गर्दी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गर्दीपासून दुर दुर किती दुर जावे?
तिथे भेटेल गुडघाभर गवत
क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ
आकाशाची निळाई
अवकाशाची अथांग पोकळी
पाखरांची अगम्य भाषा
रातकिड्यांची किर्र अंगाई
दुपारची निबीड छाया
सकाळची पुर्वाई
रात्रीची जाईजुई

कदाचित जीव होऊन जाईल विरक्त
तर लाभेलही मोक्ष.
पण इथे कुणाला महती त्याची!

होऊन जावे गर्दीतल्या गर्दीत अलिप्त
परंतू शांतचित्त!

- यशवंत/बी

प्रकार: