केल्याने देशाटन.......

Submitted by अतरंगी on 21 June, 2011 - 15:22

नमस्कार मंडळी,

मला परदेशी प्रवासा साठी काही माहिती हवी होती.
मला जगातील सर्व देश ( पर्यटन स्थळे) पहायची आहेत. या वर्षी सुरुवात करुन दर दोन तीन वर्षानी एखादी ट्रिप करयाची आहे.....

माबो करांपैकी भरपुर जण असे असतील कि ज्यानी वैयक्तिक, ग्रुप टुर केल्या असतील स्वताहा किंवा प्रवासी कंपन्यांसोबत. त्यांचे अनुभव काय काय आहेत ?

प्रवास customised tour घेउन करावा कि ग्रुप सोबत?

सगळे आयोजन स्वता: करावे कि प्रवासी कंपन्यांतर्फे गेलेले चांगले ?

प्रवासी कंपन्या ( केसरी, थॉमस कूक, कॉक्स अँड किंगस, राजा- राणी वगैरे) या बद्दलचे अनुभव काय काय आहेत ?

कोणत्या कंपनीच्या कोणत्या टुर चांगल्या आहेत? व्यवस्था कशी असते....

तुमच्या मते जगात बघण्यासारखे देश कोण कोणते आहेत ? कोणत्या देशात गेल्यावर काय चुकवु नये ( खाणे, फिरणे, अनुभवणे, नाईट लाईफ वगैरे.) ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अहो परदेशी प्रवास वगैरे सगळे मनाचे चोचले आहेत. नाइट लाईफ तर क्षणभंगूर आहे. विमान म्हणजे तरी काय बाहेरून पोलाद, काँपोझिट आणि आतून प्लास्टिक. त्यात बसण्यासाठी का पैशांच्या मागे पळायचे? त्यापेक्षा तेवढे पैसे कमी मिळवण्यासाठी कामाचे तास कमी करून ११ ते ३ वगैरे केले तर आयुष्य किती समृद्ध होईल Happy

---------
तुमचा संकल्प खूप चांगला आहे. 'सैर कर दुनियाकी गाफिल, ये जिंदगानी फिर कहां' ही माझी आवडती ओळ आहे. बाफची कल्पनाही चांगली आहे. मात्र तुमचे प्रश्न खूप जनरल आहेत, त्याची प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार दोन्ही बाजूनी उत्तरे येतील. काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर जरूर विचारा.

नाइट लाईफ तर क्षणभंगूर आहे. विमान म्हणजे तरी काय बाहेरून पोलाद, काँपोझिट आणि आतून प्लास्टिक>>>>>> १००% सत्य.

त्यापेक्षा तेवढे पैसे कमी मिळवण्यासाठी कामाचे तास कमी करून ११ ते ३ वगैरे केले तर आयुष्य किती समृद्ध होईल>>>>>> तेच मी आमच्या कंपनी ला सांगून पाहिले. पण ऐकत नाहीत हो. शेवटी आता नोकरी सोडावी लागली.

खरेतर मी हा धागा डिलीट करायचा प्रयत्न करत होतो. त्या नादात तो वर आला. तरुण पणी माणूस कसा भरकटलेला असतो त्याचे उदाहरण म्हणजे हा धागा. काय तर म्हणे परदेश प्रवास, प्रवासी कंपन्या, खाणे पिणे आणि नाईट लाईफ..... मनाचे चोचले सगळे Proud

अरे म्हणजे २०११ साली कोणीच साधं उत्तरही दिलं नव्हतं का तुम्हाला? आता त्या आयटीच्या धाग्यावर त्यामानाने तुम्हाला बराच टीपी करता आला. प्रगती आहे!

मी तेच म्हणतो .आतापर्यँत चार वर्षाँत देशी /परदेशी गेलाच असाल .त्याचे लिखाण करून लिँक द्याना इथे .धागा खोडता कशाला ?तुमचे चार बरेवाईट अनुभव खरडले की इतर धावतीलच त्यांचे घेऊन .

वेदिका Good One, असाच प्रयत्न करत रहिलात तर अजून छान तिरकस बोलता येईल. Keep It up.

अमा, बाकी ठिकाणी वाचत असतो. पण मायबोली वर वाचलेले प्रतिसाद, अभिप्राय जास्त विश्वसनीय वाटतात.

SRD, प्रयत्न करुन पाहतो. मी शक्यतो लिखाणाच्या वाटेला जात नाही.

केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार!

तुम्हाला देश फक्त पहायचे आणि पर्यटनस्थळे पाहिली असे टिकमार्क करायचे असेल तर सहल यात्रा कंपन्या चांगल्या. देश अनुभवायचे असतील तर स्वतः अभ्यास करुन प्लॅन केलेला जास्त चांगला. अर्थात हे वेळ खाउ असले तरी तुम्हाला नंतर देश पाहिल्याचा आनंद मिळेल.

सहल यात्रा कंपन्यांना कमी खर्चात पर्यायाने कमी दिवसात बरेच काही दाखवले असे करायचे असते त्यामुळे ते अक्षरशः पळवतात. तुमची पर्यटन यात्रा आरामदायी होण्या ऐवजी नुसती धावपळीची होईल. अर्थात तुम्हाला सर्व ठिकाणी भारतीय्/महाराष्ट्रीन पद्धतीचे जेवण मिळेल,
तुम्हाला काही कारणाने स्वतः प्लॅन करणे अशक्य असेल तर किंवा अनओळखी प्रदेशात एकटे फिरण्यास काही अडच असल्यास किंवा खाण्या-पिण्याबद्दल काही विशिष्ठ गरजा असतील तर पर्यटन यात्रांचा विचार करा. सर्व प्रवासी कंपन्या थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. तुम्ही नमुद केलेल्या सर्व कंपन्या नावाजलेल्याच आहेत. माझा स्वत्:चा अनुभव नाही पण अनेक नातेवाईक/ मित्र मंडळींना केसरी, थॉमस कूक, कॉक्स अँड किंगस कडुन काही प्रॉब्लेम आला नाही.