बाप्पा इन टॉप गिअर - नरेश माने - यतिन - वय ७ वर्ष

Submitted by नरेश माने on 25 September, 2015 - 03:26

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीवर बच्चेकंपनीसाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली असता. मला पण सहभागी व्हायचंय ही पहिली घोषणा झाली. चित्र काढून रंगवून झाले. आता स्कूटरवाल्या बाप्पांचे चित्र कधी आणताय हा रोजचा लडका मागे लावला होता. घरी गणपती बाप्पांचे आगमन झाल्यामुळे चित्राची प्रिंट आऊट काढायला वेळ मिळत नव्हता आणि घरी गेल्यावर पहिला प्रश्न "आणले का स्कुटरवरच्या बाप्पांचे चित्र?" अखेरीस काल मुहूर्त मिळाला आणि स्वारी सुध्दा खुष. Happy

Ganeshotsav 2015 024.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्तच रंगवलंय. पहिलेच बाप्पा जे अंधार्‍या रस्त्याने गाडी चालवताहेत. बाप्पांच्या पंजातूनही प्रकाश पडतोय असे वाटतेय.

सही आहे हे.. रंगाची निवड एकदम अचूक आहे..

पण सर्वात जास्त आवडले ते काळे ढग .. यावेळी सारेच ज्याची वाट बघत होते ते पावसाचे काळे ढग बाप्पा सोबत घेऊन आले Happy

छान! हेडलाईट खरोखर पेटल्यासारखा दिसतोय

>>

+१, अगदी खरच, मस्त आलाय हेड लाईट!

मस्त! Happy

सुंदर ! हेडलाइट एकदम भारी...
झाडाच्या मागे लाल फुलांचा मळा पण फुललेला दिसतोय.