कुठेही जाता

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कुठेही जाता
आकाश तेच आहे
तोच चन्द्र, तोच सुर्य
चांदणेही तेच आहेत
पायाखाली जमीनच आहे
पाखरांचे चेहरे अपरिचित
किलबील तशीच मंजुळ आहे
अन्न वस्त्र निवारा
जगण्याच्या गरजाही त्याच आहेत
सभोवतालच्या वर्तुळाचा परिघही
जेमतेम तेवढाच आहे
फक्त एकच की
खूप काही प्रेमाने सामावलेले
स्वकष्टाने जमवलेले
कक्षेच्या बाहेर सहज निसटून गेले आहे!

- यशवंत/बी

विषय: 
प्रकार: