उपग्रह वाहिन्या आणि अंधश्रद्धा

Submitted by जेम्स बाँड on 7 March, 2012 - 00:23

उपग्रह वाहिन्यांवरती अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या नवनवीन मालिकांचे पीक आले आहे. त्याच त्या 'साँस बहुच्या' विषयाला कंटाळेले प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी उपग्रह वाहिन्या भडक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या मालिका दाखवत आहेत. अश्या प्रकारांमधुन अंधश्रद्धेला बळच मिळत आहे.या मालिकांमधुन ज्योतिष ,करणी, भानामती यासारख्या अशास्त्रिय गोष्टींचा भडीमार सतत चालू असतो. कायद्याने अश्या प्रकारांना आळा घालता येणे शक्य आहे का?
याविषयी मटामध्ये आलेल्या लेखाची लिंक देत आहे maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-10279690,prtpage-1.cms
मायबोलीकरांचे याविषयीचे अभिप्राय स्वागतार्ह आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users