कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
नमस्कार,
जून्-जुलैमधे भारतवारीचा विचार चालू आहे.कोणाला अमेरिकेतले चांगले एजंट्स माहित आहेत का?
धन्यवाद!
चार-पाच वर्षांपूर्वी निवेदिता खांडेकरचे प्रत्यक्ष अनुभव ऐकण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबद्दल फारसं ऐकलं वा वाचले नव्हते. दोनएक वर्षापूर्वी जगन्नाथ कुंट्यांच 'नर्मदे हर' वाचण्यात आलं. त्यानंतर अमरकंटकलाही जाण्याचा योग आला. सध्या अनेक संस्थळांवर नर्मदा परिक्रमेवर लेख, चर्चा वाचण्यात आल्या. कधीतरी आपणही परिक्रमेचा अनुभव घ्यावा असं वाटू लागलं . अजून तरी योग आला नाही. पण प्रतिभाताईंनी मानस परिक्रमा घडवून आणली. नुकतीच माझ्या मैत्रिणीने सौ प्रतिभा चितळ्यांची, त्यांनी दोनहजार सात साली केलेल्या परिक्रमेच्या अनुभवकथनाची तबकडी ऐकायला दिली.
माझे सासू सासरे आणि नणंद यायच ठरवतायत, त्यामुळे त्याना आसपास /दूर फिरवण्यासाठी ७ सीटर वाहनाची गरज लागणार आहे.महीना भरा साठी अशी गाडी रेंट करणं किवा विकेंड्स ना रेंट करण्याचा विचार करतोय, पण नेट वरून रेट काढले तर दिवसाला ७०-८० $ कमीतकमी होतील असं दिसतय.याशिवाय मायलेज/टॅक्स्/इन्शुरन्स वैगरे वेगळ होईल.
कुणाला लॉग टर्म रेंटल / किवा डिस्काऊंट्स असलेली कार रेंटल्स माहीती आहेत का?
तसंच नॉर्थ कॅरोलीना मधून नायगरा/न्यूयॉर्क्/डीसी ई. तरी कमीत कमी त्यांना पाहायचय. अशा टूर्स असतात का?(एकटेच फिरून या असं म्हणण बरोबर वाटत नाहीये पण निदान एखाद्या ठिकाणा साठी जरी सोय झाली तर...)
Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.
मी जून मध्ये माझ्या परीवाराबरोबर australia & newzealand मध्ये फिरायला येण्याचा विचार करत आहे. मी भारतातुन package tour घेतली नसुन येण्याजाण्याची सोय स्वत करत असल्याने तिथे फिरण्याकरता मला मदत हवी आहे. मी अशी tour शोधत आहे कि जी मला दोन्ही देश (hotel, sightseeing, indian veg food, travel from australia to Nz ) सोय करेल.अशी local tour कोणाला माहित आहे का? काही उपाय सुचवता येइल का? आम्हि २+२ असे येत असुन शाकाहारी आहोत. मला असे समजले कि खाण्याचे सामान आणु शकत नाहि. प्लीज मदत करा.