माझी भाची डरहॅम युनिवर्सिटी, न्यू कॅसल जवळ आहे, तिथे शिकायला जात आहे. पहिल्यांदाच घरापासोन दूर देशी जाणार आहे. तरी खालील माहिती हवी आहे.
न्यू कॅसल परेन्त फ्लाइट आहे तिथून पुढे डरहॅम परेन्त कसे जायचे बस कि ट्रेन कि अजून काही?
तिला रूम मिळणार आहे पण स्वयंपाक स्वतःचा स्वतःच करायचा आहे त्यानुसार ग्रोसरी स्टोअर त्या भागातील स्वस्त भारतीय खानावळ किंवा इतर जेवणाची सोय या बद्दल माहिती हवी आहे. तसेच यू.के. मधील विद्यार्थी जीवनासाठी उपयुक्त काही माहिती असल्यास जरूर द्या.
या भागात कोणी मायबोली कर आहेत का? घरून तिला काय काय सामान बरोबर द्यावे लागेल?
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
नमस्कार मंडळी,
मला परदेशी प्रवासा साठी काही माहिती हवी होती.
मला जगातील सर्व देश ( पर्यटन स्थळे) पहायची आहेत. या वर्षी सुरुवात करुन दर दोन तीन वर्षानी एखादी ट्रिप करयाची आहे.....
माबो करांपैकी भरपुर जण असे असतील कि ज्यानी वैयक्तिक, ग्रुप टुर केल्या असतील स्वताहा किंवा प्रवासी कंपन्यांसोबत. त्यांचे अनुभव काय काय आहेत ?
प्रवास customised tour घेउन करावा कि ग्रुप सोबत?
सगळे आयोजन स्वता: करावे कि प्रवासी कंपन्यांतर्फे गेलेले चांगले ?
प्रवासी कंपन्या ( केसरी, थॉमस कूक, कॉक्स अँड किंगस, राजा- राणी वगैरे) या बद्दलचे अनुभव काय काय आहेत ?
थंडी संपून वसंत ऋतू आणि उन्हाळा आल्यावर बर्याच जणांनी शनिवारी-रविवारी शहराच्या आसपास भटकंती सुरु केली आहे. अटलांटा आणि नॉर्थ जॉर्जिया परिसरात एक किंवा दोन दिवसांत जाऊन येण्यासारखी काही छान ठिकाणं आहेत. ह्यांपैकी काही बघितली असल्याने माहिती संकलनाच्या दृष्टीने ’जॉर्जिया’ ग्रूपमध्ये जसं जमेल तसं ह्या ठिकाणांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. बाकीच्यांनीही आपले अनुभव, आवडलेल्या / न आवडलेल्या गोष्टी लिहा. तसंच कोणाला इतर कुठल्या ठिकाणांबद्दल लिहायचं असेल तर वेगळा धागा काढून लिहू शकता. अटलांटा बाफवर तसं नमूद करा.
-----------------------------------------------------------------------------------
आम्ही काही मित्र ४ मे ते १५ मे (११ दिवस) पर्यंत उत्तरांचल फिरायला जाणार आहोत. उत्तरांचलमध्येच मित्राचे घर असल्याने ३ दिवस तेथे मुक्काम व नंतर नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा इ. फिरण्याचा मानस आहे.
साधारण बेत असा आहे.
अनुदिनी: अक्षरधूळ Chandrashekhar's Marathi Blog http://chandrashekhara.wordpress.com/
अनुदिनीकार: चंद्रशेखर आठवले, पुणे
अनुदिनीची सुरूवातः जानेवारी १३, २००९ च्या सुमारास झाली असावी. कारण त्यावेळी लेखक लिहितात, “ गेली कांही वर्ष़, वेडेवाकडे कां होईना, मराठीतून कांहीना कांहीतरी लिहित आलो आहे. त्याचीच ही ब्लॉग साखळी. वाचकांना आवडेल अशी मनापासून इच्छा.”
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८
ठाण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य-संमेलनाचे निमित्ताने, अनेक पुस्तके त्यादरम्यानच प्रसिद्ध झाली. हे पुस्तकही त्यातीलच एक होय.
मुख्यत्वे वेंडेल आणि ब्युला यांच्या आठवणी जपण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे लेखकानेच अर्पण-पत्रिकेत लिहून ठेवलेले असले तरीही ब्युला, वेंडेल, रिकी, एजाज, रीफ आणि जेस्सी या सहा व्यक्तींची व्यक्तीचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.