तेचबुक ! - गणेश

Submitted by मंजूताई on 21 September, 2015 - 06:18

फेबुवरचा वावर अगदी नगण्य आहे तसेच मालिकांच् ज्ञानही तोकडेच तरी प्रयत्न केलाय …..
प्रेरणाः मामी, साती
गणेश ः डॉ सातीच्या सल्ल्यानुसार मामी कैलासजीवनाने लगेच आराम पडला. तुर्तास इतक्या दूर् मामाकडे जाणे कॅन्सल केले आहे.... पण आपल्या पृथ्वीतलावरच दहा दिवसांचा टूर करायचं ठरवलंय ... नक्की कुठे कुठे जायचंय ठरवतोय...
लाईक्सः ९८७६५४३२१०००००
सिध्दीः आधी मायबोलीवर जा. तिथे माझ्या गावात जा ... मग ठरव कुठ्ं कुठं जायाचं......
लाईक्सः ९८७६५४३२१००००० +१ +१ .... (मायबोलीची सदस्य संख्या)
अनलाईकः पार्वती
पार्वतीः लहानपणापासूनचा हट्टी स्वभाव लग्न झालं तरी बदललेला नाही...
अनलाईकः सिध्दी
शंकरः जाऊ दे गं तेवढाच दहा दिवस चेंज...
देव टूर्स ः जय व् अदिती आपली टुर प्लॅन करुन देतील .....
लाईक्सः वरच्या इतकेच जी मराठी व् त्यांचा प्रेक्षक वर्ग, अनलाईक्सः दाभोळकर, रजनी, केसरी, वीणा, कॉक्स अअॅन्ड किंग्ज....मोर (अधिक) टूर कंपन्या...
गणेशः पण एक प्रॉब्लेम आहे मी विमानातून येईन पण मला माझ्या मूषकाला बरोबर घेऊन जायचंय ... गावात फिरताना सोयीचे होईल....
देव टूर्सः अदिती काहीतरी मार्ग काढेल....
सिध्दीः मला नाही का सांगायचंस ... माबोवर एक धागा वाचण्यात् आला होता ... उंदराला बाहेर कसे काढावे....
गणेशः बाहेर कुठे मला विमानाच्या आत न्यायचे आहे ना ....
सिध्दीः अरे! तू माबोकर नाहीयेस तुला नाही कळणार...
लाईक्सः समस्त माबोकर... रोमातले माबोकर्स
अदितिः धन्यु! धन्स सिध्दी
लाईक्सः सिध्दी ,
सिध्दीः ... अय्या! धन्यु, धन्स म्हणते आहेस म्हणजे यु टू.....
लाईकः अदिति ,
अदितिः बाकी गप्पा कट्टा, गगो, ...... विपुत मारुः)
अदितिः एक सरप्राईज आहे सर आपल्यासाठी ... आपल्याबरोबर खाबोदा व भावजी असणार आहेत ....
लाईक्सः जी प्रेक्षक वर्ग.... मोर , अनलाईकः केसरी, वीणा, डॉ हवाखा...
देव टूरः आपल्या इटर्नरीप्रमाणे तिकीट बुक झाली आहेत, सर
गणेशः व्हेरी एक्सायटेड ...
लाईक्सःसिध्दी, ९८७६५४३२१००००० पीपल व समस्त माबोकर्स , अनलाईक्सः पार्वती, दाभोळकर.... व इतर वरच्या प्रमाणे
सिध्दीः आय टू ....
सिध्दीः मी एक्सायटेड आहे..... गटग सचित्र वृत्तांत वाचायला....
लाईक्सः पीपल संख्या व माबोससं, कॉमेंटः अदिति अँड मोर .... मी एक्सायटेड आहे गटग सचित्र वृत्तांत वाचायला.... +१ माबोससं
गणेशः आज जरा उसंत मिळाली ... नाना 'उपक्रमांना' हजेरी लावली .. मनसोक्त 'मिसळपाव' व मोदक खाल्ले .... 'ऐसी अक्षरे' गिरवून काढलेली बाप्पाची चित्रे बघून डोळ्याचे पारणे फिटले... आपली मराठी संस्कृति, 'मायबोली' जपतांना बघुन डोळे पाणावले... असे मी आपल्या 'मनोगतात' ही व्यक्त केले.
लाईक्सः वरच्या प्रमाणे, अनलाईक्सः वरच्या प्रमाणे
भावजीः. थॅन्क्स! खाबोदाचे तोंड बंद कसे ठेवायचे हा प्रश्न माबोकर्समुळे सुटला. पैठण्या परिधान केलेल्या समस्त माबोकरीणींना थँक्स.... एकाच पैठणीवर काम भागलं.... थँक्स टू एडिटर.... तथास्तु!
लाईक्सः तथास्तु
खाबोदाः खूप एन्जॉय केली ट्रीप... ' गोखले गृह्उद्योग्' प्रायोजित् 'आम्ही सारे खादाड' शुटिंगला जाम धमाल केली राव... एखाद दुसर्या दाण्या ऐवजी मुठभर काजू तोंडात टाकता आले.... पुढचे सगळे एपिसोड 'डायट' विशेष आहेत म्हणून बरंयं.... आपण भेटणार आहोत पुढच्या भागात गोखले गृहउद्योगचे मालक श्रीरंग गोखलेंच्या परिवारासोबत..
लाईक्सः ७८९३९२ मोर, अनलाईकः सौ खाबोदा
लाईक्सः वरच्या प्रमाणे , अनलाईकः खाबोदा, डॉ हवाखा... मोर
गणेशः आईच्या हातच्या मोदकाची आठवण येतेय.......
लाईक्सः पार्वती, शंकर... भारतवासी, मोर पीपल, अनलाईकः सिध्दी
गणेशः लॅन्डेड.... जी ने एकत्रच एकच एपिसोड करायचा ठरवलंय् म्हणून बरंय....
लाईक्सः वरच्या प्रमाणे, अनलाईक्सः इतर रंगीत वाहिन्या.....
खाबोदाः आज आम्ही होसुमीघच्या गोकुळात ....
भावजीः बाप्पा मोरयाच्या गजरात दणक्यात स्वागत केले...जानुने छान ओळख करुन दिली व् उखाणा तर ... ऐकाच .. एपिसोड बघाल तेव्हा ऐका , आता वाचा...
आले २ जी, ३ जी, ४ जी अन येतील ५ जी, ६ जी असे अनेक येतील फोन
..... व् मी विचारतो मंद्याला , ठरवली का ड्यु डेट अन् येतंय कोण
काssहो वहिनी, असा का उखाणा घेतलात, वैतागल्या सारखा.....
जानु उर्फ भाउः वैतागणार नाही का? लोक विचारु विचारु थकले बघा अन् मी उत्तर देऊ देऊ... व्हॉट्स अॅप का काय ते म्हणतात ना तिथही तोच प्रश्न तीच चर्चा....
आईः डोळ्याला पदर लावत ... श्रीचे बाबा आज असायला हवे होते ना ... श्रीचं कौतुक पाहायला...
लाईक्सः वरील प्रमाणे
डॉ हवाखाः डोक्याला शॉट लागला बघा ... अरे, स्क्रीप्ट वाचा नीट ... तुम्हाला डॉयलॉग नाहीयेत... शेजारी पाजारी म्हणून तुम्हाला फक्त गोखले कुटुंबाच्या मागे उभं राहायचंय.....हा डुप्लीकेटचा एपिसोड नाहीये.. भारत.... आज, तुमचं काही काम नाही... आज उकडीच्या मोदकांचा एपिसोड आहे.... तेव्हा... तुम्ही ... वि वि … समजला ना...
भारतः (बाह्याने डोळे व् नाक पुसत) @#!$%^&^*()(*&^%$#@!!@#$%^&*())(*&^%$#@!
लाईक्सः बी, टीना, टीना, योकु, सोन्याबापु, विदर्भवासी एनाआरव्ही.. मोर
लाईक्सः वरीलप्रमाणे अनलाईक्सः हवाखाची टीम
खाबोदाः आईआज्जी तुम्ही मला सांगा, मोदकाच्या तयार पिठाची आयडीयाची कल्पना कशी सुचली...
आईआज्जीः खरं सांगू का... मी व्यवसायातून रिटायर झालेय... तरी सांगते ... ज्याचं त्याला श्रेय द्यायलाच पाहिजे नाही का? देसायांच्या माईने कृती सांगितली अन प्रसादने त्यावर बरेच प्रयोग केले अन टिकाऊ पिठी तयार केली.
सिध्दीः मला शंका येतेय आईआज्जी पण …. श्रेय, प्रताधिकार वै…..
अदितिः मलाही ……
माईः कस्सं कस्सं…. मला काय बाई …. या माझ्या मुली विजु, मेघु विचारतात हो…. म्हणून आपली सांगत असते…
विजयाः आदर्शवादाचा बुरखा हळुहळू उतरवायचाच…. गोखल्यांच्या तयार पिठीचे मोदक…. येस्स्स
लाईक्सः तमाम गृहिणी वर्ग अनलाईक माई …. मोर
जाबाबाः शुटिंगला गेलो असतो तरी हरकत नव्हती… मला कला, तु गप्प बस म्हणायची वेळच नसती आली…. खाबोदा व् भावजींच्या जुगलब्ंदीत कलाला संधीच नसती मिळाली……ः)
मेदेबाः बाप्पाजी… बाप्पाजी…. आमच्यावर लक्ष असू द्या…. बाप्पाजी…. बाप्पाजी…..
गणेशः मी तर देश विदेशातले अगदी साधेपणाने धांगडधिंगा न घालता केलेल्या उत्सवाने भारावून गेलोय… ही, आपली मूळ् प्रथा, प्रदक्षिणा घालून् व्हाया उसगाव आपल्या मूळ् स्थानी मायदेशी परतो! खरंतर पोट भरल्ंय …. आपुलकीने …. पाहुणचाराने … पण तृप्तीची ढेकर येईल आईच्या हातचा मोदक खाऊन ………. हेच तर सार होतं नानांच्या बोधकथेच….. थँक्स! देव टूर्स, जी, माबो परिवार……

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिध्दीः मी एक्सायटेड आहे..... गटग सचित्र वृत्तांत वाचायला...>>>
सिध्दीः ... अय्या! धन्यु, धन्स म्हणते आहेस म्हणजे यु टू.....>>>
हे हे हे Happy छान आहे.

मस्त आहे. Lol

जर परिच्छेदात लिहिता आलं अथवा "लाइक्स्/डिसलाइक्स" हे शब्द ठळक केले तर आणखी मजा येईल असं मला वाटतय.