol
Proud

धर्मवेत्ते, तत्ववेत्ते ,वैज्ञानिक,कलाकार यांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात अभावानेच एखादी स्त्री सापडते >>
एफ बी आय चे टॉप टेन मोस्ट वॉंटेड, चाइल्ड मॉलेस्टर्स, व्हायोलंट मर्डरर्स, ड्रग डीलर्स, बर्नी मॅडोफ सारखे लोक, डिक्टेटर्स, जिनोसाईड करणारे राजकारणी यात पण तेच. पण तुम्हाला त्याचे महत्व नसावे कदाचित

वैज्ञानिक, कलाकार, व तत्ववेत्ते याबद्दल तुम्ही कुठली यादी पाहिलीत तो संदर्भ इथे देणार का प्लीज .
या यादीत कोण नाव येण्यासाठीचे निकष काय, ते कोणी केलेत ( स्त्रियांनी की पुरुषांनी) तेही स्पष्ट करा.

.पुढे जाऊन असेही म्हण्टले जाते कि पुरुषप्रधान संस्कृतीचा विकास हा पुरुषांच्या सर्व बाबतीतल्या श्रेष्ठत्वामुळे झाला आहे.>> कुठून पुढे गेल्यावर असे म्हटलेले आहे ? कोणी म्हटलेले आहे ? त्या म्हणण्याला पुरावा काय ? त्याच्या अगोदर काय म्हटले जात होते ?

नाहीतर हे बेजबाबदार विधान केवळ वाद करण्यासाठीच आहे !

अॅडमिन......लक्श द्यावे.....विनाकारण वाद उत्पन्न करण्यासाठी धागा काढला आहे..?

जगभरातले धर्मवेत्ते, तत्ववेत्ते ,वैज्ञानिक,कलाकार यांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यात अभावानेच एखादी स्त्री सापडते, हा निव्वळ योगायोग असु शकतो का ?

बायका चूल अन मूल करतात म्हणून पुरुषाना असले रिकामे धंदे करता येतात!

हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये.
>>>व्हॉट अ जोक्???हा,
असा वाद करण्यायोग्य आहे असे वाटणार्‍यास चौकात उभे करून चाबकाने फोडावे.

नावाप्रमाणेच मेंदूतही नथिंग नेस असलेल्या सद्गृहस्था
http://www.cwu.edu/~chem/sciencecalendar.pdf या लिंकवर जा व किती स्त्रिया सायन्स मध्ये योगदान करणार्‍या आहेत ते मोजा,धाप लागेल!!!

रेव्यु, मेधा, तुम्ही इतका त्रास करून घेऊन सीरियस पोस्ट टाकाव्यात इतक्याही लायकीचा धागा नाहीये हा. दुर्लक्ष करा सरळ. Happy

नथिंगनेस, मला माहित आहे उत्तर. पण आधी तुम्ही जगात एक्झॅक्टली किती वाळूचे कण आहेत ते सांगून प्रूव्ह करून दाखवा. मगच मी उत्तर सांगेन. Proud

बाफचा विषय असलेल्या प्रश्नाची उत्तरं संभवतात.

१. पुरूष श्रेष्ठ
२. स्त्री श्रेष्ठ
३. दोघेही श्रेष्ठ
४. कुणीही श्रेष्ठ नाही

चला. तुमचं समाधान झालं असावं .. यापेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित असल्यास सांगावे.

हा वादासाठी नसुन चर्चेसाठी काढलेला धागा आहे. ज्यांना वाद घालायचे आहेत त्यांनी ईथे येऊ नये एवढे सांगण्याचा अधिकार पोस्ट करणार्याला निश्र्चितच आहे.

Pages