उत्तराखंड कॉलिंग (अंतिम भाग) — "कितनी खूबसूरत ये तस्वीर है..." (कौसानी)
कौसानी — रानीखेतपासुन साधारण ७५ किमी अंतरावर असलेले आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले हे एक नितांत सुंदर ठिकाण. दिल्लीपासुन याचे अंतर साधारण ४१० किमी आहे. नैनिताल, रानीखेत या हिलस्टेशनच्या मानाने छोटेसे असलेले हि ठिकाण १८९०मी. उंचीवर वसलेले. कौसानीचा अर्धा भाग बागेश्वर जिल्ह्यात तर अर्धा भाग अल्मोडा जिल्ह्यात येतो. येथुन नंदादेवी, त्रिशूल, नन्दाघूंटी, पंचशूल यांची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. कौसानीत, गांधीजींचा अनासक्ती आश्रम, चहाचे मळे, बागेश्वर येथील बैजनाथ मंदिर हि ठिकाणे आवर्जुन बघण्यासारखी आहेत.
===============================================