मायबोली गणेशोत्सव २०१५

बाप्पा इन टॉप गिअर -शलाका पाटील - सई - ७ वर्ष

Submitted by शलाका पाटील on 26 September, 2015 - 03:55

काल रात्री बसुन चित्र रंगवले एकदाचे पण चित्र रंगवता रंगवता दहा वेळा विचारले बाप्पाने हेल्मेट का नाही घातला daddy घालतो तसा … आता तुम्हीच दया उत्तर

IMG_20150925_212659.jpg

बाप्पा इन टॉप गिअर - नरेश माने - यतिन - वय ७ वर्ष

Submitted by नरेश माने on 25 September, 2015 - 03:26

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीवर बच्चेकंपनीसाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली असता. मला पण सहभागी व्हायचंय ही पहिली घोषणा झाली. चित्र काढून रंगवून झाले. आता स्कूटरवाल्या बाप्पांचे चित्र कधी आणताय हा रोजचा लडका मागे लावला होता. घरी गणपती बाप्पांचे आगमन झाल्यामुळे चित्राची प्रिंट आऊट काढायला वेळ मिळत नव्हता आणि घरी गेल्यावर पहिला प्रश्न "आणले का स्कुटरवरच्या बाप्पांचे चित्र?" अखेरीस काल मुहूर्त मिळाला आणि स्वारी सुध्दा खुष. Happy

विषय: 

ज्युनिअर चित्रकार - माझे आवडते वाहन: झू झू रॉकेट - राजस

Submitted by निंबुडा on 24 September, 2015 - 12:39

मायबोलीच्या अंतराळकक्षेत आमच्या अंतराळयानाने प्रवेश केलेला आहे. सीट सोडून हलू नका कुणी! लवकरच चंद्रावर उतरायला मिळेल एकेकाला. चला आपापले पट्टे घट्ट करून बसा पाहू! Happy

झू झू झू झू झू झू रॉकेट
चंद्राला देऊया गमतीची भेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

रॉकेट निघाले झू झू वरती
वार्‍याशी दोस्ती ढगांशी मस्ती

तेचबूक! - धनंजय माने

Submitted by sonalisl on 24 September, 2015 - 11:35

तेचबूक! - धनंजय माने
स्टेटस अपडेट :
आज नाश्त्याला थालीपीठ पाहून माझा अत्यंत जवळचा मित्र अमिताभ बच्चन याची आठवण आली. त्याचा आवडता पदार्थ. शाळेत असताना मला रोज डब्यात थालीपीठच न्यावे लागायचे. तसा हट्टच असायचा त्याचा, नाहीतर माझ्यावर खूप चिडायचा. आता कामाच्या व्यापामुळे आमची बरेच वर्ष भेट नाही झाली. पण जेव्हा भेटू तेव्हा थालीपीठाचा बेत पक्का Proud

५६ लाईक्स. २ डिस्लाईक्स.

परशुराम : माझ्याकडे बिडी मागायचा Biggrin पण गुणी कलावंत हो!

विश्वासराव सरपोतदार : हो का? बऽऽऽरं!!

शंतनू : lol दादा हसून हसून पडलो मी Rofl

विषय: 

बाप्पा इन टॉप गिअर - स्वाती पटेल - ओजल - वय वर्ष ४

Submitted by swati_patel on 23 September, 2015 - 21:54

ओजल चा आवडता बाप्पा Happy

IMG_2615.JPGIMG_2616.JPG

विषय: 

- बाप्पा इन टॉप गिअर - जम्बो - ज्ञानेश - वय वर्ष ७

Submitted by जम्बो on 22 September, 2015 - 23:09

प्रशासक आणि संयोजक धन्यवाद

g1-2015-3.jpg

विषय: 

'अशी ही अदलाबदली' - पा. कॄ. क्र. १ - गाजर आणि चणा डाळ वडी बदलून पनीर आणि बीट वडी

Submitted by आशिका on 22 September, 2015 - 05:41

पनीर आणि बीट वडी

बदललेले घटक

१. गाजराऐवजी पनीर
२ चणा डाळीऐवजी बीट रूट

लागणारा वेळ - ३० मिनिटे
साहित्य

१) ३ कप पनीर
२) १ कप साले काढून किसलेले बीट
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कॄती

१. पनीर कुस्करुन घ्यावे.
२. बीटाची साले काढून किसून घ्यावे व ओले खोबरे वाटून घ्यावे.
३. पाऊण कप साखर घ्यावी.

विषय: 

कथासाखळी - वरदान

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 01:53

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.

===========================================================================

तुम आ गए हो नूर आ गया है
नहीं तो चिरागों से लौ जा रही थी
..
घराच्या बेलच्या सहा-सात ट्यून्स्‌पैकी नेमकी हीच ट्यून चंद्रकांताच्याच एंट्रीला कशी काय वाजते, याचं दीपाला नेहमी नवल वाटायचं. चंद्रकांता आली, टकटक आवाज करणार्‍या चपला कोपर्‍यात काढताकाढताच सरकवल्या. खांद्यावरची पर्स तिथेच भिंतीला लावून ठेवली. ओढणी काढून त्यावर पांघरली. चटचटा आत शिरत म्हणाली,

विषय: 

तेचबुक ! - गणेश

Submitted by मंजूताई on 21 September, 2015 - 06:18

फेबुवरचा वावर अगदी नगण्य आहे तसेच मालिकांच् ज्ञानही तोकडेच तरी प्रयत्न केलाय …..
प्रेरणाः मामी, साती
गणेश ः डॉ सातीच्या सल्ल्यानुसार मामी कैलासजीवनाने लगेच आराम पडला. तुर्तास इतक्या दूर् मामाकडे जाणे कॅन्सल केले आहे.... पण आपल्या पृथ्वीतलावरच दहा दिवसांचा टूर करायचं ठरवलंय ... नक्की कुठे कुठे जायचंय ठरवतोय...
लाईक्सः ९८७६५४३२१०००००
सिध्दीः आधी मायबोलीवर जा. तिथे माझ्या गावात जा ... मग ठरव कुठ्ं कुठं जायाचं......
लाईक्सः ९८७६५४३२१००००० +१ +१ .... (मायबोलीची सदस्य संख्या)
अनलाईकः पार्वती
पार्वतीः लहानपणापासूनचा हट्टी स्वभाव लग्न झालं तरी बदललेला नाही...
अनलाईकः सिध्दी

ज्युनिअर चित्रकार - माझे आवडते वाहन- निमिष

Submitted by आशिका on 21 September, 2015 - 02:54

पाल्याचे नाव - निमिष
विषय - माझे आवडते वाहन

नमस्कार. खरे तर निमिषला चित्रकलेची अजिबात आवड नाही पण याउलट 'कार्स' हा त्याच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या कार्सची माहिती गोळा करणे, फोटो जमवून ते कात्रण स्वतःच्या वहीत चिकटवणे हा छन्दच. त्यामुळेच हा विषय समजताच मी कार काढून रन्गवेन ही घोषणा घरात झाली. मी पण मग त्याला हवी तशी काढून दिली. मासिकातील चित्र बघून त्यानेच काढून रन्गवलेली ही कार.

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१५