नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा (उत्तरांचल) पर्यटनस्थळाविषयी अधिक माहिती हवी आहे.

Submitted by जिप्सी on 11 April, 2011 - 00:05

आम्ही काही मित्र ४ मे ते १५ मे (११ दिवस) पर्यंत उत्तरांचल फिरायला जाणार आहोत. उत्तरांचलमध्येच मित्राचे घर असल्याने ३ दिवस तेथे मुक्काम व नंतर नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा इ. फिरण्याचा मानस आहे.
साधारण बेत असा आहे.
३ मे रोजी रात्रौ ९:३०च्या फ्लाईटने दिल्ली आणि तेथुन प्रायव्हेट गाडीने उत्तरांचल. ४ मे ते ६ मे मित्राच्या गावी. ७ पासुन पुढे भटकंती. अजुन फायनल प्लान केला नाही. तरी या परीसरात न चुकता पहावी अशी अशी काही ठिकाणे असतील तर जरूर सांगा. तसेच या ट्रिपचा रफ प्लान दिला तरी चालेल Happy (म्हणजे कुठले ठिकाण पहिले करायचे ते. मित्राचे घर नैनितालहुन साधारण २ तासावर आहे. जरी तो उत्तरांचलचा असला तरी त्याला जास्त काही माहित नाही. :-).) जर १४-१५ तारखेला वेळ मिळाला तर (१५ तारखेला दुपारी १२ वाजताची रीटर्न फ्लाईट असल्याने) दिल्ली परिसर फिरण्याचा विचार आहे. तर एका दिवसात सहज पाहुन होतील अशी दिल्लीतील जवळची ठिकाणे प्लीज सुचवा. मायबोलीकर चंदन आणि आडोने काहि ठिकाणे सांगितली आहे.
तसेच प्रथमच डोमेस्टिक एअरलाईन्सने प्रवास करणार असल्याने काहि अधिकच्या टिप्स असतील तर जरूर सांगा. Happy (इंटरनॅशनल एअरलाईन्सने काहिहि त्रास न होता प्रवास झाला आहे. ;-)).

(आंतरजालावर पाहत आहे, पण कुणी आधी जाऊन आले असल्यास ठिकाण/अनुभव सांगा) Happy

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोमेस्टिक फ्लाईटने जाताना पोटभर जेवून जायला विसरू नका. तिथे चकटफू काही मिळणार नाही आणि एअरपोर्टवर लाऊंजमध्ये प्रचंड महाग. मागच्या वेळचा अनुभव आठवून सांगतेय.

Domestic airport is better and fast than International airpot in Mumbai (in Delhi both airports are excellent). If you are travelling by full service airlines (jet , Kingfisher) then only you can get food. Just take care to provide correct terminal number (1,3) to taxi driver in Delhi as the termails are quiet far from each other. In delhi don't miss Humayu Tomb, Purana Kila (for photography) and Akshardham. But frankly in Summer Delhi is hopeless place to stay. So go as fast as u can to uttarakhand (Devbhoomi). Some problem in Marathi typing. Hence writing in English.

वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या सीझनमध्ये दिल्लीत फिरण्याचा खरंच काही पॉईंट नाही.

आडो, मंदार अधिक माहितीबद्दल धन्यवाद.

Just take care to provide correct terminal number (1,3) to taxi driver in Delhi as the termails are quiet far from each other.>>>>>धन्स मंदार, नक्की लक्षात ठेवीन Happy

या सीझनमध्ये दिल्लीत फिरण्याचा खरंच काही पॉईंट नाही.>>>>>खरंय, येताना दिल्लीहुनच येणार असल्याने जवळपासचे एखाद दुसरे ठिकाण पाहणार होतो. पण अजुन फायनल नाही केलंय.

रच्याकने, डोमेस्टिक एअरलाईन्ससाठी पॅनकार्ड हे पुरेसे आहे कि अजुन काही ओळखपत्र लागतात?

जिप्सी... प्लॅन असा कर..
दिल्ली ते मसुरी व्हाया डेहराडुन.... डेहराडून जवळ एक गरम पाण्याचा झरा आहे तो पाहुन जाणे..
मसुरी पाहुन झाल्यावर तेथुन तुम्ही ऋशीकेश आणी हरिद्वार ला जा.. तिथुन पुढे कौसानी... नंतर नैनीताल आणी जिम कॉर्बेट... राणीखेत तुम्हाला नैनीतालच्या वाटेवर पहायला मिळेल... जास्तीत जास्त वेळ कॉर्बेट आणी कौसानी मध्ये घालवा... Happy आम्ही सुद्धा नेमके त्याच वेळेस तिथे असणार आहे .. (पण आम्ही सगळे मित्र सहकुटुंब असल्यामुळे आमचा जास्ती वेळ.. हरिद्वार आणी ऋशीकेशला जाईल.. Sad ) आम्ही तेथील बरीचशी माहीती जमवली आहे.. तुला काय माहीती हवी आहे ते कळव...

कुठली एअरलाईन्स आहे? आम्ही जेटने दिल्लीला गेलो-आलो होतो, पोट फुटेस्तोवर खाऊ घातले होते. जेटलाईटने गोव्याला गेलो होतो, ५० मिनीटांच्या प्रवासात पण फूड पॅकेट्स दिली होती.

डोमेस्टिकसाठी पॅन कार्ड पुरेसे आहे.

दिल्लीत फिरण्यासाठी 'अल्पना'शी संपर्क साधा.

स्वाती, राम, मंजूडी धन्यवाद Happy

राम, ५-६ तारखेला मित्राच्या घरी एक कार्यक्रम असल्याने तेथे पहिले जाणे आहे. सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने इतक्या सगळ्या ठिकाणी नाही जाता येणार, त्यामुळे या ६-७ दिवसात नैनिताल, राणीखेत, कौसानी आणि अलमोरा हि ठिकाणे व्यवस्थित पहावयाची आहेत. चंदनने सांगितल्याप्रमाणे हरिद्वार/ऋषिकेश आणि नैनिताल हि ठिकाणे विरूद्ध दिशेला आहेत, त्यामुळे हि ठिकाणे पुढच्या एखाद्या दौर्‍यात उरकुन घेऊ. :-). सगळी ठिकाणे एकदम करण्यापेक्षा ३-४च व्यवस्थित बघुन घ्यायचा विचार आहे.
जिम कॉर्बेटला दोन दिवस पुरेसे आहेत का?

कुठली एअरलाईन्स आहे?>>>>>"GoAir" Happy

जिप्सी... तुला मि माझा प्लॅन सांगतो त्यात एका ठिकाणापासुन दुसर्‍या ठिकाणा पर्यंतचे अंतर दिले आहे... तुझे बरोबर आहे मसुरी , ऋशीकेश वगैरे ठिकाणे नैनीताल पासुन थोडी बाजुला आहेत पण ७ दिवसात होउ शकतील...
माझा प्लॅन डेहराडुन पासुन सुरु होतो कारण पुणे ते डेहराडुन कनेक्टींग फ्लाईट आहे..
Uttaranchal Calling
Day 1: Deharadun -Mussoorie
On reaching Deharadun drive to Mussoorie. (approx. 3 hrs drive)
Day 2: Mussoorie
After breakfast Mussoorie local sightseeing places covering Gun Hill, Kempty Falls,
Camel’s back road etc.
Day 3: Mussoorie-Rishikesh-Haridwar
After breakfast proceed to Haridwar via Rishikesh. (approx. 3 & half + 45 minutes). In
the evening attend Ganga Aarti.
Day 4: Haridwar-Corbett Park
After breakfast drive to Corbett Park. (approx. 4 hrs drive). Enjoy Jungle activities.
Day 5: Corbett Park-Ranikhet-Kausani
After breakfast drive to Kausani. Enroute visit Ranikhet. (approx. 4 hrs drive). Enjoy
beautiful Sunset in Kausani.
Day 6: Kausani-Almora-Nainital
After breakfast leave to visit Almora, Bhimtal & Nakuchiyatal. (approx. 4 hrs drive)
Day 7: Nainital
After breakfast visit Naini Peak, Snow View, Tiffin Top & Dorothy Seat, Lands
End, Hanumangarhi, Kilbury, Sarital, Ghorekhal Mandir.
Day 8: Nainital-Delhi
Drive from Nainital to Delhi. (approx. 7-8 hrs drive).

गो एयर म्हणजे टर्मिनल १ वर येणार फ्लाइट. मंदारनी सांगितल्याप्रमाणे टॅक्सी ड्रायव्हरला हे नक्की सांगून ठेवा. मंजू म्हणतेय तसं खायला काहीही मिळणार नाही यांच्या फ्लाइटमध्ये. Happy

मे मध्ये दिल्लीमध्ये जास्त भटकंती न केलेलीच बरी. जर बघायचंच असेल तर अक्षरधाम मंदीर जरूर बघा.
उत्तरांचलमध्ये जास्त फिरलो नाहीये, त्यामूळे तिथली माहिती नाही देता येणार. दिल्लीसंदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर सांगू शकेन.

उत्तरांचल (गढवालमध्ये) माझी बर्‍यापैकी भटकंती झालीये, पण तू गढवालला न जाता कुमाऊंला जातोयस, त्यामुळे तिथली जास्त माहिती मी ही नाही देऊ शकत. Sad

जिप्सी, एक सांगू कां? तुला नाउमेद करायची अजिबात इच्छा नाहीये पण ज्यांनी आपल्या सह्याद्रीतले धबधबे बघितलेत त्यांच्यासाठी केम्टी फॉल काही मोठं नाहीये. दुसरी गोष्ट तू म्हणतोस ती ही बरोबरच आहे, हरिद्वार/ऋषीकेश व नैनिताल ही ठिकाणे खूपच दूर आहेत. त्यामुळे सगळं एकाच ट्रिपमध्ये बघण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा मोजक्या गोष्टींना वेळ द्या.

ज्यांनी आपल्या सह्याद्रीतले धबधबे बघितलेत त्यांच्यासाठी केम्टी फॉल काही मोठं नाहीये.>> आडोला अनुमोदन. मी आधीच हे लिहिता लिहिता थांबले होते. केम्टी फॉल चांगली जागा आहे, पण स्पेशली तेवढ्यासाठी वाट वाकडी करून जायला नको.

ज्यांनी आपल्या सह्याद्रीतले धबधबे बघितलेत त्यांच्यासाठी केम्टी फॉल काही मोठं नाहीये.>>>>>आडो, अल्पना अनुमोदन Happy
या ट्रिपमध्ये तरी मी तिकडे जाणार नाही आहे Happy केम्प्टी फॉल्स चे फोटो आवडलेले Happy

जागू, Happy Happy

जिप्सी ही धागा मी अ‍ॅडमिनना "प्रवास अनुभव" मध्ये हलवायला सांगीतला आहे. माहिती हवी आहे मध्ये नंतर कोणाला हा सापडेल असे वाटत नाही.
पुढच्यावेळी धागा काढतांना कृपया ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या विषयाच्या संबंधित ग्रूपमध्ये धागा काढ त्याने वर्गीकरण सोपे होते व भविष्यात लोकांना तोच धागा शोधणे सोपे जाते.
- मदत समिती

धन्स रूनी Happy

पुढच्यावेळी धागा काढतांना कृपया ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या विषयाच्या संबंधित ग्रूपमध्ये धागा काढ त्याने वर्गीकरण सोपे होते व भविष्यात लोकांना तोच धागा शोधणे सोपे जाते.>>>>नक्कीच Happy

खरंतर त्या जागेची अधिक "माहिती हवी होती" म्हणुन तेथेच हा धागा काढला होता. तेथे जाऊन आल्यावर "प्रवासाचे अनुभव" मध्ये लिहिणार होतो Happy

माझ्याकडे आहेत नैनिताल, रानीखेत,कौसानी,अलमोराचे डीटेल्स, तुला पाठवतो.

पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसंस,पासपोर्ट असं काहीही चालेल की ज्यावर फोटो आहे,
फोटो असलेली क्रेडीट कार्ड्स पण चालतात.

अरे वा.. प्रवासाला शुभेच्छा... मला शीर्षकात नैनिताल वाचुन वेगळाच वास आला Wink

देहराडूनला थांबता येणं शक्य असेल तर तिथली फॉरेस्ट इन्स्टीट्यूट जरुर बघा. देहराडूनपासून सहा तासांच्या अंतरावर चकराता नावाचं अप्रतिम ठिकाण आहे. तिथे जाता आलं तर नक्की जा.

साधारण ४-५ वर्षांपूर्वी एक 'भटकंती' नावाचं मासिक यायचं, अजूनही आहे म्हणा पण ती पूर्वीची क्वालिटी नाही राहिली. त्यात उदय ठाकूरदेसाई नावाच्या एका ट्रेकरने एक लेख लिहिला होता. त्यात एक 'पौरी' नावाच्या गावाची खूप तारीफ केली होती.

धन्यवाद Happy

शर्मिला, डेहराडुन या ट्रिपला तर शक्य दिसत नाही. पुढच्या वेळेस नक्की Happy

साधारण ४-५ वर्षांपूर्वी एक 'भटकंती' नावाचं मासिक यायचं, अजूनही आहे म्हणा पण ती पूर्वीची क्वालिटी नाही राहिली. त्यात उदय ठाकूरदेसाई नावाच्या एका ट्रेकरने एक लेख लिहिला होता. त्यात एक 'पौरी' नावाच्या गावाची खूप तारीफ केली होती.>>>> आडो, मी अजुनही ४-५ वर्षापूर्वीचे अंक जपून ठेवले आहेत. Happy आजही माझ्याकडे दर महिन्याला येतं भटकंती मासिक. Happy मी शोधतो उदय ठाकूरदेसाईंचा लेख.
रच्याकने, सांगायला छान वाटते कि, २००८-२००९ साली माझे हि ५-६ लेख भटकंती मासिकात प्रसिद्ध झाले होते. Happy

मला शीर्षकात नैनिताल वाचुन वेगळाच वास आला>>>>साधना Happy मला समजलं तुला कसला वास आला तो Proud पण अजुन वेळ आहे. Wink

त्यात उदय ठाकूरदेसाई नावाच्या एका ट्रेकरने एक लेख लिहिला होता. त्यात एक 'पौरी' नावाच्या गावाची खूप तारीफ केली होती>>>>आडो, तो लेख मिळाला. Happy सप्टेंबर २००५ च्या अंकात "हिमालयातल्या न मळलेल्या वाटा ( चिला, पौडी, खिरसु, खांडुसीन)" या शिर्षकांतर्गत "उदय ठाकुरदेसाई" यांचा हा लेख आला होता.

"पौरी (पौडी)" ॠषिकेशहुन साधारण १३०-१४० किमी अंतरावर आहे, बहुतेक गढवाल प्रांतात येते ते गाव.

त्याच लेखातील एक परीच्छेद
"भल्या पहाटे उठून चिलाच्या विद्युत केंद्रापर्यंत भटकंती करून नाश्ता, चहा, आंघोळ आटपून "पावरी"च्या वाटेला लागलो. या पावरीची गंमत सांगण्यासारखी आहे. चिलाला पोहोचल्यावर कुक्कु म्हणाला, "कल तो पौडी जाना है नं?" मी म्हटंल पौडी तो हरिद्वारमें रह गया. हमे तो "पावरी" जाना है! चिलाच्या गढवाली स्टाफकडुन कळलं पावरी नव्हे "पौडी" (पौरी). चिलाचा मुक्काम सोडल्यावर सकाळी पौडीला निघालो. रस्ता काय बहारदार होता. सकाळची वेळ अर्धा तास गंगामैया साथीला. बुबखल, सातपुली अशा सुंदर गावामधुन आमचा प्रवास चालु होता. पौडीजवळ आल्यावर कुक्कु म्हणाला, "ते बघा चौखंबा" आम्ही सर्वजण बाहेर आलो. खोल दरीत रम्य टेरेस होते आणि समोर चौखंबा, बंदरपूछ, केदार, नीलकंठ अशी शिखरं दिसत होते.
(उदय ठाकूरदेसाई, भटकंती मासिक, सप्टें. २००५).

योगेश बरोबर. मी म्हणत होते तो हाच लेख. Happy

मी ही भक्तिभावाने पूर्वी घेत असे हे मासिक, पण त्याचे संपादक गेल्यावर त्याची पूर्वीची क्वालिटी नाही राहिली, मग बंद केलं ते मासिक घ्यायचं. घरी माझ्याकडेही जुने जुने अंक ठेऊन दिले आहेत.

मी योगायोगानेच हा धागा वाचला. मी वरील मन्ड्ळी म्हणताहेत त्या उदय ठाकूरदेसाई यान्ची पत्नी आहे.सर्वाना त्यान्चे लीखाण आवडले हे वाचुन खुपच आनद झाला.

खरंच, योगायोग Happy
कमल, मलाही उदय ठाकुरदेसाईंचे लेख आवडायचे. भटकंतीतले त्यांचे सगळे लेख जपून ठेवले आहेत. Happy त्यांचे "झिंगारो" हे सदर आवडीचे होते. Happy

प्रिय मायबोलिकर,
जिप्सि,
तुम्हा सर्वाचे धन्यवाद.
जुन्या दिल्लिवरुन काथगोदाम गाथायचे. किवा,
आग्रा-लाल कुवा गादिने नैनिताल गाथायचे.
पुधे रानिखेत्,कोसानि,वगैरे बघताना मुन्सियारि न चुकता बघा.
..उदय थाकुरदेसाइ

Pages