मिश्मी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोअर देबांग व्हॅलीत मुख्यत्वे इदु लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहीसे कट्टर ! आजही आपल्या रुढी परंपरांना घट्ट चिकटून आहेत. अनेक भाषांप्रमाणे बोलीभाषा इदु लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याची लिपी नाहीये. शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय. मिथुन,डुक्कर, कोंबड्या सारखे प्राणी पाळतात. भात, सरसो ही मुख्य पिकांबरोबर संत्री, केळी, अननस इ. फळांचं मुबलक प्रमाणावर उत्पादन होतं. निर्यातीसाठी दळणवळणाची पुरेशी सोय नाही. साठवणूक करायला फळ प्रक्रिया उद्योग नाहीत म्हणून पशू खाद्य विकत आणण्या ऐवजी उरलेलं अन्न व अतिरिक्त फळांचा उपयोग करतात.
कार्यशाळेचा आज पहिला दिवस. ही कार्यशाळा इस्सोमी फाऊंडेशन पेरेंट बॉडी ऑफ इनतया पब्लिक स्कूल व इन्जालुमेंडा विमेन एमपॉवरमेंट फोरम ह्यांनी आयोजित केली होती. साडेआठवाजल्यापासून मुलं यायला सुरुवात झाली. पन्नास मुलांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती कदाचित वूमन एमपॉवरमेंट सह आयोजक असल्यामुळे तर नाही ना
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दीपप्रज्वलन व उदघाटक रिवॉचचे डायरेक्टर विजयस्वामीसर व राखी लिंगी ह्यांच्या आटोपशीर भाषणाने झाली अन लाजरी बुजरी (?)मुलं आमच्या ताब्यात आली.
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास
**********
आधीचा भाग:
देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास: http://www.maayboli.com/node/53820
**********
प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( http://www.maayboli.com/node/52091 ) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोन्ट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली..
पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.
परदेशात (UK) भाड्याच्या घरात राहत असताना अनेक अनुभव आले . इथे घरमालक घर भाडेकरूच्या ताब्यात दिल्यावरही महिन्या दोन महिन्यातून आपले घर भाडेकरूने व्यवस्थित मेंटेन केले आहे का पाहण्यासाठी फेरी मारत असतात. घर स्वछ नीटनेटके ठेवावे लागते. तसे आपण आपले घर स्वच्छ नीटनेटके ठेवण्याचा रोजच प्रयत्न करतो. परंतु येथे खरतर चकचकीत हा योग्य शब्द आहे. भिंतीला / कार्पेटला एकही डाग असता कामा नये. खिडक्याही पुसून लक्ख केलेल्या हव्यात. Toilet Bathroom ही ब्लीच टाकून नव्यासारखी वाटतील इतकी चकचकीत करावी लागतात. त्या दिवशी असे झाल की पाणी गरम होण्याचा Boiler बिघडला.
वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे
मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. त्यामुळे वर्षात चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते महाड मार्गे पाचगणी सात तासांचा प्रवास.